मराठी बातम्या /बातम्या /मनी /

PAN Card: पॅनकार्डमधील 10 अंकांचा काय असतो अर्थ? प्रत्येक नंबरमध्ये असते विशेष माहिती

PAN Card: पॅनकार्डमधील 10 अंकांचा काय असतो अर्थ? प्रत्येक नंबरमध्ये असते विशेष माहिती

पॅनकार्डमधील 10 अंकांचा काय असतो अर्थ? प्रत्येक नंबरमध्ये असते विशेष माहिती

पॅनकार्डमधील 10 अंकांचा काय असतो अर्थ? प्रत्येक नंबरमध्ये असते विशेष माहिती

10 Numbers of PAN: पॅनकार्डमध्ये 10 अंकांचा एक अल्फान्यूमेरिक क्रमांक असतो, परंतु या क्रमांकांचा अर्थ काय असतो आणि तो बदलला जाऊ शकतो का? हेच आज आपण जाणून घेणार आहोत.

  • Published by:  Suraj Sakunde

मुंबई, 8 जुलै : पॅनकार्ड (PAN Card) हे भारतातील अत्यंत महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक आहे. पॅनकार्डचा वापर आर्थिक कामांमधील महत्त्वाचं कागदपत्र म्हणून केला जातो. पॅन कार्डमध्ये व्यक्तीची सर्व आर्थिक माहिती असते. ही माहिती आयकर विभागाच्या (Income Tax Department) रेकॉर्डमध्ये ठेवली जाते. बँक खातं उघडणं, जास्त रकमेचे व्यवहार, डिमॅट खातं उघडणं किंवा इतर वित्त संबंधित कामांसाठी याचा वापर केला जातो. त्याच वेळी ते ओळखपत्र म्हणून देखील वापरलं जाऊ शकतं. पॅनकार्डवर एक 10 अंकी अल्फान्यूमेरिक क्रमांक (10 Numbers of PAN) असतो, परंतु या क्रमांकांचा अर्थ काय असतो आणि तो बदलला जाऊ शकतो की नाही हे तुम्हाला माहिती आहे का? नाही ना? चला, आज आपण पॅनकार्डसंबंधी याच महत्त्वाच्या गोष्टींबद्दल जाणून घेणार आहोत.

पॅनकार्डमधील 10 अंकांचा अर्थ काय असतो? ( What in meaning of 10 digit Pan Number?)-

PAN हा आयकर विभागाने जारी केलेला दहा अंकी युनिक अल्फान्यूमेरिक क्रमांक असतो. पॅनकार्ड लॅमिनेटेड प्लास्टिक कार्डच्या स्वरूपात जारी केलं जातं. पहिल्या पाच क्रमांकांपैकी पहिले तीन क्रमांक हे AAA ते ZZZ या वर्णमाला मालिकेतील असतात, ज्याचा निर्णय आयकर विभागाकडून घेतला जातो. त्याच वेळी, पॅनचा चौथा क्रमांक पॅनधारकाच्या स्थितीबद्दल माहिती देतो आणि पॅन कार्ड कशासाठी आहे हे सांगतो.

जर चौथा क्रमांक P- असेल तर पॅन एखाद्या व्यक्तीसाठी असते.

C - म्हणजे कंपनी.

H - हिंदू अविभक्त कुटुंबासाठी

A - व्यक्तींच्या गटासाठी

B - बॉडी ऑफ पर्सन (BOI)

G - सरकारी एजन्सीसाठी

हेही वाचा: IOC Solar Stove: काय सांगता! महागड्या गॅसपासून मिळणार मुक्ती, सौरचूलीवर मोफत शिजवा 3 वेळचं जेवण

J – ऑर्टिफिशियल न्यायिक व्यक्तीसाठी

L - स्थानिक प्राधिकरणासाठी एल

F - फर्म/लिमिटेड लिबिलिटी पार्टनरशिप

T – ट्रस्टसाठी

पॅनचे पाचवे अक्षर पॅनधारकाच्या शेवटच्या नावाच्या किंवा आडनावाच्या पहिल्या अक्षराची माहिती देतं. हे एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत असते. परंतु पॅन जर वैयक्तिक व्यक्तीसाठी नसेल तर पाचवे अक्षर पॅन कार्ड धारकाच्या नावातील पहिले अक्षर दर्शवते. त्याच वेळी, पॅन कार्डचे उर्वरित चार क्रमांक अंकांमध्ये असतात. हे अंक 0001 ते 9999 दरम्यान काहीही असू शकतात. याशिवाय, शेवटचे 10 वे अक्षर चेक डिजिट असतो, तो कोणताही असू शकतो.

हेही वाचा:  Aadhaar Card: मृत व्यक्तीच्या आधारचा होऊ शकतो गैरवापर, अडचणीत येण्यापूर्वी करा हे महत्त्वाचं काम

पॅन कार्ड क्रमांक बदलता येतो का?

NSDL वेबसाइटनुसार, पॅन कार्ड क्रमांक फक्त दोन परिस्थितींमध्ये बदलला जाऊ शकतो. जेव्हा तुम्ही नवीन पॅनकार्डसाठी अर्ज करता आणि त्यात नाव पत्ता आणि इतर माहिती दुरुस्त करण्याची विनंती करता. यासोबतच, तुमच्याकडे आधीच पॅनकार्ड असताना तुम्हाला नवीन पॅनकार्ड हवं असेल, तर पॅन नंबर बदलतो, मात्र या परिस्थितीत तुम्हाला जुनं पॅन कार्ड सरेंडर करावं लागेल.

First published:

Tags: Income tax, Pan card