मराठी बातम्या /बातम्या /मनी /Mutual Fund म्हणजे काय? जाणून घ्या म्युच्युअल फंडाविषयी महत्त्वाचं

Mutual Fund म्हणजे काय? जाणून घ्या म्युच्युअल फंडाविषयी महत्त्वाचं

म्युच्युअल फंड (Mutual Fund) म्हणजे लोकांनी गुंतवलेले पैसे एकत्रितरीत्या शेअर मार्केटमध्ये (Share Market) गुंतवले जातात आणि त्यावर मिळणारा लाभांश सर्वांना समान वाटून दिला जातो.

म्युच्युअल फंड (Mutual Fund) म्हणजे लोकांनी गुंतवलेले पैसे एकत्रितरीत्या शेअर मार्केटमध्ये (Share Market) गुंतवले जातात आणि त्यावर मिळणारा लाभांश सर्वांना समान वाटून दिला जातो.

म्युच्युअल फंड (Mutual Fund) म्हणजे लोकांनी गुंतवलेले पैसे एकत्रितरीत्या शेअर मार्केटमध्ये (Share Market) गुंतवले जातात आणि त्यावर मिळणारा लाभांश सर्वांना समान वाटून दिला जातो.

मुंबई, 25 नोव्हेंबर : आजकाल गुंतवणूक करण्यासाठी चांगला परतावा देणारा जोखीम नसलेला पर्याय म्हणजे म्युच्युअल फंड. म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे फायद्याचं असतं. बँकेतील व्याजापेक्षा जास्त परतावा यात मिळतो. दरमहा अगदी किमान ठराविक रक्कम भरूनही यात गुंतवणूक करता येते. गुंतवणूक करायची तर म्युच्युअल फंडात करा अशा अनेक गोष्टी ऐकत असतो. आपल्यापैकी अनेकजण म्युच्युअल फंड योजनांमध्ये गुंतवणूकही करत असतील, मात्र आजही असे अनेक लोक आहेत, ज्यांना म्युच्युअल फंड म्हणजे नेमकं काय याची माहिती नसते. त्याची माहिती देणारा हा लेख....

म्युच्युअल फंड म्हणजे नेमकं काय ?

म्युच्युअल फंड (Mutual Fund) म्हणजे लोकांनी गुंतवलेले पैसे एकत्रितरीत्या शेअर मार्केटमध्ये (Share Market) गुंतवले जातात आणि त्यावर मिळणारा लाभांश सर्वांना समान वाटून दिला जातो. शेअर मार्केटमध्ये ही गुंतवणूक करण्याचे काम एखादी कंपनी करत असते. अशा कंपनीला अॅसेट मॅनेजमेंट कंपनी (Asset Management Company) म्हटलं जातं. ही कंपनी वेगवेगळ्या म्युच्युअल फंड योजना सादर करत असते. त्यात आपल्यासारख्या अनेक गुंतवणूकदारांनी गुंतवलेल्या पैशांचं व्यवस्थापन ही कंपनी करते. ही कंपनी या सर्व निधीची एकत्रितरीत्या शेअर्स (Shares-Equity), सरकारी रोखे (Government Bonds), डिबेंचर्स (Debentures) आदी विविध पर्यायांमध्ये गुंतवणूक करते आणि त्यावर जो काही नफा- तोटा होतो तो सर्वांना वाटला जातो.

म्युच्युअल फंडाचे व्यवस्थापन करणाऱ्या कंपन्यांमध्ये या निधीचे व्यवस्थापन करण्यासाठी फंड मॅनेजर (Fund Manager) असतात. ते शेअर मार्केटचा अभ्यास करून चांगल्या वाढणाऱ्या शेअर्समध्ये हा निधी गुंतवतात. सर्वसामान्य गुंतवणुकदाराला थेट शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचे धाडस नसते, मात्र शेअर मार्केटमधील गुंतवणुकीचा लाभ घेण्याची इच्छा असते. अशावेळी म्युच्युअल फंडाचा मार्ग उत्तम ठरतो.

Explainer : चांगल्या क्रिप्टोकरन्सीचे गुणधर्म कोणते?

ही गुंतवणूक शेअर मार्केटशी निगडीत असते. त्यामुळे यावर मिळणारा परतावा चांगला असला तरी फिक्स नसतो. त्यात चढ-उतार होत असतात. त्यामुळे एखाद्या वर्षी एखाद्या फंडाची कामगिरी बिघडते तर एखाद्या वर्षी ती अतिशय लक्षणीय होते. काही वर्षे आपण सतत गुंतवणूक केल्यानं खराब कामगिरी असलेल्या वर्षातील कमी भरून निघते आणि सरासरी परतावा चांगला मिळतो. त्यामुळे म्युच्युअल फंडात दीर्घकाळ गुंतवणूक करणं लाभदायी ठरतं.

