मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

IOC Solar Stove: काय सांगता! महागड्या गॅसपासून मिळणार मुक्ती, सौरचूलीवर मोफत शिजवा 3 वेळचं जेवण

IOC Solar Stove: काय सांगता! महागड्या गॅसपासून मिळणार मुक्ती, सौरचूलीवर मोफत शिजवा 3 वेळचं जेवण

Solar Stove : काय सांगता! महागड्या गॅसपासून मिळणार मुक्ती, सौरचूलीवर मोफत शिजवा 3 वेळचं जेवण

Solar Stove : काय सांगता! महागड्या गॅसपासून मिळणार मुक्ती, सौरचूलीवर मोफत शिजवा 3 वेळचं जेवण

Surya Nutan Solar Stove:  इंडियन ऑईलच्या (Indian Oil) संशोधन आणि विकास विभागानं सूर्य-नूतन या सौर चूलीची निर्मिती केली आहे. सध्या 60 ठिकाणी सौरचूलीचं परिक्षण सुरू असून ग्राहकांना फक्त एकदाच पैसे गुंतवावे लागतील. विशेष म्हणजे सूर्य नूतनच्या खरेदीवर सरकार अनुदानही देईल.

पुढे वाचा ...
  • Published by:  Suraj Sakunde

मुंबई, 8 जुलै : दिवसेंदिवस वाढणाऱ्या एलपीजीच्या किमतींमुळे अनेक घराचं बजेट बिघडत चाललं आहे. एलपीजी सिलिंडरची (LPG Cylinder)  किंमत आता एक हजार रुपयांच्या पुढे गेली आहे. या वेगाने वाढणाऱ्या गॅसच्या किमतीमुळे सर्वसामान्य हैराण झाले आहेत. यातून सुटका करण्यासाठी इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने (Indian Oil Corporation) नवा पर्याय समोर आणला आहे. इंडियन ऑईल एका नवीन सौर चूलीवर (Solar Stove) काम करत आहे. या सौर चूलीला 'सूर्य नूतन' (Surya Nutan Solar Stove) असं नाव देण्यात आले आहे. ग्राहक ज्यावेळी ही सौर चूल खरेदी करायला जाईल, फक्त त्याच वेळी त्याला पैसे मोजावे लागतील, परंतु त्यानंतर मात्र कोणताही खर्च ग्राहकाला करावा लागणार नाही. देखभाल आणि महिन्याचा कोणताही अतिरिक्त खर्च करावा लागणार नाही.

इंडियन ऑइलचा संशोधन आणि विकास विभाग स्वयंपाकासाठी सोलर कुकिंग सिस्टमवर संशोधन करत आहे. त्यांनी विकसित केलेल्या नवीन सौर यंत्रणेतून स्वयंपाक करण्याच्या तंत्रज्ञानाची देशात 60 ठिकाणी चाचणी केली जात असून लवकरच त्याचा वापर वाढवला जाण्याची शक्यता आहे. सूर्य नूतन नावाच्या इनडोअर सोलर कुकिंग सिस्टीमवरील प्रदर्शनात पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री, तसेच शहरी विकास मंत्री हरदीप सिंग पुरी म्हणाले की, हे एक क्रांतिकारी पाऊल आहे, यामुळं संपूर्ण व्यवस्था बदलणार आहे.

'सूर्य नूतन'ची 60 ठिकाणी चाचणी सुरू -

पुरी म्हणाले, "ही कल्पना चांगल्या प्रकारे पुढे नेली तर त्यामुळे व्यावसायिक शोषण कमी होईल आणि हे जर खाजगी क्षेत्रात उतरवलं तर तर जेवढे जास्त ग्राहक तयार होतील, तितकाच कमी खर्च येईल." हरदीप पुरी म्हणाले, सूर्य नूतन सोलर सिस्टीम 60 ठिकाणी चाचणी केली जात आहे. येत्या 2 ते 3 महिन्यांत ही चूल मोठ्या प्रमाणात घरगुती एलपीजी आणि व्यावसायिक सिलिंडरची जागा घेईल. हा प्रयोग यशस्वी झाल्यास देशातच नाही तर देशाबाहेरही तो वापरता येईल.

