मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Online Transaction करताना चुकीच्या खात्यात पैसे जमा झाले? चिंता करु नका, 'अशा' प्रकारे मिळवता येतील पैसे पुन्हा

Online Transaction करताना चुकीच्या खात्यात पैसे जमा झाले? चिंता करु नका, 'अशा' प्रकारे मिळवता येतील पैसे पुन्हा

Online Transaction करताना चुकीच्या खात्यात जमा झालेली रक्कम 'अशी' मिळवा परत

Online Transaction करताना चुकीच्या खात्यात जमा झालेली रक्कम 'अशी' मिळवा परत

Online Transaction: काही वेळा घाईत किंवा अनवधानाने आपण चुकीच्या व्यक्तीला पैसे ट्रान्सफर (Transfer) करतो. परंतु, ही बाब जेव्हा लक्षात येते, तेव्हा आपली चिंता वाढू लागते; पण आता याबाबत चिंता करण्याची गरज नाही.

मुंबई, 7 एप्रिल : गेल्या काही वर्षांत बॅंकिंगसह (Banking) जवळपास सर्वच गोष्टी ऑनलाइन (Online) झाल्या आहेत. त्यामुळे आर्थिक व्यवहार करणं अतिशय सोपं झालं आहे. ऑनलाइन पेमेंटसाठी (Online Payment) सध्या अनेक प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत. यूपीआय, नेट बँकिंग, मोबाइल वॉलेट आदींमुळे बॅकिंग व्यवहारांशी संबंधित अडचणी बऱ्याच अंशी कमी झाल्या आहेत. ग्राहकांना या सुविधांमुळे 24 तासांत केव्हाही आर्थिक व्यवहार करता येतात. आता मोबाइलच्या (Mobile) माध्यमातून अगदी एका क्लिकवर क्षणार्धात पैसे ट्रान्सफर करता येतात; मात्र ही सुविधा जितकी फायदेशीर आहे, तितकीच ती जोखमीचीदेखील आहे. काही वेळा घाईत किंवा अनवधानाने आपण चुकीच्या व्यक्तीला पैसे ट्रान्सफर (Transfer) करतो. परंतु, ही बाब जेव्हा लक्षात येते, तेव्हा आपली चिंता वाढू लागते; पण आता याबाबत चिंता करण्याची गरज नाही. कारण अशी अनवधानाने ट्रान्सफर झालेली रक्कम आपल्याला परत मिळू शकते. यासाठी एक प्रक्रिया आहे. याबाबतची माहिती देणारं वृत्त 'झी न्यूज हिंदी'ने प्रसिद्ध केलं आहे. बॅंकिंग सुविधा सोप्या व्हाव्यात यासाठी प्रयत्न केले जात आहेत; मात्र काही सुविधांमुळे अडचणींमध्ये थोडी वाढ झाल्याचं दिसून येतं. काही वेळा गडबडीत किंवा अनवधानाने आपण चुकीच्या व्यक्तीला ऑनलाइन पैसे ट्रान्सफर करतो. जेव्हा तुम्ही बॅंक खात्यातून दुसऱ्याच्या खात्यात पैसे ट्रान्सफर करता तेव्हा तुम्हाला एक मेसेज (Message) येतो. `जर हा व्यवहार चुकीचा असेल, तर कृपया हा मेसेज 'या' नंबरवर पाठवा,` असं त्या मेसेजमध्ये लिहिलेलं असतं. चुकून भलत्याच खात्यात पैसे जमा झाले तर संबंधित बॅंकेनं यावर तातडीनं कार्यवाही करावी, अशा सूचना `आरबीआय`नं (RBI) बॅंकांना दिलेल्या आहेत. तुमचे पैसे चुकीच्या खात्यातून योग्य खात्यात जमा करण्याची जबाबदारी बॅंकेची आहे. वाचा : आता 50 रुपयांपेक्षा कमी रुपयांत पेट्रोल मिळणार नाही, पेट्रोल पंपावर लागल्या पाट्या ऑनलाइन पैसे ट्रान्सफर करताना, तुमच्याकडून चुकून भलत्याच खात्यात पैसे ट्रान्सफर झाले तर ही बाब लक्षात येताच तातडीने याबाबतची माहिती आपल्या बँकेत द्यावी. बँकेच्या कस्टमर केअरला (Customer Care) फोन करून घडलेला प्रकार सांगावा. बॅंकेने तुमच्याकडे ई-मेलवरून या प्रकाराची माहिती मागवली तर ट्रान्झॅक्शनबाबत सर्व माहिती ई-मेलमध्ये द्यावी. त्यात ट्रान्झॅक्शनची तारीख, वेळ, तुमचा अकाउंट नंबर, ज्या खात्यावर चुकून रक्कम ट्रान्सफर झाली त्याची माहिती द्यावी. चुकीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर झाले असतील तर रक्कम परत मिळण्यास काही दिवस लागू शकतात. या प्रकाराबाबत बॅंकेच्या शाखा व्यवस्थापकास (Branch Manager) माहिती द्यावी. कारण, कोणत्या शहरातल्या कोणत्या बँकेच्या शाखेतल्या अकाउंटवर पैसे ट्रान्सफर झाले आहेत, याची माहिती तुम्हाला तुमच्या बॅंकेकडूनच मिळू शकते. तुमची बॅंक संबंधित शाखेशी संपर्क साधून तुमचे पैसे परत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करते. तुमच्या माहितीच्या आधारे बॅंक ज्या खात्यावर चुकून पैसे ट्रान्सफर झाले आहेत त्या व्यक्तीला कळवेल. यानंतर, बॅंक त्या व्यक्तीला चुकीच्या पद्धतीनं ट्रान्सफर झालेली रक्कम परत देण्याबाबत विनंती करेल. वाचा : साबण, दूध, बिस्किटं, कॉफीनंतर आता डाळीचे भावही कडाडले, तब्बल 16 टक्क्यांची वाढ ज्या खात्यात रक्कम चुकून ट्रान्सफर झाली आहे, तो खातेधारक रक्कम परत करण्यास नकार देत असेल तर त्याच्या विरुद्ध न्यायालयात खटला दाखल करता येतो. तथापि, पैसे परत न केल्यास हा अधिकार रिझर्व्ह बॅंकेच्या नियमांचं उल्लंघन ठरतो. रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, लाभार्थ्याच्या खात्याबद्दल योग्य माहिती देणं ही लिंक करणाऱ्याची जबाबदारी असते. कोणत्याही कारणास्तव लिंक करणाऱ्यानं चूक केली असेल तर त्याला बॅंक जबाबदार राहत नाही. त्यामुळे खाते क्रमांक योग्य टाकणं ही संबंधित ग्राहकाची जबाबदारी असते. ऑनलाइन पैसे ट्रान्सफर करताना चुकून रक्कम चुकीच्या व्यक्तीच्या खात्यावर जमा झाल्यास तातडीनं आपल्या बॅंकेशी संपर्क साधणं महत्त्वाचं आहे.
First published:

Tags: Bank services, Money, Online

पुढील बातम्या