मराठी बातम्या /बातम्या /मनी /क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचे 70 टक्के नुकसान, कोणत्या करन्सीमध्ये किती पैसे बुडाले?

क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचे 70 टक्के नुकसान, कोणत्या करन्सीमध्ये किती पैसे बुडाले?

 गेल्या 7 दिवसांत इथेरियमच्या किमतीत 33.67 टक्क्यांनी घसरण झाली आहे. Bitcoin चा बाजारातला हिस्सा वाढून 45.1 टक्क्यांवर पोहोचला असून Ethereum चा हिस्सा 15.1 टक्के आहे.

गेल्या 7 दिवसांत इथेरियमच्या किमतीत 33.67 टक्क्यांनी घसरण झाली आहे. Bitcoin चा बाजारातला हिस्सा वाढून 45.1 टक्क्यांवर पोहोचला असून Ethereum चा हिस्सा 15.1 टक्के आहे.

गेल्या 7 दिवसांत इथेरियमच्या किमतीत 33.67 टक्क्यांनी घसरण झाली आहे. Bitcoin चा बाजारातला हिस्सा वाढून 45.1 टक्क्यांवर पोहोचला असून Ethereum चा हिस्सा 15.1 टक्के आहे.

     मुंबई, 14 जून : क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये सध्या तीव्र घसरण होताना दिसत आहे. आज (14 जून) मंगळवारीही केवळ एका दिवसात मार्केटमध्ये 10 टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे. या घसरणीमुळे क्रिप्टोकरन्सी मार्केट कॅप (Global Crypto Market Cap) 1 ट्रिलियन डॉलरच्या खाली गेली आहे. बिटकॉइन आणि इथरियमनेही गुंतवणूकदारांना मोठा धक्का दिला आहे. दोन्ही कॉइन्स आपल्या महत्त्वपूर्ण पातळीच्या खाली आली आहेत.

    भारतीय वेळेनुसार आज सकाळी 9.25 पर्यंत ग्लोबल क्रिप्टो मार्केट कॅप (Global Crypto Market Cap) 10.66 टक्क्यांनी घसरली आहे आणि ती 927.14 बिलियन डॉलरवर आली आहे. गेल्या वर्षी 10 नोव्हेंबरशी तुलना केल्यास क्रिप्टो मार्केट 70 टक्क्यांनी घसरलं आहे. 10 नोव्हेंबर 2021 रोजी हा आकडा सुमारे 3 ट्रिलियन डॉलर्स होता.

    बिटकॉइन आणि इथेरियमची खराब स्थिती

    Coinmarketcap च्या डेटानुसार, मंगळवारी दुपारी Bitcoin (Bitcoin Price Today) 13.59 टक्क्यांनी खाली येऊन 22,060.21 डॉलरवर ट्रेड करत होता. मागच्या 7 दिवसांत बिटकॉइनच्या किमतीत 25.48 टक्क्यांची घसरण झाली आहे. दुसऱ्या क्रमांकाची सर्वांत मोठी क्रिप्टोकरन्सी असलेल्या इथेरियमची (Ethereum) किंमत (Ethereum Price Today) गेल्या 24 तासांत 14.21 टक्क्यांनी घसरून 1,165.34 डॉलरवर आली आहे. गेल्या 7 दिवसांत इथेरियमच्या किमतीत 33.67 टक्क्यांनी घसरण झाली आहे. Bitcoin चा बाजारातला हिस्सा वाढून 45.1 टक्क्यांवर पोहोचला असून Ethereum चा हिस्सा 15.1 टक्के आहे.

    अदानी ग्रुपच्या 'या' शेअरमुळे गुंतवणूकदार करोडपती; एक लाख बनले 2.21 कोटी

    कोणत्या क्रिप्टोकरन्सीची काय परिस्थिती?

    सोलानाची (Solana – SOL) किंमत 28.38 डॉलर्स असून गेल्या 24 तासांत त्यात 1.82 टक्क्यांनी, तर गेल्या 7 दिवसांत त्यात 28.54% घसरण झाली आहे. एव्हलॉन्चची (Avalanche) किंमत 16.35 डॉलर्स असून गेल्या 24 तासांत त्यात 0.67 टक्क्यांनी, तर गेल्या 7 दिवसांत त्यात 31.76% घसरण झाली आहे. शिबा इनुची (Shiba Inu) किंमत 0.000008177 डॉलर असून, गेल्या 24 तासांत त्यात 1.38 टक्क्यांनी, तर गेल्या 7 दिवसांत त्यात 22.80% घसरण झाली आहे. पोल्काडॉटची (Polkadot – DOT) किंमत 7.19 डॉलर्स असून, गेल्या 24 तासांत त्यात 1.21 टक्क्यांनी वाढ झाली असून, गेल्या 7 दिवसांत त्यात 20.90% घसरण झाली आहे. कार्डानोची (Cardano – ADA) किंमत 0.4745 डॉलर असून, गेल्या 24 तासांत त्यात 0.40 टक्क्यांनी, तर गेल्या 7 दिवसांत त्यात 19.67% घसरण झाली आहे. बीएनबीची (BNB) किंमत 220.60 डॉलर्स असून, गेल्या 24 तासांत त्यात 8.38 टक्क्यांनी, तर गेल्या 7 दिवसांत त्यात 22.49% घसरण झाली आहे.

    डोजकॉइनची (Dogecoin – DOGE) किंमत 0.05523 डॉलर असून, गेल्या 24 तासांत त्यात 8.32 टक्क्यांनी, तर गेल्या 7 दिवसांत त्यात 30.37% घसरण झाली आहे. एक्सआरपीची (XRP) किंमत 0.3142 डॉलर असून, गेल्या 24 तासांत त्यात 5.14 टक्क्यांनी, तर गेल्या 7 दिवसांत त्यात 19.27% घसरण झाली आहे. ट्रोनची (Tron TRX) किंमत 0.06084 डॉलर असून गेल्या 24 तासांत त्यात 17.24 टक्क्यांनी, तर गेल्या 7 दिवसांत त्यात 23.85% घसरण झाली आहे.

    शेअर बाजारातील पडझडीतही राकेश झुनझुनवालांची मोठी कमाई, एकाच शेअरमधून कमावले 215 कोटी

    सर्वांत जास्त तेजी असणारी क्रिप्टोकरन्सी कोणती?

    Coinmarketcap नुसार, Metaxa, Maya Preferred (MAYP), आणि Enigma (ENGM) ही गेल्या 24 तासांत सर्वांत जास्त तेजी असणारी क्रिप्टोकरन्सी होती. Metaxa मध्ये 153.47% वाढ, माया Preferred (MAYP) मध्ये 116.84% वाढ झाली आहे आणि Enigma मध्ये (ENGM) 71.99% वाढ नोंदवण्यात आली आहे.

    First published:

    Tags: Cryptocurrency, Digital currency, Money