हेही वाचा-Indian Railways: PNRमधील 10 अंकांत नेमकं काय दडलंय? प्रत्येक क्रमांकात असते महत्त्वपूर्ण माहिती

जेव्हा सूर्य उगवणार नाही, तेव्हा वीजेवर होईल चार्ज-

इंडियन ऑइलनं सोलर कुकिंग सिस्टिमचं पेटंट घेतलं आहे. इंडियन ऑइलचे संशोधन आणि विकास विभागाचे संचालक एसएसव्ही रामकुमार यांनी सांगितलं की, सूर्य नूतनला स्वयंपाकघरात ठेवता येतं. यामध्ये थर्मल बॅटरी असते, जी सौर ऊर्जा साठवते. उष्णता कमी करण्यासाठी इन्सुलेट सामग्री काळजीपूर्वक निवडली गेली आहे. जेव्हा सूर्यप्रकाश कमी असतो, अशावेळी ही यंत्रणा इलेक्ट्रिक हिटिंगवर चालविली जाऊ शकते. रामकुमार म्हणाले की, कुकटॉप 750-वॅटच्या सोलर पॅनेलशी जोडलेला आहे आणि त्याची कार्यक्षमता सुमारे 80 टक्के आहे.

या प्रदर्शनात सहभागी असलेल्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, लेह, लक्षद्वीप, दिल्ली-एनसीआर आणि उदयपूरमधील 60 घरे आणि इतर संस्थांमध्ये सूर्य नूतनची चाचणी केली जात आहे. जेणेकरून वापरकर्त्यांना प्रणालीचा वापर वाढवण्यापूर्वी अभिप्राय मिळू शकेल.

चार्ज करण्यासाठी सूर्यप्रकाशाची गरज नाही-

आयओसीचे संशोधन आणि विकास संचालक एसएसव्ही रामकुमार यांनी मीडियाला सांगितले की, हा स्टोव्ह सोलर कुकरपेक्षा वेगळा आहे. कारण त्याला उन्हात ठेवण्याची गरज नाही, सूर्य नूतन चूल 4 सदस्यांच्या कुटुंबासाठी तीन वेळचे जेवण सहज बनवू शकतो.

हेही वाचा- आता Jio च्या माध्यमातून घेता येणार विठुरायाचं ऑनलाइन दर्शन; फॉलो करा सोपी प्रोसेस

'सूर्य नूतन' कशी काम करते? (How Surya Nutan Solar Stove works?)-

सूर्य नूतन चूल उन्हात ठेवण्याची गरज नाही. हा चूल छतावरील सोलर प्लेटला वायरने जोडली जाते. सौर प्लेटमधून येणारी ऊर्जा वायरद्वारे स्टोव्हपर्यंत पोहोचते, या प्रक्रियेत सूर्य नवीन स्टोव्हमध्ये ज्वलन होतं. सोलर प्लेट प्रथम थर्मल बॅटरीमध्ये सौर ऊर्जा साठवते, म्हणूनच सूर्यप्रकाश नसतानाही ती कार्य करत राहते.

'सूर्य नूतन'ची किंमत काय? (Price of Surya Nutan Solar Stove of IOC)-

सध्या, IOC या सौर चूलीचे प्राथमिक मॉडे लाँच करण्याची योजना आखत आहे. त्याचे व्यावसायिक मॉडेल अद्याप लाँच झालेले नाही. देशात 60 ठिकाणी या स्टोव्हची चाचणी सुरू आहे. त्याच्या किमतीबद्दल माहिती देताना IOC ने सांगितले की, सूर्य नूतन चूलीची किंमत 18,000 ते 30,000 रुपयांच्या दरम्यान असेल. या किमतीवर सरकार लोकांना सबसिडीही देऊ शकते. त्यानंतर या स्टोव्हची किंमत 10,000 ते 12,000 पर्यंत असण्याची शक्यता आहे.

First published:

Tags: LPG Price, Technology