मराठी बातम्या /बातम्या /मनी /

कांदा स्वस्त होणार? कांद्याच्या किमतीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल

कांदा स्वस्त होणार? कांद्याच्या किमतीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल

केंद्र सरकारने कांद्याच्या दरावर लगाम घालण्यासाठी विक्रमी बफर स्टॉक तयार केला आहे. सरकारने 2.50 लाख टन कांद्याचा बफर स्टॉक तयार केला आहे, जो आतापर्यंतचा सर्वाधिक आहे.

    मुंबई, 24 जुलै : देशातील महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. त्यासाठी केंद्रातील मोदी सरकारने आतापासूनच तयारी सुरू केली आहे. महागाईमुळे कांद्याने अनेकवेळा लोकांना त्रास दिला आहे. आज कांद्याचे भाव गेल्या वर्षीच्या तुलनेत 9 टक्क्यांनी कमी असले तरी सरकार काद्यांच्या भावावर नियंत्रण ठेवण्यासाठी ठोस पावले उचलणार आहे. एबीपी न्यूजने याबाबत माहिती दिली आहे. पुढच्या महिन्यापासून केंद्र सरकार आपल्या बफर स्टॉकमधून देशातील मंडईंमध्ये कांद्याचा पुरवठा करणार आहे. केंद्रीय अन्न आणि ग्राहक व्यवहार राज्यमंत्री अश्वनी कुमार चौबे यांनी राज्यसभेत लेखी उत्तरात माहिती दिली आहे की मंडईतील बफर स्टॉकमधून पुरवठा ऑगस्ट महिन्यापासून सुरू होईल आणि या वर्षाच्या अखेरीपर्यंत सुरू राहील. SBI WhatsApp Banking : आता बँकेत जाण्याची गरजच नाही; WhatsApp वरच करा बँकेची ही कामं 2.50 लाख टन कांदा साठा केंद्र सरकारने कांद्याच्या दरावर लगाम घालण्यासाठी विक्रमी बफर स्टॉक तयार केला आहे. सरकारने 2.50 लाख टन कांद्याचा बफर स्टॉक तयार केला आहे, जो आतापर्यंतचा सर्वाधिक आहे. यावेळी सरकारी कांद्याची खरेदीही विक्रमी पातळीवर झाल्याने देशात कांद्याचे बंपर उत्पादन झाले आहे. देशात टोमॅटोचे भाव एका महिन्यात सुमारे एक तृतीयांश कमी झाले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत कांद्याचे दर नऊ टक्क्यांनी स्वस्त आहेत. देशभरात कांद्याची सरासरी किंमत 25.78 रुपये प्रतिकिलोवर आली आहे, जी गेल्या वर्षीच्या तुलनेत 9 टक्क्यांनी कमी आहे. TDS Refund: जास्त टीडीएस कापला गेलाय? 'या' सोप्या पद्धतीनं परत मिळू शकतात पैसे किरकोळ महागाई दर 7.1 टक्के किरकोळ महागाई RBI च्या निश्चित मर्यादेपेक्षा सातत्याने जास्त राहिली आहे. जूनमध्ये किरकोळ महागाईचा दर 7.1 टक्के होता. RBI ने महागाई दराची मर्यादा 6 टक्के निश्चित केली आहे. कच्चे तेल, कमोडिटी आणि खाद्यपदार्थांच्या किमती वाढल्याने महागाई वाढली आहे.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Central government, Inflation, Onion

    पुढील बातम्या