मराठी बातम्या /बातम्या /मनी /डिझेल इंजिन ट्रेनसाठी किती इंधन खर्च होत असेल? एका लीटरमध्ये किती धावते माहितीये का?

डिझेल इंजिन ट्रेनसाठी किती इंधन खर्च होत असेल? एका लीटरमध्ये किती धावते माहितीये का?

ट्रेनच्या लोडच्या वर, रेल्वेच्या डिझेल इंजिनमध्ये प्रति लिटर डिझेलची सरासरी निश्चित केली जाते. भारतीय रेल्वेच्या डिझेल इंजिनचे मायलेज अनेक घटकांवर अवलंबून असते.

ट्रेनच्या लोडच्या वर, रेल्वेच्या डिझेल इंजिनमध्ये प्रति लिटर डिझेलची सरासरी निश्चित केली जाते. भारतीय रेल्वेच्या डिझेल इंजिनचे मायलेज अनेक घटकांवर अवलंबून असते.

ट्रेनच्या लोडच्या वर, रेल्वेच्या डिझेल इंजिनमध्ये प्रति लिटर डिझेलची सरासरी निश्चित केली जाते. भारतीय रेल्वेच्या डिझेल इंजिनचे मायलेज अनेक घटकांवर अवलंबून असते.

मुंबई, 1 जून : एखादी नवीन कार किंवा बाईक दिसली की अनेक आपण त्या गाडीचा माललेज चेक करतो. त्यामुळे ती गाडी चालवण्यासाठी किती इंधन लागेल याचा अंदाज येतो. मात्र लांब पल्ल्याच्या डिझेल इंजिन ट्रेन्ससाठी (Diesel Engine Train) किती इंधन लागत असेल याचा कधी विचार केला का? भारतीय रेल्वेच्या (Indian Railway) मदतीने दररोज लाखो प्रवासी देशातील एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात. देशभरात रेल्वे ट्रॅकचे (Railay track) विद्युतीकरण झालेले नाही, त्यामुळे अनेक रेल्वे मार्गांवर अजूनही डिझेल इंजिनवर धावत आहेत. तुम्ही कधी विचार केला आहे का की 1 लिटर डिझेलमध्ये भारतीय रेल्वेच्या डिझेल इंजिनचे मायलेज किती आहे?

भारतीय रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, डिझेल इंजिनच्या क्षमतेनुसार, रेल्वेची डिझेल टाकी तीन श्रेणींमध्ये विभागली गेली आहे. ही 5000 लीटर, 5500 लीटर आणि 6000 लीटरची टाकी असू शकते. इकोनॉमिक्स टाईम्सने याबाबतचं वृत्त प्रसारित केलं आहे.

HDFC चे 100 खातेधारक काही सेकंदात बनले 130 कोटींची मालक; अन्...

ट्रेनच्या लोडच्या वर, रेल्वेच्या डिझेल इंजिनमध्ये प्रति लिटर डिझेलची सरासरी निश्चित केली जाते. भारतीय रेल्वेच्या डिझेल इंजिनचे मायलेज अनेक घटकांवर अवलंबून असते. रेल्वेच्या 12 डब्यांच्या पॅसेंजर ट्रेनमध्ये डिझेल इंजिन 6 लिटर डिझेलमध्ये 1 किलोमीटर चालते. 24 डब्यांची एक्स्प्रेस ट्रेन 6 लिटर डिझेलमध्ये 1 किलोमीटर धावते, तर 12 डब्यांच्या एक्स्प्रेस ट्रेनचे डिझेल इंजिन 4.5 लिटर डिझेलमध्ये 1 किलोमीटर धावते.

खाद्य तेलाच्या किमती कमी करण्यासाठी केंद्र सरकारचं मोठं पाऊल; मात्र सोने-चांदीचे दर वाढण्याची शक्यता

एक्सप्रेस आणि पॅसेंजर ट्रेनच्या डिझेल इंजिनच्या मायलेजवर परिणाम का होतो, असा प्रश्न तुम्हाला पडत असेल, तर उत्तर असे आहे की पॅसेंजर ट्रेन आपल्या मार्गावरील प्रत्येक स्थानकावर थांबते. यासोबतच ब्रेक आणि एक्सलेटरचा वापरही त्यात अधिक आहे. त्यामुळे एक्स्प्रेस ट्रेनच्या तुलनेत येथे डिझेल इंजिनचे मायलेज कमी होते.

भारतीय रेल्वेची एक्सप्रेस ट्रेन तिच्या रूटवर कमी स्टेशनवर थांबते आणि ब्रेकसह कमी अॅक्सिलेटर वापरला जातो. त्यामुळे ती प्रति लिटर डिझेलला जास्त मायलेज देते. डिझेल इंजिन मालगाडी खेचत असल्यास, त्याचे मायलेज बदलू शकते. मालगाडीत जास्त वजन असेल तर भारतीय रेल्वेचे डिझेल इंजिन कमी मायलेज देते आणि मालगाडी रिकामी असल्यास तिचे मायलेज वाढते.

First published:

Tags: Diesel tank, Indian railway, Train