जाहिरात
मराठी बातम्या / मनी / हेल्थ इंश्योरेंस घेताय? सब लिमिटचा फंडा अवश्य घ्या जाणून

हेल्थ इंश्योरेंस घेताय? सब लिमिटचा फंडा अवश्य घ्या जाणून

सब लिमिट म्हणजे काय?

सब लिमिट म्हणजे काय?

पॉलिसी घेण्यापूर्वी तुम्ही पूर्ण तपासणी केली तरच तुम्ही आरोग्य विमा पॉलिसीचा पूर्ण लाभ घेऊ शकता. विमा कंपनी कोणत्या कामासाठी किती पैसे देईल हे तुम्हाला माहीत असावे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 11 जानेवारी: आज आरोग्य विमा पॉलिसी ही प्रत्येक व्यक्तीची महत्त्वाची गरज बनली आहे. उपचाराचा खर्च खूप वाढला आहे. लोक आजारांनाही बळी पडू लागले आहेत. अशा परिस्थितीत आरोग्य विमा पॉलिसीचे महत्त्व आणि गरज वाढली आहे. तुम्हालाही विमा पॉलिसी घ्यायची असेल, तर पॉलिसी घेण्यापूर्वी तुम्हाला नियम आणि अटी आणि विमा शब्दावली समजून घेणे आवश्यक आहे. पॉलिसी पूर्ण समजून न घेतल्यास, तुम्ही पॉलिसीचा पूर्ण लाभ घेऊ शकणार नाही. सब लिमिट देखील असाच एक नियम आहे, जो जाणून घेणे खूप महत्वाचे आहे. बहुतेक लोक पॉलिसी घेताना सब लिमिटची माहिती घेत नाहीत आणि नंतर क्लेम सेटलमेंटच्या वेळी पश्चात्ताप करतात. सब-लिमिट ही विमा पॉलिसीमध्ये प्रदान केलेल्या कव्हरेजच्या रकमेची मर्यादा आहे. अर्थात ही कॅप पॉलिसीमध्ये निश्चित रक्कम म्हणून व्यक्त केली जाते. काही रोग किंवा उपचारांसाठी तसेच काही सेवांसाठी सब लिमिट ठेवल्या जातात. काहीवेळा सब लिमिट विम्याच्या रकमेची टक्केवारी म्हणून दर्शविली जाते आणि काहीवेळा ती निश्चित रक्कम म्हणून नमूद केली जाते.

आता कमी बजेटमध्ये करा लडाखची सैर! IRCTC देतेय खास संधी

समजून घ्या सब लिमिटचा फंडा

समजा तुमच्या पॉलिसीची विमा रक्कम 5 लाख आहे. पॉलिसीमध्ये कोणत्याही आजाराच्या उपचारासाठी सब लिमिट ठेवण्यात आली आहे. जर सब लिमिट रु. 50,000 असेल आणि तुमचा आजारावरील उपचाराचा खर्च रु. 100,000 वर गेला असेल. या स्थितीत विमा कंपनी फक्त 50,000 रुपये देईल. कारण पॉलिसीमध्ये त्यांनी त्या आजाराच्या उपचारासाठी सब लिमिट आधीच नमूद केली होती. आता जरी तुमच्या पॉलिसीची विमा रक्कम 5 लाख रुपये असली तरी, सब लिमिटमुळे तुम्हाला उर्वरित 50,000 रुपये तुमच्या खिशातून भरावे लागतील.

क्रेडिट कार्डने रेंट भरता? मग ही माहिती असायलाच हवी

सेवांवरही सब लिमिट

केवळ रोगच नाही तर विमा कंपन्या काही सेवांवरही सब लिमिट ठेवतात. सामान्यतः ते रुग्णालयाच्या खोलीचे भाडे, ICU चार्जेज, रुग्णवाहिका चार्जेज किंवा OPD चार्जेजसह अनेक सेवांवर लागू होते. उदाहरणार्थ, विमा कंपनी रूग्णालयाच्या खोलीच्या भाड्यावर सब लिमिट ठेवून एक अट ठेवू शकते की ती भाडे म्हणून दररोज फक्त रु.3000 भरेल. जर तुम्ही हॉस्पिटलमध्ये अशी खोली घेतली, ज्याचे भाडे 5 हजार रुपये असेल तर तुम्हाला वरील दोन हजार रुपये तुमच्या खिशातून द्यावे लागतील.

SBI बँकेत अकाउंट असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, आता…

सब लिमिट सम एश्‍योर्ड राशीच्या टक्केवारीत देखील असू शकते. समजा तुमची विम्याची रक्कम रु. 5 लाख आहे आणि रुम भाड्याची सब लिमिट विम्याच्या रकमेच्या 2% आहे, तर तुम्ही रु. 10,000 पर्यंत रुम भाड्यासाठी क्‍लेम करू शकता. यापेक्षा जास्त नाही. तुमची पॉलिसी 5 लाख रुपयांची असली तरीही तुम्ही एवढेच क्लेम करु शकता. यामुळे विमा पॉलिसी घेण्यापूर्वी, तुम्ही त्यात समाविष्ट असलेल्या सर्व सब लिमिट्सची माहिती घ्यावी. अन्यथा नंतर तुम्हाला दवाखान्यात अर्धे पैसे भरावे लागू शकतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात