मुंबई, 24 जुलै : शेअर बाजारात मागील आठवड्यात तेजी दिसून आली. मात्र अजूनही बाजार स्थिर झालेला नाही. शेअर बाजारातील या चढ-उतारात अनेक गुंतवणूकदारांचं नुकसान झालं. अशा परिस्थितीत झिरोधाचे सह-संस्थापक निखिल कामत यांनी किरकोळ गुंतवणूकदारांना शेअर बाजारात जास्त लोभ न ठेवण्याचा सल्ला दिला आहे. अनेकांना शेअर बाजार मनी मशीन वाटते. शेअर बाजारात पैसे दुप्पट करण्याच्या विचार करुन येणारे गुंतवणूकदार देखील आहे. मात्र अशा गुंतवणूकदारांना निखल कामत यांनी मोलाचा सल्ला दिला आहे. निखिल कामत म्हणाले की, जर तुम्हाला एफडीपेक्षा बाजारातून चांगला परतावा मिळत असेल तर तुम्ही नफा बुक करू शकता. काहीवेळा तुम्ही जास्त नफ्यामुळे तोट्यात अडकू शकता. येत्या काही दिवसांत बाजारात फारशी तेजी पाहायला मिळणार नाही. समुद्रकिनारी सापडली व्हेल माशाची 28 कोटींची उलटी; मच्छिमारांनी केलं चकित करणारं काम आमचा विश्वास आहे की पुढील तिमाहीतही व्यवसाय सुस्त राहण्याची अपेक्षा आहे. मात्र किरकोळ गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास कमी झाला आहे असं आताच म्हणणे योग्य ठरणार नाही. सध्या किरकोळ गुंतवणूकदार 8-9% च्या आसपास आहेत. सध्या शेअर बाजारात गुंतवणूकदारांनी लोभ टाळावा. त्यांनी 1 वर्ष किंवा 6 महिन्यांत पैसे दुप्पट करण्याच्या लालसेने गुंतवणूक करू नये, असा सल्ला निखील कामत यांनी दिला. गुंतवणूकदारांनी 15% पर्यंत परतावा मिळण्याच्या अपेक्षेने गुंतवणूक करावी. बाजारात पैसा लगेच दुप्पट होईल, असा विचार करू नये. 15% पर्यंत परताव्याच्या अपेक्षेने बाजारात प्रवेश करणे ही एक चांगली रणनीती आहे. रुपयाच्या घसरणीवर निखिल कामत यांनी चिंता व्यक्त केली. कांदा स्वस्त होणार? कांद्याच्या किमतीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल महागाईवर बोलताना ते म्हणाले की, महागाईमुळे बाजारातून पैसा बाहेर पडला आहे. मात्र, सध्या तरी महागाईतून दिलासा मिळालेला नाही. भारतीय बाजारपेठेतील तेजीच्या काळात अधिक गुंतवणूकदार बाजारात येतात. भारतातील फार कमी लोक इक्विटी मार्केटशी संबंधित आहेत. भारतातील केवळ 2% लोकसंख्या बाजाराशी जोडलेली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.