मुंबई, 27 जून : तुम्हाला कमी पैशात व्यवसाय करायचा असेल तर एक चांंगला पर्याय आहे. ट्राउट मत्स्यपालनचा व्यवसाय तुम्ही करू शकता. या व्यवसायाला नाबार्ड 20 टक्के सबसिडी देतं. तुम्ही 2.40 लाख रुपये गुंतवून ट्राउट फार्मिंग करू शकता. 20 टक्के सबसिडी मिळत असेल तर तुम्हाला फक्त 1.80 लाख रुपये गुंतवावे लागतील. काय आहे ट्राउट फार्मिंग? ट्राउट एकक प्रकारचे मासे आहेत. ते स्वच्छ पाण्यात सापडतात. भारतात काही राज्यांमध्ये हे मासे भरपूर आहेत. हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, उत्तराखंड, तामिळनाडू, केरळ इथे हे मासे भरपूर प्रमाणात मिळतात. या राज्यांमध्ये ट्राउट प्राॅडक्शनच्या सुविधाही आहेत. मोदी सरकारच्या ‘या’ योजनेत मिळेल जास्त पेन्शन, होऊ शकतो निर्णय किती लागणार खर्च? नाबार्डच्या रिपोर्टनुसार 15x2x1.5 मीटरचा रेसवे तयार करण्यासाठी जवळजवळ 1 लाख रुपये खर्च येईल. बाकी सर्व साधनं 6 हजार रुपयांमध्ये मिळतील. त्यात हँड नेट, बालदी, टब, थर्माकोल बाॅक्स यांचा समावेश आहे. 22,500 रुपयांत सीड आणि 1.45 लाख रुपयांत फीड येईल. तुम्ही कर्ज घेतलं असेल तर पहिल्या वर्षाचं व्याज 26, 700 रुपये होईल. याप्रमाणे तुम्हाला पहिल्या वर्षी एकूण 3 लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. त्यावर तुम्हाला 20 टक्के म्हणजे जवळजवळ 60 हजार रुपये सबसिडी मिळेल. तुम्ही एससी किंवा एसटीमध्ये असाल तर तुम्हाला 25 टक्के सबसिडी मिळेल. आता गोदरेज घराण्यामध्ये प्रॉपर्टीवरून वाद, हे मुंबई आहे कनेक्शन यंदा पंढरीच्या वारीत सॅनिटरी नॅपकिन्सची वेंडिंग मशिन्स किती होईल कमाई? या रिपोर्टनुसार पहिल्या वर्षी तुमची विक्री जवळजवळ 3.23 लाख रुपये होईल. पण पुढच्या वर्षी भांडवल किंमत कमी होईल आणि तुमची विक्री 3.50 लाख रुपये होईल. हल्ली असे बरेच व्यवसाय आहेत ज्यांना सरकार बरीच मदत करतं. त्यासाठी सरकारच्या वेगवेगळ्या योजनाही आहेत. VIDEO: चंद्रकांत पाटलांवरून अजित पवारांचा मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