म्युच्युअल फंड कंपन्यांवर शेअर बाजार नियंत्रक अर्थात सेबीचं (Securities and Exchange Board of India-SEBI) नियंत्रण असतं. सेबीने म्युच्युअल फंड कंपन्यांसाठी अनेक नियम बनवले आहेत. जेणेकरून गुंतवणूकदारांचे पैसे सुरक्षित राहावेत. एखादी म्युच्युअल फंड कंपनी ज्या पर्यायात गुंतवणूक करणार असेल त्यानुसार योजना दाखल करते.

ATM कार्डची मुदत संपल्यानंतर तुम्हाला नवं कार्ड मिळालं नाही तर काय करायचं?

उदाहरणार्थ, एखादी कंपनी शेअर्समध्येच गुंतवणूक करत असेल तर ती इक्विटी फंड योजना आणते. कर्ज रोख्यात गुंतवणूक करत असेल तर त्या योजनेला डेट फंड म्हटले जाते. काही कंपन्या थोडा हिस्सा शेअर्समध्ये तर थोडा कर्ज रोख्यात गुंतवतात. अशा योजनांना हायब्रीड फंड्स म्हटले जाते. लिक्विड फंड आणि गोल्ड म्युच्युअल फंडदेखील उपलब्ध आहेत. ज्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये फंड कंपनी गुंतवणूक करणार त्या शेअरच्या प्रकारानुसार स्मॉल कॅप, मिड कॅप किंवा मल्टी कॅप असे प्रकारही म्युच्युअल फंडात असतात.

वेगवेगळया म्युच्युअल फंड कंपन्यांच्या वेगवेगळ्या योजना असतात. काही योजनांमध्ये एकाचवेळी मोठी रक्कम गुंतवण्याचा पर्याय असतो, तर काही योजनांमध्ये दरमहा ठराविक रक्कम गुंतवण्याचा म्हणजेच एसआयपीचा (SIP) पर्याय असतो. म्युच्युअल फंडात एकरकमी (Lumpsum) गुंतवणूक करायची असेल तर कमीत कमी 5000 रुपयांची आवश्यकता असते.

सर्वसामान्य ग्राहक वर्गासाठी एकाचवेळी मोठी रक्कम गुंतवण्याऐवजी दरमहा थोडी थोडी रक्कम गुंतवणे अधिक सोपे असते. त्यामुळे एसआयपी हा सर्वाधिक लोकप्रिय पर्याय आहे. अगदी 500 रुपयांपासून एसआयपी सुरू करता येते. काही फंड हाउसेस तर 100 रुपयांनीदेखील एसआयपी सुरू करण्याची परवानगी देतात. सामान्यपणे काही वर्षांनंतरच्या विशिष्ट आर्थिक गरजेनुसार म्युच्युअल फंडांत गुंतवणूक करण्यासाठी एसआयपीचा पर्याय निवडला जातो. मुलीचं लग्न, मुलांची शिक्षण अशी दीर्घकालीन ध्येय समोर ठेवून एसआयपी केली जाते.

खासगी Cryptocurrencies म्हणजे काय? सार्वजनिक क्रिप्टोपेक्षा त्या वेगळ्या कशा

म्युच्युअल फंड योजनेचे दोन प्रकार असतात ते म्हणजे ओपन-एन्डेड आणि क्लोज एन्डेड. ओपन-एन्डेड योजनेमधून कधीही पैसे काढता येतात. अगदी एसआयपी सुरू ठेवूनदेखील जमा शिल्लकीतील काही रक्कम काढण्याची सोय असते. क्लोज एन्डेडमध्ये मात्र हा पर्याय उपलब्ध नसतो. गुंतवणूकदाराला काही आर्थिक अडचण आल्यास काही महिन्यांकरिता एसआयपी स्थगित करता येते. एक साधा फॉर्म भरून 3 ते 6 महिने एसआयपी थांबवता येते. म्युच्युअल फंड योजनांना भांडवली लाभावरील कर (Tax Benefit)आणि लॉक-इनचे (Lock-In) नियमही लागू होतात. एकरकमी गुंतवणूकीला तसंच एसआयपीलादेखील तीन वर्षांची मुदत अनिवार्य असते. त्या आधी त्यातील गुंतवणूक काढून घेता येत नाही. कर बचतीचा लाभदेखील म्युच्युअल फंड योजनांवर घेता येतो. त्यासाठी खास योजना सादर केल्या जातात. त्यामुळे उत्तम परतावा, जोखीम शून्य आणि कर बचतीचा फायदा देणाऱ्या अशा म्युच्युअल फंडाचा पर्याय गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम मानला जातो.

First published:

Tags: Investment, Money, Mutual Funds