मराठी बातम्या /बातम्या /मनी /SBI बँकेत अकाउंट असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, आता...

SBI बँकेत अकाउंट असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, आता...

SBI करू शकते मोठी घोषणा

SBI करू शकते मोठी घोषणा

स्टेट बँक ऑफ इंडियाने अखेरच्या वेळी 13 डिसेंबर 2022 फिक्सड डिपॉझिटचे रेट बदलले होता. आता ते बँकेकडून पुन्हा बदलता येईल.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 8 फेब्रुवारी: बुधवारी 8 फेब्रुवारी 2023 रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी कर्जदारांना मोठा धक्का दिला. मध्यवर्ती बँकेने रेपो रेट 6.25 टक्क्यांवरून 6.50 टक्के केला आहे. RBI ने सलग सहाव्यांदा त्यात वाढ केली आहे. दरम्यान, CNBC Awaaz च्या बातमीनुसार एसबीआय आपल्या ग्राहकांना आनंदाची बातमी देणार आहे.

SBI करू शकते मोठी घोषणा

CNBC Awaaz ला मिळालेल्या Exclusive माहितीनुसार, देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) फिक्स डिपॉझिटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना मोठे गिफ्ट देणार आहे. बँक एफडी व्याजदरात वाढ करण्याची घोषणा करू शकते. अशा वेळी, तुम्ही कर्जाच्या वाढत्या ईएमआयमुळे चिंतेत असाल, तर एफडीमध्ये गुंतवणूक केल्याने तुम्हाला मोठा दिलासा मिळू शकतो. SBI 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंतच्या कालावधीसाठी 3 टक्के ते 6.75 टक्के व्याजदर देत आहे.

तुमचं HDFC बँकेंत अकाउंट आहे? मग हे बदल वाचाच

फिलहाल इतनी है SBI की Fixed Deposit दरें

कालावधीसामान्य नागरिकांसाठीज्येष्ठ नागरिकांसाठी
7  दिवस ते 45 दिवस3 टक्के3.5 टक्के
46 दिवस ते 179 दिवस4.5 टक्के5 टक्के
180 दिवस ते 210 दिवस5.25 टक्के5.75 टक्के
211 दिवस ते 1 वर्षांपेक्षा कमी5.75 टक्के6.25 टक्के
1 वर्ष ते 2 वर्षांपेक्षा कमी6.75 टक्के7.25 टक्के
2 वर्षे ते  3 वर्षांपेक्षा कमी6.75 टक्के7.25 टक्के
3 वर्षे ते 5 वर्षांपेक्षा कमी6.25 टक्के6.75 टक्के
5 वर्षे ते 10 वर्षांपेक्षा कमी6.25 टक्के7.25 टक्के

रेपो रेट वाढला तरी EMI चे ओझे कमी हवेय? ही ट्रिक ठरेल फायदेशीर

SBI चे Fixed Deposit रेट खालीलप्रमाणे आहेत

ज्यावेळी RBI कडून रेपो रेटमध्ये वाढ होते तेव्हा बँकांकडून Fixed Deposit चे रेटही वाढवले ​​जातात. इतर गुंतवणूक पर्यायांच्या तुलनेत एफडी हा कमी जोखमीचा पर्याय मानला जातो. सध्या अनेक बँका एफडीवर वार्षिक आठ टक्क्यांहून अधिक व्याजदर देत आहेत. आता SBI कडून लवकरच मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो.

First published:

Tags: Bank details, Fixed Deposit, SBI