जाहिरात
मराठी बातम्या / मनी / समुद्रकिनारी सापडली व्हेल माशाची 28 कोटींची उलटी; मच्छिमारांनी केलं चकित करणारं काम

समुद्रकिनारी सापडली व्हेल माशाची 28 कोटींची उलटी; मच्छिमारांनी केलं चकित करणारं काम

File Photo

File Photo

व्हेलची उलटी सहज कुठेही मिळत नाही त्यामुळे त्याची किंमतही तितकीच महाग आहे. व्हेलच्या उलटीचा वापर परफ्यूम बनवण्यासाठी केला जातो.

  • -MIN READ Kerala
  • Last Updated :

मुंबई, 24 जुलै : अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या पाहिल्यानंतर आपण त्यांच्या किमतीचा अंदाज आपल्याला लावता येत नाही. व्हेलची उलटी देखील तशीच आहे. व्हेलची उलटी म्हणजे आपल्याला किळस वाटेल, पण याची किंमत ऐकली तर चकीत व्हाल. एक कोटी रुपयांना एक किलो अशी याची किंमत आहे. एम्बरग्रीस नावाच्या व्हेलच्या उलटीची किंमत 1 कोटी रुपये प्रति किलो आहे. तिरुवनंतपुरमजवळील विझिंजम येथील मच्छिमारांच्या गटाला व्हेलच्या उलटी सापडली. त्याची किंमत 28 कोटींच्या जवळपास आहे. मात्र मच्छीमारांनी ती सरकारी अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिली. व्हेलची उलटी सहज कुठेही मिळत नाही त्यामुळे त्याची किंमतही तितकीच महाग आहे. व्हेलच्या उलटीचा वापर परफ्यूम बनवण्यासाठी केला जातो. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्याची मागणी आहे. गूड रिटर्न वेबसाईटनुसार, मच्छिमारांना समुद्रात 28.4 किलो वजनाचे एंबरग्रीस सापडले आणि शुक्रवारी संध्याकाळी त्यांनी ते किनाऱ्यावर आणले. त्यानंतर त्यांनी ते कोस्टल पोलिसांच्या ताब्यात दिले. कांदा स्वस्त होणार? कांद्याच्या किमतीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल भारतात काय नियम आहेत? या मच्छिमारांनी व्हेलच उलटी पोलिसांच्या ताब्यात दिली. त्यांनी वनविभागाला माहिती दिली आणि त्यानंतर त्यांच्याकडून हे काढून घेण्यात आले. वनविभागाने पुष्टीकरणासाठी व्हेलची उलटी राजीव गांधी सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी (RGCB) येथे नेली आहे. व्हेलची उलटी विक्रीस भारतात कायदेशीररित्या प्रतिबंधित आहे, कारण स्पर्म व्हेल ही वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत संरक्षित असलेली एक लुप्तप्राय प्रजाती आहे. सासरी जाणाऱ्या लेकीला आधी मिठी मारून ढसाढसा रडला, तिची पाठ फिरताच…; बापाचं ‘ते’ कृत्य कॅमेऱ्यात कैद गेल्या वर्षी, थायलंडमधील 49 वर्षीय महिलेला तिच्या घराजवळील समुद्रकिनाऱ्यावर फिरताना व्हेल मासे उलट्या करताना आढळून आले. याची किंमत भारतीय चलनात 1.9 कोटी रुपये होती. त्यामुळे ती महिला रातोरात करोडपती बनली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: kerala , money , whale
  • First Published :
जाहिरात
जाहिरात