Gold Prices Today: सोन्याच्या दरात विक्रमी वाढत होताना पाहायला मिळतेय. आज 10 ग्रॅम सोन्याचा भाव 60,000 रुपयांच्या जवळ आलाय. सोन्याच्या दरात मोठी वाढ झाल्यामुळे खरेदीदारांची चिंता वाढणार आहे. कारण दोन दिवसांवर गुढीपाडवा आलाय. यासोबत लग्नसराई देखील सुरु आहे. अशा वेळी सोनं महागल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलीच झळ बसणार आहे. सराफा बाजारात सध्या 24 कॅरेट सोन्याचा भाव 59,600 रुपयांच्या वर आहे. सोन्याचा भाव 1,451 रुपयांनी वाढला. गेल्या शुक्रवारी 10 ग्रॅम सोन्याचा भाव 58,220 वर बंद झाला होता. सोनं लवकरच 60150 रुपयांच्या दिशेने वाढू शकते. असं वृत्त मनी कंट्रोलने दिलं आहे. म्हणजेच गुढीपाडव्याला सोन्याचा दर ‘साठी’ ओलांडेल अशी शक्यता आहे. यामुळे खरेदीदारांची चिंता चांगलीच वाढणार आहे. सोन्याच्या किंमती आज म्हणजेच 20 मार्चला 59,6०० रुपयांच्या वर आहे. तर 22 कॅरेट गोल्ड ज्यामध्ये जास्तीत जास्त ज्वेलरी तयार केल्या जातात त्यामध्येही तेजी आली आहे. 22 कॅरेज गोल्ड 1330 रुपयांनी वाढून 54,659 रुपयांवर व्यवहार करत आहे. जर तुम्हीही गोल्ड ज्वेलरी खरेदी करण्याचा प्लान करत असाल तर आजचा भाव जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे.
गुढीपाडव्याला बायकोला सोनं घेताय सावधान! तुमचीही होऊ शकते फसवणूकका वाढताय सोन्याच्या किंमती?
सध्या सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होतेय. जर तुम्ही सध्या सोन्यात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर सोन्यात गुंतवणूक करून तुम्ही नफा कमवू शकता. दुसरीकडे, जर तुम्ही दागिने बनवण्याचा विचार करत असाल तर ते तुमचे नुकसान होऊ शकते. सध्या सोन्या-चांदीच्या बाजारात तेजी आहे. अमेरिका आणि युरोपसह संपूर्ण जगाचा शेअर बाजार हादरून गेला आहे. त्यामुळे सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. यामुळे सोने 59 हजारांच्या पुढे पोहोचले आहे.
गुढीपाडव्यालाच का खरेदी करतात सर्वात जास्त सोनं?गोल्डच्या किंमतींवर एक्सपर्ट काय सांगतात
मनी कंट्रोलने दिलेल्या माहितीनुसार, एक्सपर्टच्या मते, सोन्याच्या भाव यावर्षी 64,000 रु.भाव पार करु शकतो. सोन्याचा भाव सध्या 60 हजारांच्या जवळपास आलाय.
अशा प्रकारे जाणून घ्या सोन्याचा भाव
तुम्हाला घरबसल्या सोन्या-चांदीचे नवीन दर जाणून घ्यायचे असतील तर 8955664433 वर मिस कॉल देऊन 24 कॅरेट, 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याचे दर जाणून घेऊ शकता. काही वेळानंतर तुम्हाला मेसेजद्वारे सोन्याचे नवीन दर मिळतील. तसेच, तुम्ही www.ibja.co किंवा ibjarates.com आणि mcxindia.com वेबसाइटला भेट देऊन सोन्या-चांदीच्या नवीनतम किंमती जाणून घेऊ शकता.