मुंबई : कोरोनानंतर सोन्याचे दर खाली उतरलेच नाहीत. जिथल्या तिथे दर मागे पुढे होत राहिले आहेत. मागच्या पाच वर्षात जवळपास 14 हजारहून अधिक रुपयांनी सोन्याच्या किंमती वाढल्या आहेत. येत्या काळात आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे धाकधूक वाढली. सोन्यात गुंतवणूक आता करावी का? घेतलेलं सोनं विकावं का असे अनेक प्रश्न देखील तुम्हाला पडत असतील आज याबद्दल जाणून घेऊया.
गेल्या दोन वर्षात जवळपास सोन्याचे दर 9 हजार रुपयांनी वाढल्याचं दिसत आहे. जागतिक स्तरावरील घडामोडी, रशिया युक्रेन युद्ध यामुळे गेल्या काही महिन्यांमध्ये सोन्याचे दर जास्त वाढत आहेत.
पहिला मुद्दा तर हा तुम्हाला जेव्हा अत्यावश्यक आहे आणि सगळे पर्याय संपले तेव्हा तुम्ही सोनं हा पर्याय निवडा. तेव्हाच तुम्ही सोनं विकण्याचा निर्णय घ्या. अन्यथा सोन्यावर लोन घेणं हा देखील एक उत्तम पर्याय आहे. मात्र सगळे पर्याय संपल्यानंतर सोनं विकण्याचा निर्णय घ्या.
Gold Prices Today: गुढीपाडव्या आधी सोनं ओलांडणार 'साठी', आजचा भाव वाढवेल तुमची चिंता!
सोन्याची किंमत आतापर्यंत फार कमी झाले नाही. गेल्या 97 वर्षात सोन्याची किंमत वाढतच आहे. त्यामुळे सोन्यात एका मर्यादेपर्यंत गुंतवणूक करणं हा उत्तम पर्याय आहे. तुम्ही आयकर नियम समजून त्यानुसार सोन्यात गुंतवणूक करू शकता. अर्थात त्यात दागिने तुम्ही गुंतवणूक म्हणून घेत असाल तर मात्र त्यामध्ये घट देखील येते. त्यामुळे पैसे कमी मिळू शकतात.
रुपयाचं मूल्य घसरतं किंवा जेव्हा मंदीचे संकेत मिळतात तेव्हा लोक सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे वळतात. त्यामुळे तुम्ही आताही जरी वाढत असेल तर थोडी थोडी सोन्यात गुंतवणूक करायला हरकत नाही. तुम्हाला पुढे त्याचा फायदाच होईल.
गुढीपाडव्यालाच का खरेदी करतात सर्वात जास्त सोनं?
सोनं विकण्यासाठी उत्तम काळ असा नाही. जाणकारांच्या मते सोनं हे अडचणीच्या काळात कामी येतं. पैशांची खूप जास्त गरज असते तेव्हा सोनं विकण्याचा निर्णय घ्यावा. तो एक विश्वसनीय स्त्रोत आहे. तुमची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी सोनं मदत करतं. त्यामुळे या सगळ्याचा विचार करून सोनं विकण्याचा निर्णय घ्यावा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Gold, Gold and silver, Gold and silver prices today, Gold prices today, Gudi Padwa 2023, Sovereign gold bond scheme