मराठी बातम्या /बातम्या /मनी /गुढीपाडव्यालाच का खरेदी करतात सर्वात जास्त सोनं?

गुढीपाडव्यालाच का खरेदी करतात सर्वात जास्त सोनं?

गुढीपाडव्याला मोठ्या प्रमाणात सोनं खरेदी केली जाते. या दिवशी सोनं खरेदी करणं शुभ मानलं जातं.

गुढीपाडव्याला मोठ्या प्रमाणात सोनं खरेदी केली जाते. या दिवशी सोनं खरेदी करणं शुभ मानलं जातं.

गुढीपाडव्याला मोठ्या प्रमाणात सोनं खरेदी केली जाते. या दिवशी सोनं खरेदी करणं शुभ मानलं जातं.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई: गुढीपाडवा हा एक महत्त्वाचा सण. गुढी पाडव्याला हिंदू नववर्षाची सुरुवात होते. या दिवशी घरी नवीन वस्तू खरेदी करणं, भेटवस्तू देणं एवढंच नाही तर सोनं खरेदी करण्यालाही महत्त्व आहे. या दिवशी घरात गुढी उभारुन त्याची मनोभावे पूजा केली जाते. याशिवाय घरी नवीन वस्तू घेतल्या जातात.

गुढीपाडव्याला मोठ्या प्रमाणात सोनं खरेदी केली जाते. या दिवशी सोनं खरेदी करणं शुभ मानलं जातं. या दिवशी नवीन वस्तू खरेदी केल्याने किंवा गुंतवणूक केल्याने त्याचे परिणाम लाभदायी असतात असं ज्योतिष मानतात.

या दिवशी सराफ देखील मोठ्या ऑफर्स ग्राहकांना देतात. काहीजण आवड म्हणून तर काही जण गुंतवणूक म्हणून सोनं खरेदी करतात. नववर्षात नात्यातील गोडवा जपण्यासाठी देखील सोन्याची किंवा चांदीची वस्तू एकमेकांना भेट म्हणून दिली जाते.

सणाच्या निमित्ताने तुम्ही सोनं खरेदी केली तर ती तुमची एक उत्तम गुंतवणूक पण होते. कदाचित पूर्वीपासून हाच विचार करून सोनं किंवा दागिने देखील खरेदी करण्याला महत्त्व प्राप्त झालं असावं. आता दागिन्यांचा ट्रेन्ड जरी बदलला तरी

जर तुम्ही गुंतवणूक म्हणून सोनं खरेदी करणार असाल तर तुम्ही डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करू शकता. याशिवाय तुम्ही 1 ग्रॅम 24 कॅरेटचा कॉईन देखील घेऊ शकता. तुम्ही दागिने घेणार असाल तर विशेष काळजी घ्या.

दागिने खरेदी करताना दर तपासून पाहा. याशिवाय त्यावर होलमार्क आहे की नाही ते देखील तपासून घ्या. दागिने घेताना सराफाला त्याबाबत सविस्तर माहिती विचारा. ज्यामुळे फसवणूक टाळता येऊ शकते. त्याच्याकडून GST असलेलं पक्क बिल घ्या.

दागिने खरेदी करताना शक्यता 22 किंवा 18 कॅरेटमध्ये करा. 18 कॅरेट मधील दागिने अतिशय मजबूत होतात आणि ते कमी ग्रॅममध्येही तुम्हाला चांगले आणि मजबूत दागिने घेता येतात. त्यामुळे तुमच्याकडे हा एक चांगला पर्याय आहे.

First published:
top videos

    Tags: Gold, Gold and silver, Gold and silver prices today, Gold prices today, Gudi Padwa 2023