मुंबई, 14 जून : रशिया-युक्रेन युद्ध (Russia-Ukraine War) सुरू झाल्यानंतर शेअर बाजारातील (Share Market) घसरणीला सुरूवात झाली, ती थांबण्याचे नाव घेत नाही आहे. युद्ध सुरू होऊन 15 आठवड्यांहून अधिक काळ लोटला आहे, परंतु बाजार अद्याप स्थिर झालेला नाही. अशा स्थितीत जेव्हा जेव्हा बाजारात थोडीशी तेजी दिसून येते तेव्हा लोक असा अंदाज बांधू लागतात की मंदीचा ट्रेंड थांबला आहे आणि आता येत्या काही दिवसांत मोठी तेजी पाहायला मिळू शकते.
मात्र, झिरोधाचे (Zerodha) संस्थापक निखिल कामत (Nikhil Kamath) यांचा अशा लोकांसाठी एक सल्ला आहे. निखिल कामत यांनी ट्वीट करत सांगितले की, जेव्हा तुमच्या मनाप्रमाणे गोष्टी घडत नाहीत, तेव्हा त्यांच्यापासून दूर राहणेच योग्य. बाजारातील सध्याच्या परिस्थितीबद्दल बोलताना कामत म्हणाले, जेव्हा 10 पैकी 9 वेळा गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होत नाहीत, तेव्हा काहीही न करणे चांगले असते. हा सल्ला जीवनात आणि बाजारपेठेत दोन्ही लागू आहे.
क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचे 70 टक्के नुकसान, कोणत्या करन्सीमध्ये किती पैसे बुडाले?
9 out of 10 times, when things don't go your way, doing nothing is the best thing. In life and in mkts...
— Nikhil Kamath (@nikhilkamathcio) June 10, 2022
मार्केट्समोजोचे मुख्य गुंतवणूक अधिकारी सुनील दमानिया यांनीही निखिल कामत यांच्या सल्ल्याला पाठिंबा दिला. Livemint शी बोलताना सुनील दमानिया म्हणाले, गेल्या काही महिन्यांत गुंतवणूकदारांनी बरच नुकसान पाहिलं आहे. मात्र त्यांना आणखी काही महिने संयम ठेवावा लागेल. मात्र, त्यानंतर भारतीय शेअर बाजारात तेजी पाहायला मिळू शकते.
अदानी ग्रुपच्या 'या' शेअरमुळे गुंतवणूकदार करोडपती; एक लाख बनले 2.21 कोटी
दमानिया गुंतवणूकदारांना सल्ला देतात की, तुमची इक्विटी गुंतवणूक होल्ड करुन ठेवा. भीती आणि भावनेच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नका. भारतीय शेअर बाजार पुढील रॅलीसाठी बेस तयार करत आहे. जर तुम्हाला या रॅलीमध्ये सहभागी व्हायचं असेल, तर तुम्ही कोणतेही खरेदी सध्या टाळावी.
2022 मध्ये निफ्टी-50 निर्देशांक आतापर्यंत 10.70 टक्क्यांनी घसरला आहे. तसेच या कालावधीत सेन्सेक्स सुमारे 11 टक्क्यांनी खाली आला आहे. BSE चा मिड-कॅप निर्देशांक, ज्यामध्ये मध्यम शेअर्सचा समावेश आहे, तो देखील 2022 मध्ये आतापर्यंत 13 टक्क्यांनी घसरला आहे, तर स्मॉल-कॅप निर्देशांक सुमारे 16 टक्क्यांनी घसरला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Investment, Money, Share market