मुंबई, 15 जून : सध्या कोणतंही कर्ज घ्यायचं असेल तर त्यासाठी तुमचा CIBIL महत्वाची भूमिका बजावतो. अनेक बँका CIBIL स्कोअर 750 किंवा त्याहून अधिक असेल तरच कर्ज पुरवतात. मात्र आपला सिबिल खराब असेल किंवा चांगला असलेला सिबिल कायम ठेवायचा असेल तर काही गोष्टींचं पालन करणे आवश्यक आहे. तुमचा CIBIL स्कोअर तुमच्या क्रेडिट पात्रतेवर आधारित आहे. तुमचा CIBIL स्कोर चांगला नसेल तर तुम्हाला कर्ज मिळण्यात अडचणी येऊ शकतात. अशा परिस्थितीत, अनेक बँका किंवा कर्ज देणाऱ्या संस्था कमी CIBIL स्कोअरसह कमी कर्जाची रक्कम देतात. तुम्ही अल्प रकमेचे कर्ज घेऊ शकता. तुम्ही वेळेवर पैसे भरत राहिल्याने तुमचा CIBIL स्कोर देखील सुधारेल. मग तुम्ही कर्ज म्हणून मोठी रक्कम घेऊ शकता. वेळेवर बिले आणि हप्ते भरा जर तुम्ही कर्ज किंवा ईएमआय आणि क्रेडिट कार्ड पेमेंट वेळेवर भरले नसेल, तर प्रथम ते व्यवहार पूर्ण करा. या सवयी सुधारल्यास तुमचा क्रेडिट स्कोर सुधारेल. LPG घरगुती गॅस कनेक्शनसाठी जास्त पैसे मोजावे लागणार, रेग्युलेटरही महाग क्रेडिट कार्डचा वापर मर्यादेत करा क्रेडिट कार्डमध्ये नेहमीच एक निश्चित मर्यादा असते, ज्याला क्रेडिट लिमिट म्हणतात. तुमचा CIBIL स्कोअर राखण्यासाठी तुम्ही तुमच्या क्रेडिट लिमिटच्या 30% पेक्षा जास्त वापरू नये. तुम्ही क्रेडिट कार्डवर या मर्यादेपेक्षा जास्त खर्च केल्यास, तुम्हाला जास्तीत जास्त क्रेडिट वापरणारी व्यक्ती म्हणून पाहिले जाते. यामुळे तुमच्या CIBIL स्कोअरवर चुकीची छाप पडते. येत्या काळात EMI आणखी वाढणार; फिच रेटिंग्सचा अंदाज, डिसेंबरपर्यंत RBI चे व्याजदर 5.9 टक्क्यापर्यंत पोहोचणार? विविध प्रकारचे कर्ज कर्जाची परतफेड करण्याचा चांगला रेकॉर्ड असलेल्या व्यक्तीचा क्रेडिट स्कोरही तितकाच चांगला असतो. अशा परिस्थितीत, जर तुम्ही अद्याप कोणतेही कर्ज घेतले नसेल, तर तुम्ही तुमच्या गरजांसाठी कर्ज घेऊ शकता, ते वेळेवर परत केल्यावरही तुमचा CIBIL स्कोर सुधारेल. याशिवाय, चांगल्या CIBIL स्कोअरसाठी चांगली लोन हिस्ट्री असणे देखील महत्त्वाचे आहे. यामध्ये विविध प्रकारचे कर्ज, सुरक्षित किंवा असुरक्षित, अल्पकालीन किंवा दीर्घ मुदतीचा समावेश असू शकतो. क्रेडिट कार्ड कधीही बंद करू नका तुम्ही तुमचे क्रेडिट कार्ड खाते कधीही बंद करू नये. यातून सतत खरेदी करत रहा आणि बिले देखील भरत रहा. याशिवाय तुमच्या संयुक्त खात्याचा, CIBIL स्कोअरचा सतत आढावा घ्यावा. संयुक्त कर्जाच्या बाबतीत, ग्राहक EMI भरण्यासाठी तितकाच जबाबदार असतो. याचा थेट परिणाम क्रेडिट स्कोअरवर होतो. 750 किंवा त्याहून अधिकचा सिबिल स्कोअर चांगला सिबिल स्कोअर 300 ते 900 अंकांच्या दरम्यान असतो. जर स्कोअर 750 किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर कर्ज मिळणे सोपे आहे. CIBIL स्कोर जितका चांगला असेल तितके कर्ज मिळणे सोपे होईल. CIBIL स्कोअर 24 महिन्यांच्या क्रेडिट हिस्ट्रीवर आधारित आहे. CIBIL स्कोअर कशावर अवलंबून? 30% सिबिल स्कोअर तुम्ही कर्जाची वेळेवर परतफेड करत आहात की नाही यावर अवलंबून आहे. 25% सुरक्षित किंवा असुरक्षित कर्जावर, 25% क्रेडिट एक्सपोजरवर आणि 20% कर्जाच्या वापरावर अवलंबून असतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.