मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /आता Corona vaccination certificate ची गरज नाही; हातातच बसवली जाणार Scannable Microchip

आता Corona vaccination certificate ची गरज नाही; हातातच बसवली जाणार Scannable Microchip

Microchip show corona vaccination status : माइक्रोचिप बसवलेला हात स्कॅन करताच तुम्ही कोरोना लस घेतली आहे की नाही हे समजणार.

Microchip show corona vaccination status : माइक्रोचिप बसवलेला हात स्कॅन करताच तुम्ही कोरोना लस घेतली आहे की नाही हे समजणार.

Microchip show corona vaccination status : माइक्रोचिप बसवलेला हात स्कॅन करताच तुम्ही कोरोना लस घेतली आहे की नाही हे समजणार.

    मुंबई, 30 डिसेंबर : संपूर्ण जग गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाशी (corona) सामना करत आहे. गेल्या काही महिन्यांत कोरोनाचा प्रसार ओसरत असल्याचं चित्र दिसून येत होतं. परिस्थिती हळूहळू नियंत्रणात येऊ लागली होती; पण कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन व्हॅरिएंटने चिंता वाढवली आहे. या व्हॅरिएंटचा संसर्ग होणाऱ्यांची वाढती संख्या पाहता (Omicron Variant) तिसऱ्या लाटेचा धोका पुन्हा एकदा वर्तवला जात आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी लसीकरण (Corona vaccination) हेच शस्त्र आहे. त्यामुळे आता कुठेही जायचं असेल तर लसीकरण प्रमाणपत्र (Corona vaccination certificate) दाखवावं लागतं. पण आता तर तुमचं लसीकरण झालं आहे, हे दाखवणारी मायक्रोचीपही तयार झाली आहे (Microchip in arm show corona vaccination status).

    अनेक जण लसीकरण गांभीर्याने घेत नसल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे प्रत्येकाने लस घ्यावी यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. प्रवास करताना किंवा अत्यावश्यक सेवांसाठी लस घेतल्याचं प्रमाणपत्र दाखवणं अनिवार्य करण्यात आलं आहे. नागरिकांनी लस घेतली आहे की नाही, हे तपासण्यासाठी (Vaccination Status) स्वीडनमध्ये (Sweden) एक शास्त्रीय आविष्कार तयार करण्यात आला आहे. हा आविष्कार म्हणजे एक मायक्रोचिप आहे. ही मायक्रोचिप हातामध्ये बसवली जाईल. ही चीप स्कॅन (Scannable Microchip) केल्यानंतर संबंधित व्यक्तीने लस घेतली आहे की नाही हे कळेल.

    हे वाचा - आवाजावरुनही करू शकता Omicron चं निदान; 'हे' आहे पहिलं लक्षण

    स्वीडनमधल्या Dsruptive Subdermals या तंत्रज्ञानविषयक स्टार्टअप (Start Up Ideas) कंपनीने स्कॅनेबल मायक्रोचिप तयार केली आहे. प्री-प्रोग्राम्ड स्कॅनेबल इम्प्लांट चिप 2 मिलिमीटर ते 16 मिलिमीटर आकारात उपलब्ध आहे. ती लोकांच्या हातामध्ये बसवली जाणार आहे. त्यावरून व्हॅक्सिनेशन स्टेटस कळेल. तसंच याचा फायदा म्हणजे चिप हातात बसवल्यानंतर नागरिकांना व्हॅक्सिनेशन सर्टिफिकेट सोबत बाळगण्याची गरज पडणार नाही.

    कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक हॅनेस स्जोबलाड AFP ला सांगितलं, की 'मी स्वतः ही चिप हातात बसवली आहे. मी माझा कोविड पासपोर्ट सोबत घेऊनच फिरतो. ही चिप बसवण्याचा खर्च 100 युरो असून फोनवर स्कॅन केल्यानंतर ती आपलं लसीकरण स्टेटस दर्शवते. या चिपच्या माध्यमातून युरोपियन डिजिटल कोविड प्रमाणपत्र PDF स्वरूपात दाखवलं जातं. त्यामुळे बाहेर कुठेही शॉपिंग सेंटर, मॉलमध्ये जाताना किंवा प्रवासादरम्यान तुम्हाला लसीकरण प्रमाणपत्र सोबत बाळगण्याची गरज नाही. तुम्ही या चिपद्वारे व्हॅक्सिनेशन स्टेटस दाखवू शकता.'

    हे वाचा - ‘प्रिकॉशन डोस’ म्हणजे काय? त्यासाठी कोणती लस वापरणार? सर्व प्रश्नांची उत्तरं

    दरम्यान, या चिपवर अनेकांनी ट्रॅकिंगचा संशय व्यक्त केला आहे; पण तसं नसून या चिपमध्ये बॅटरी नसल्याने केवळ स्कॅन केल्यावरच ती काम करते, असं स्पष्टीकरण स्जोबलाड यांनी दिलं आहे.

    First published:

    Tags: Corona vaccination, Corona vaccine, Coronavirus, Technology