नवी दिल्ली, 28 नोव्हेंबर: सोन्यामध्ये गुंतवणूक ही सुरक्षित गुंतवणूक (Investment in Gold) मानली जाते. भारतामध्ये तर अनेकजणं कधी ना कधीतरी सोन्यामध्ये गुंतवणूक करतातच. लग्न, वाढदिवस, सणाचे दिवस या काळात सोन्याची गुंतवणूक करण्याला पसंती दिली जाते. मात्र सोनेखरेदी करताना सराफाकडून असे विचारले जाते की तुम्हाला 22 कॅरेटचे (22 Karat and 24 Karat gold difference) सोने खरेदी करायचे आहे की, 24 कॅरेटचे? त्यामुळे तुम्ही देखील हे जाणून घेणे आवश्यक आहे की तुम्ही खरेदी करताय ते सोनं काय शुद्धतेचं आहे.
जर तुम्हाला कॅरेटबाबत माहित असेल तर ही बाब चांगली आहे आणि जर तुम्हाला माहित नसेल तर आम्ही तुम्हाला याबाबत माहिती देत आहोत. कॅरेटचा थेट शुद्धतेशी संबंध आहे. कॅरेट जितके जास्त तितके शुद्ध सोने. कॅरेट फक्त 0 ते 24 पर्यंत रेट केले आहे. त्यामुळे तुम्हाला हे समजले पाहिजे की 24 कॅरेट सोने हे सोन्याचे सर्वात शुद्ध स्वरूप आहे. 24 कॅरेट आणि 22 कॅरेटमधील फरक फक्त शुद्धतेचा आहे.
हे वाचा-पेट्रोल भरण्याआधी जाणून घ्या काय आहे आजचा भाव, इंधनाचे नवे दर जारी
24 कॅरेट सोने (The 24k gold)
24 कॅरेट सोने हे 99.9% शुद्ध असते. 'प्योअर गोल्ड' असा शब्द तुम्ही ऐकला असेल. तर प्योअर गोल्ड म्हणजे ज्यामध्ये अन्य कोणताही धातू मिश्र केलेला नाही. तुम्हाला हे देखील माहित असणे आवश्यक आहे की, 24 कॅरेटपेश्रा जास्त शुद्ध सोने नसते. भारतात 24 कॅरेट सोन्याची किंमत दररोज बदलते, कारण ते सर्वात शुद्ध सोने आहे. या शुद्धतेच्या सोन्याची किंमत 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्यापेक्षा जास्त आहे. 24 कॅरेट सोने तसे नरम असते आणि त्यापासून दागिने बनवणे खूप कठीण असते. म्हणूनच बाजारात बहुतांश दागिने 22 किंवा त्यापेक्षा कमी कॅरेटमध्येच उपलब्ध असतात.
हे वाचा-मोदी सरकार करत आहे स्वस्त सोन्याची विक्री, उद्यापासून मिळेल गुंतवणुकीची संधी
22 कॅरेट सोने (The 22k gold)
22 कॅरेट सोन्यामध्ये 22 भाग सोने असते आणि त्यातील दोन भाग इतर कोणत्याही धातूंचे मिश्रण असते. इतर धातूंबद्दल बोलायचे तर त्यात जस्त आणि तांबे असू शकतात. 22 कॅरेट सोने 24 कॅरेट शुद्धतेच्या सोन्यापेक्षा कठीण असते. कारण त्यात इतर धातू मिश्रीत असतात. 22 कॅरेट सोने दागिन्यांसाठी चांगले मानले जाते. 22 कॅरेट सोन्याला '916 Gold' असेही म्हणतात कारण त्यात 91.62 टक्के शुद्ध सोने असते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Gold, Gold and silver, Gold bond