देशात क्रेडिट कार्डचा ट्रेंड वाढत आहे. लोक खरेदी करण्यापासून ते रिचार्ज आणि बिल पेमेंटपर्यंत सर्व काही क्रेडिट कार्डद्वारे करतात. अनेकजण घराचे भाडेही क्रेडिट कार्डने भरतात.
पेटीएम, क्रेड, नो ब्रोकर, पेझॅप, रेड जिराफ अशा अनेक प्लॅटफॉर्मद्वारे लोक क्रेडिट कार्डने भाडे देतात. मात्र, आता असे करणे महागणार आहे. क्रेडिट कार्डद्वारे भाडे भरण्यासाठी किती चार्ज आकाराला जाईल याविषयी जाणून घेऊया...
थर्ड पार्टी प्लॅटफॉर्मद्वारे आकारल्या जाणार्या चार्जसोबतच, बँकांनीही एक्सट्रा चार्ज आकारण्यास सुरुवात केली आहे. आयसीआयसीआय बँक, एसबीआय, बँक ऑफ बडोदा, आयडीएफसी फर्स्ट बँक यांसारख्या अनेक बँका त्यांच्या क्रेडिट कार्ड धारकांकडून भाडे भरण्यासाठी एक्सट्रा फीस आकारत आहेत.
अनेक भाडेकरू Paytm, Cred, NoBroker, PayZap, Red Giraffe, Mobikwik, PhonePe सारख्या प्लॅटफॉर्मवर रेसिपिएंट च्या ऑप्शनमध्ये घरमालकाच्या बँक अकाउंटचे डिटेल्स किंवा UPI अॅड्रेस टाकत असत आणि आणि क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट करायचे. हे थर्ड-पार्ट प्लॅटफॉर्म क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केल्यास कन्वीनियंस फीस घेतात.
Mobikwik- क्रेडिट कार्ड रेंट पेमेंटवर 2.36% एक्सट्रा चार्ज PhonePe- क्रेडिट कार्ड रेंट पेमेंट पेमेंटवर 2% एक्सट्रा चार्ज Paytm- क्रेडिट कार्डने भाडे भरल्यास 1.75% एक्सट्रा चार्ज