• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • 5 तास सलग काम केल्यानंतर ब्रेक आवश्यक, लवकरच बदलू शकते ऑफिसमधल्या कामाची पद्धत

5 तास सलग काम केल्यानंतर ब्रेक आवश्यक, लवकरच बदलू शकते ऑफिसमधल्या कामाची पद्धत

Labour Code Rules: अधिकतर कार्यालयांमध्ये 8 ते 9 तासांची शिफ्ट असते. नवीन लेबर कोडनुसार, कामाचे तास वाढून 12 तास करण्याची तरतूद आहे. यानुसार आठवड्यात आठवड्यात 48 तास काम करावे लागेल.

 • Share this:
  नवी दिल्ली, 01 ऑगस्ट: मोदी सरकार (Modi Government) 1 ऑक्टोबरपासून लेबर कोड (Labour Code Rules) चे नियम लागू करण्याच्या विचारात आहे. जर देशात लेबर कोडचे नियम लागू झाले तर कार्यालयात काम करण्याची पद्धत बहुतांशी बदलू शकते. लेबर कोड लागू झाल्यास, कामाची पद्धत बदलेल. कामाचे तासंही वाढतील पण या ड्राफ्ट नियमानुसार कोणत्याही कर्मचाऱ्याला सलग 5 तास काम करता येणार नाही, कर्मचाऱ्यांना दर पाच तासांनी अर्ध्या तासाचा ब्रेक द्यावा लागेल. जाणून घ्या नेमके काय होणार आहेत हे बदल 5 तास सलग काम केल्यास त्यानंतर ब्रेक आवश्यक लेबर कोड लागू झाल्यानंतर एखादी कंपनी त्यांच्या कर्मचाऱ्यांकडून सलग पाच तासापेक्षा जास्त काम करवून घेऊ शकणार नाही. कर्मचाऱ्यांना दर पाच तासांनी अर्ध्या तासाचा ब्रेक द्यावा लागेल. या ड्राफ्ट नियमांनुसार अशाप्रकारे पाच तासापेक्षा जास्त काम करण्यास प्रतिबंधित करण्यात आलं आहे. ओव्हरटाइमचा नियम बदलणार हा नियम लागू झाल्यानंतर तुमच्या कामाचे तास वाढू शकतात, मात्र ओव्हरटाइमचे नियम (Overtime rules) देखील बदलू शकतात. ठरलेल्या वेळेच्या 30 मिनिटं अधिक काम केल्यास कंपनीला तुम्हाला अधिक पैसे द्यावे लागू शकतात. कोडच्या ड्राफ्ट नियमांनुसार 15 ते 30 मिनिटांच्या अतिरिक्त कामाला 30 मिनिटं असं मोजून त्याचा समावेश ओव्हरटाइममध्ये करण्याची तरतूद आहे. सध्या 30 मिनिटांपेक्षा कमी कामाला ओव्हरटाइम मानलं जात नाही. हे वाचा-LPG Gas Cylinder Price: 73.5 रुपयांनी महागला एलपीजी गॅस सिलेंडर, तपासा लेटेस्ट द कामाची वेळ वाढू शकेल नवीन लेबर कोडनुसार, कामाचे तास वाढून 12 तास करण्याची तरतूद आहे. अधिकतर कार्यालयांमध्ये 8 ते 9 तासाची शिफ्ट असते. नवीन नियमानंततर आठवड्यात 48 तास काम करावे लागेल. जर एखाद्या व्यक्तीने 8 तास काम केले तर त्याला 6 दिवस काम करावं लागेल. 9 तास काम केले तर आठवड्यातील 5 दिवस काम करावं लागेल. तुम्ही 12 तास कामं केलं तर 4 दिवस काम म्हणजे आठवड्यातील 3 दिवस सुट्टी मिळेल. मात्र कामगार संघटनांकडून 12 तासांच्या शिफ्टचा विरोध केला जात आहे. 1 ऑक्टोबरपासून लागू होणार नियम सरकारला 1 एप्रिलपासून नवीन लेबर कोडमधील नियमांची अंमलबजावणी करायची होती, पण राज्यांची तयारी न झाल्यामुळे आणि कंपन्यांना एचआर पॉलिसी बदलण्यासाठी अधिक वेळ हवा असल्याने तूर्तास पुढे ढकलण्यात आले आहे. लेबर मिनिस्ट्री (Labour Ministry) च्या मते, त्यानंतर सरकार 1 जुलैपासून लेबर कोडचे नियम नोटिफाय करण्यात येणार होते, मात्र राज्यांनी हा नियम लागू करण्यासाठी वेळ मागितला होता. त्यामुळे 1 ऑक्टोबरपर्यंत हा निर्णय पुढे ढकलण्यात आला आहे. हे वाचा-SBI Alert! ग्राहकांनी हे काम करणं आवश्यक, अन्यथा करता येणार नाहीत ट्रान्झॅक्शन सप्टेंबर 2020 मध्ये पास झाला होता नियम ऑगस्ट 2019 मध्ये तीन लेबर कोड इंडस्ट्रियल रिलेशन, कामामधील सुरक्षा, हेल्थ व वर्किंग कंडीशन आणि  सोशल सिक्योरिटी संबंधित नियमात बदल केले होते. सप्टेंबर 2020 मध्ये लेबर कोडचे नियम पास झाले होते.
  Published by:Janhavi Bhatkar
  First published: