जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Share Market Update: शेअर बाजारात गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान, घसरणीची नेमकी कारणं काय?

Share Market Update: शेअर बाजारात गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान, घसरणीची नेमकी कारणं काय?

Share Market Update: शेअर बाजारात गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान, घसरणीची नेमकी कारणं काय?

BSE सेन्सेक्स 1,046 अंकांनी घसरून 51,495.79 वर, तर निफ्टी 50 (Nifty50) 331.55 अंकांनी घसरून 15,360.60 वर बंद झाला. भारतीय बाजारातील प्रचंड घसरणीचे कारण बाजारातील तज्ञ जागतिक परिस्थिती मानत आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 17 जून : भारतीय शेअर बाजारात (Share Market) गुरुवारी मोठी घसरण झाली आणि बेंचमार्क निर्देशांक 16 जून रोजी 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर बंद झाले. BSE सेन्सेक्स 1,046 अंकांनी घसरून 51,495.79 वर, तर निफ्टी 50 (Nifty50) 331.55 अंकांनी घसरून 15,360.60 वर बंद झाला. भारतीय बाजारातील प्रचंड घसरणीचे कारण बाजारातील तज्ञ जागतिक परिस्थिती मानत आहेत. ते म्हणतात की यूएस फेड रिझर्व्हने व्याजदरात केलेली वाढ, जागतिक शेअर बाजारातील घसरण आणि क्रूडच्या (Crude Oil) वाढत्या किमती या कारणांमुळे भारतीय शेअर बाजारावर सातत्याने दबाव येत आहे आणि तो कायम राहू शकतो. यूएस फेडने व्याजदरात वाढ केली Moneycontrol.com च्या अहवालानुसार, यूएस फेडरल रिझर्व्हने व्याजदरात केलेल्या वाढीचा परिणाम जवळपास प्रत्येक देशाच्या शेअर बाजारावर झाला आहे. अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेने व्याजदरात 0.75 टक्क्यांनी वाढ केली आहे. 1994 नंतरची ही व्याजदरातील सर्वात मोठी वाढ आहे. मॉर्गन स्टॅनलीला आणखी वाढ अपेक्षित आहे. त्यांच्या मते, या वर्षाच्या अखेरीस व्याजदर 2.625 टक्क्यांपर्यंत वाढू शकतो. अमेरिकेतील मंदीच्या भीतीने जागतिक बाजारपेठा होरपळून निघाल्या आहेत. Financial Tips: CIBIL स्कोअर कमी आहेत? तरीही लोन घेण्यासाठी काय कराल? बँक ऑफ इंग्लंडला व्याजदर वाढवण्याची भीती या आठवड्यात बँक ऑफ इंग्लंड सलग पाचव्यांदा व्याजदर वाढवू शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे. अशी अपेक्षा आहे की फेडरल रिझर्व्हच्या मार्गाचा अवलंब केल्याने बँक ऑफ इंग्लंड अर्ध्या टक्क्यांनी वाढू शकते. इंग्लंडमधील महागाई एप्रिलमध्ये 40 वर्षांच्या उच्चांकावर पोहोचली आहे. जागतिक बाजारपेठा घसरल्या फेडरल रिझर्व्हच्या व्याजदर वाढीच्या निर्णयामुळे जागतिक बाजारात मोठी घसरण झाली. चीन, हाँगकाँग, ऑस्ट्रेलिया आणि जपानचे बाजार आज 0.4 ते 2 टक्क्यांनी घसरले. याचा परिणाम भारतीय बाजारावर झाला. शेअर बाजारात सुरु असलेल्या पडझडीत गुंतवणूकदारांनी काय करावं? ऐका तज्ज्ञांचा सल्ला तेलाच्या किमती पुरवठ्याच्या अडचणींमुळे तेलाचे भाव चढेच आहेत. आंतरराष्ट्रीय बेंचमार्क ब्रेंट क्रूड फ्युचर्स 0.3 टक्क्यांनी वाढून $119 वर व्यापार करत आहेत, तर यूएस क्रूड तेल 0.4 टक्क्यांनी वाढून $115.8 प्रति बॅरलवर आहे. क्रुडच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने गुंतवणूकदारही घाबरले आहेत. FII विक्री बंद भारतीय बाजारपेठेत सलग नवव्या महिन्यात विदेशी संस्था विक्रेत्या राहिल्या आहेत. जूनमध्ये आतापर्यंत त्यांनी 31,000 कोटी रुपयांचे शेअर्स विकले आहेत. एफआयआयने गेल्या पाच महिन्यांत 2.2 लाख कोटी रुपये काढले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात