मुंबई, 8 एप्रिल : भविष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी आज बचत (Saving For Future) करणे फार महत्वाचे आहे. बचत करताना ती रक्कम एखाद्या चांगल्या स्कीममध्ये गुंतवली तर त्यातून मिळणारा रिटर्न बचतीची रक्कम आणखी वाढवतो. रिकरिंग डिपॉझिट (Recurring Deposit) हा बचतीचे पैसे गुंतवण्याचा सुरक्षित गुंतवणूक पर्याय (Investment Options) म्हणून ओळखला जातो आणि जर तुम्हाला RD मध्ये गुंतवणूक करायची असेल, तर पोस्ट ऑफिस RD योजनेअंतर्गत, तुम्ही दरमहा केवळ 100 रुपये भरु शकता. तुम्ही येथून गुंतवणूक सुरू करू शकता. इंडिया पोस्टच्या वेबसाइटनुसार, सध्या पोस्ट ऑफिस RD वर 5.8 टक्के वार्षिक व्याजाचा लाभ उपलब्ध आहे. RD वर मिळणाऱ्या व्याजावरही कर भरावा लागतो. या योजनेतील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे RD मधील व्याजदर तीन महिन्यांसाठी चक्रवाढ आहे. Online Transaction करताना चुकीच्या खात्यात पैसे जमा झाले? चिंता करु नका, ‘अशा’ प्रकारे मिळवता येतील पैसे पुन्हा कोण करु शकतात गुंतवणूक? पोस्ट ऑफिसच्या आरडी स्कीममध्ये (Post Office RD Scheme) कोणतीही प्रौढ व्यक्ती आपले खाते उघडू शकते. या योजनेत संयुक्त खातेही उघडता येते. अल्पवयीन व्यक्तीचे खाते पालकाच्या वतीने देखील उघडले जाऊ शकते. या योजनेत तुम्हाला हवी तेवढी खाती उघडता येतील. कर्ज सुविधेचा लाभ तुम्हाला पोस्ट ऑफिस आरडी योजनेद्वारे कर्ज घेण्याच्या सुविधेचा लाभ देखील मिळतो. जर तुम्ही या योजनेअंतर्गत तुमचे 12 हप्ते जमा केले असतील तर तुम्ही या अंतर्गत कर्ज घेऊ शकता. पोस्ट ऑफिसच्या अधिकृत वेबसाइटनुसार, तुमच्या खात्यात जमा केलेल्या रकमेच्या 50 टक्के कर्ज घेतले जाऊ शकते. खुशखबर! ‘या’ क्षेत्रात नोकरी करणाऱ्यांना यंदा चांगली पगारवाढ मिळणार; रिपोर्ट्समधून माहिती समोर पोस्ट ऑफिसच्या आरडी स्कीममध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला दरमहा किमान 100 रुपये जमा करावे लागतील. जर तुमचे खाते महिन्याच्या पहिल्या 15 दिवसांत उघडले तर तुम्हाला 15 तारखेच्या आत पैसे जमा करावे लागतील. दुसरीकडे, जर तुम्ही महिन्याच्या पहिल्या 15 दिवसांनंतर तुमचे खाते उघडले असेल, तर तुम्हाला महिन्याच्या शेवटच्या तारखेआधी पैसे जमा करावे लागतील.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.