मुंबई, 8 एप्रिल : पॅन कार्ड (PAN Card) हा एक महत्त्वाचे दस्तऐवज आहे, जे सर्व प्रकारच्या आर्थिक व्यवहारांमध्ये वापरले जाते. पण पॅनकार्ड खरे की बनावट हे कसे शोधायचे हा प्रश्न आहे. खऱ्या किंवा बनावट पॅनकार्डमधील फरक ओळखणे खूप सोपे आहे. तुमच्या स्मार्टफोनच्या माध्यमातून तुम्ही पॅनकार्ड खरे आहे की खोटे हे जाणून घेऊ शकता. पॅन कार्डवर बनवलेला QR कोड तुम्हाला या कामात मदत करतो. या संपूर्ण प्रक्रियेसाठी तुम्हाला फक्त पॅन कार्ड आणि स्मार्टफोनची गरज आहे. लक्षात ठेवा स्मार्टफोनचा कॅमेरा किमान 12-मेगापिक्सेलचा असावा. याशिवाय तुम्हाला आयकर विभागाचे अॅप डाउनलोड करावे लागेल. यानंतर, अॅपद्वारे पॅन कार्ड स्कॅन करून, तुम्ही ते खरे आहे की बनावट हे शोधू शकता. Online Transaction करताना चुकीच्या खात्यात पैसे जमा झाले? चिंता करु नका, ‘अशा’ प्रकारे मिळवता येतील पैसे पुन्हा पॅन कार्ड खोटे आहे की खरे असं करा चेक? » तुमच्या स्मार्टफोनवरील ‘प्ले स्टोअर’वर जा आणि ‘PAN QR Code Reader’ शोधा. » अॅप डाउनलोड करा, जे NSDL e-Governance Infrastructure Limited ने विकसित केले आहे. » एकदा तुम्ही ‘PAN QR Code Reader’ अॅप डाउनलोड केल्यानंतर ते ओपन करा. » अॅप लोड झाल्यानंतर, तुम्हाला कॅमेरा व्ह्यूफाइंडरवर हिरवा प्लस-सारखा ग्राफिक दिसेल. » तुम्हाला तुमच्या कॅमेऱ्यात तपासायचे असलेल्या पॅन कार्डचा QR कोड दाखवा. » कॅमेरा QR कोड शोधताच, तुम्हाला फोनमधील बीप आवाज आणि कंपन जाणवेल. » यानंतर पॅन कार्ड तपशील दिसेल. अॅपमध्ये दाखवलेले तपशील कार्डशी जुळतात का ते तपासा. जर ते थोडे वेगळे असेल तर पॅन कार्ड ओरिजनल नाही. » तुमच्या स्वतःच्या पॅन कार्डमध्ये वेगळी माहिती दिसल्यास, तुम्हाला आयकर विभागाच्या वेबसाइटवरून नवीन पॅन कार्ड घ्यावे लागेल.
Post Office च्या स्कीममध्ये अवघ्या 100 रुपयांपासून सुरु करा गुंतवणूक, कर्जाची सुविधाही उपलब्ध
आयकर विभागाने जुलै 2018 मध्ये पॅन कार्ड नवीन डिझाइनसह अपडेट केले होते. नवीन QR कोड मागील QR पेक्षा थोडा वेगळा आहे आणि तो कार्डधारकाच्या फोटोसह इतर माहिती लपवतो. मात्र क्यूआर कोड नसलेली जुनी पॅन कार्डे अद्याप वैध आहेत.