मराठी बातम्या /बातम्या /मनी /अदानी ग्रुपच्या 'या' शेअरमुळे गुंतवणूकदार करोडपती; एक लाख बनले 2.21 कोटी

अदानी ग्रुपच्या 'या' शेअरमुळे गुंतवणूकदार करोडपती; एक लाख बनले 2.21 कोटी

 अदानी एंटरप्रायझेसचे बाजार भांडवल (Adani Enterprises Market Cap) 2.45 लाख कोटी रुपये होती. अदानी एंटरप्रायझेसची सध्याची बूक वॅल्यू प्रति शेअर 228 च्या पातळीपेक्षा थोडी वर आहे.

अदानी एंटरप्रायझेसचे बाजार भांडवल (Adani Enterprises Market Cap) 2.45 लाख कोटी रुपये होती. अदानी एंटरप्रायझेसची सध्याची बूक वॅल्यू प्रति शेअर 228 च्या पातळीपेक्षा थोडी वर आहे.

अदानी एंटरप्रायझेसचे बाजार भांडवल (Adani Enterprises Market Cap) 2.45 लाख कोटी रुपये होती. अदानी एंटरप्रायझेसची सध्याची बूक वॅल्यू प्रति शेअर 228 च्या पातळीपेक्षा थोडी वर आहे.

मुंबई, 14 जून : शेअर बाजारात (Share Market) लगेच पैसे गुंतवले आणि लगेच मोठा नफा कमावला असं होत नाही. पैसे गुंतवून त्यात चांगला परतावा मिळवण्यासाठी वाट पाहावी लागले. जे गुंतवणूकदार संयम ठेवतात तेच लोक जास्त पैसे कमवतात. असाच एक शेअर आहे ज्यांने वाट पाहायला लावली, पण गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. अदानी समूहाच्या अदानी एंटरप्रायझेस शेअरने (Adani Enterprises) 20 वर्षात गुंतवणूकदारांना 22 हजार टक्के मल्टीबॅगर परतावा दिला आहे.

20 वर्षांच्या कालावधीत, हा स्टॉक 9.41 रुपयांवरून आता 2082.10 रुपयांपर्यंत वाढला आहे. अशा प्रकारे या स्टॉकमध्ये 221 पट वाढ झाली आहे. सोमवारी अदानी एंटरप्रायझेसचे बाजार भांडवल (Adani Enterprises Market Cap) 2.45 लाख कोटी रुपये होती. अदानी एंटरप्रायझेसची सध्याची बूक वॅल्यू प्रति शेअर 228 च्या पातळीपेक्षा थोडी वर आहे. स्टॉकचा 52 आठवड्यांचा उच्चांक 2,420.95 रुपये आहे, तर 52 आठवड्यांचा नीचांक 120.20 रुपये आहे.

नोकरी बदलता EPF Account बाबत 'हे' काम नक्की करा; नाहीतर आर्थिक नुकसान हेईल

दीर्घ कालावधीत प्रचंड नफा

लाइव्ह मिंटच्या अहवालानुसार, 2022 मध्ये अदानी एंटरप्रायझेसच्या स्टॉकमध्ये आतापर्यंत 21 टक्क्यांनी वाढ झाली आहे. वर्षाच्या सुरुवातीला त्याची किंमत 1717 रुपये होती, ती वाढून 2082 रुपये झाली आहे. गेल्या एका वर्षात स्टॉक 45 टक्क्यांनी वाढला आहे. त्याचप्रमाणे, गेल्या सहा महिन्यांत स्टॉक 25 टक्क्यांनी वधारला आहे. 5 वर्षांपूर्वी अदानी एंटरप्रायझेसच्या शेअरची किंमत फक्त 130 रुपये होती. तेव्हापासून आतापर्यंत त्यात 1500 टक्क्यांनी वाढ झाली आहे. अदानी एंटरप्रायझेसच्या शेअरने 10 वर्षांपूर्वी 850 रुपयांची उसळी घेतली होती. जर आपण 20 वर्षांपूर्वी बोललो तर अदानी एंटरप्रायझेसचा शेअर 9.41 रुपयांवरून 2082.10 रुपयांपर्यंत वाढला आहे. म्हणजेच या कालावधीत या शेअरमध्ये 22000 टक्क्यांची वाढ दिसून आली आहे.

शेअर बाजारातील पडझडीतही राकेश झुनझुनवालांची मोठी कमाई, एकाच शेअरमधून कमावले 215 कोटी

गुंतवणूकदारांना मल्टिबॅगर परतावा

जर एखाद्या गुंतवणूकदाराने 2022 च्या सुरुवातीला अदानी एंटरप्रायझेसमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असतील, तर त्याला आता 1.21 लाख रुपये मिळत आहेत. या शेअरमध्ये वर्षभरापूर्वी केलेली 1 लाख रुपयांची गुंतवणूक आता 1.40 लाख रुपयांची झाली आहे. त्याचप्रमाणे एखाद्या गुंतवणूकदाराने पाच वर्षांपूर्वी या शेअरमध्ये एक लाख रुपये गुंतवले असतील, तर आता त्याला एक लाख रुपयांचे आता 16 लाख रुपये मिळतील. त्याचप्रमाणे 20 वर्षांपूर्वी अदानी एंटरप्रायझेसमध्ये एक लाख रुपये गुंतवलेली व्यक्ती आज करोडपती झाली असून त्याची गुंतवणूक आता 2.21 कोटी रुपये झाली आहे.

First published:

Tags: Investment, Money, Share market