• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • LPG Gas Cylinder Price: 73.5 रुपयांनी महागला एलपीजी गॅस सिलेंडर, तपासा लेटेस्ट दर

LPG Gas Cylinder Price: 73.5 रुपयांनी महागला एलपीजी गॅस सिलेंडर, तपासा लेटेस्ट दर

LPG Gas Cylinder Price:सरकारी तेल कंपन्यांनी कमर्शिअल गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ केली आहे. जाणून घ्या आजचे दर

 • Share this:
  नवी दिल्ली, 01 ऑगस्ट: महिन्याच्या पहिल्याच दिवशी सामान्यांच्या खिशाला मोठा चाप बसला आङे. गॅस सिलेंडरच्या (LPG Gas Cylinder Price) किंमतीत पुन्हा वाढ झाली आहे. सरकारी तेल कंपन्यांनी गॅस सिलेंडरच्या किंमतीत (Gas Cylinder price today) 73.5 रुपये प्रति सिलेंडर इतकी वाढ केली आहे. कमर्शिअल गॅस सिलेंडरच्या किंमतीत ही वाढ झाली आहे. घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती या महिन्यात स्थिर आहेत. या वाढीनंतर दिल्लीमध्ये 19 किलोच्या कमर्शिअल गॅसच्या किंमती 1,500 रुपयांवरुन वाढून 1623 रुपये प्रति सिलेंडर झाल्या आहेत. 14.2 किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती गेल्या महिन्या इतक्याच असणार आहेत. जुलैमध्ये तेल कंपन्यांनी गॅस सिलेंडरच्या किंमतीत  25.50 प्रति सिलेंडरची वाढ केली होती. या वाढीनंतर दिल्लीमध्ये विना सब्सिडीच्या गॅस सिलेंडरची किंमत 834.50 रुपये आहे. हीच किंमत या महिन्यात असणार आहे. कोलकातामध्ये 14.2 किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरचे दर 861 रुपये, मुंबईमध्ये दर 834.50 रुपये आणि चेन्नईमध्ये दर 850.50 रुपये प्रति सिलेंडर आहेत. हे वाचा-30 मिनिटंही अधिक काम केलं तरी मिळणार Overtime चे पैसे, मोदी सरकार आणणार हा नियम 19 किलोच्या कमर्शिअल गॅस सिलेंडरचे नवे दर (19 KG LPG Cylinder Price) >> दिल्लीमध्ये 19 किलोच्या कमर्शिअल गॅसची किंमत 73 रुपये वाढल्यानंतर 1623 रुपये आहे. >> कोलकातामध्ये 19 किलोच्या कमर्शिअल गॅसची किंमत 72.50 रुपये वाढल्यानंतर 1629 रुपये आहे. >> चेन्नईमध्ये 19 किलोच्या कमर्शिअल गॅसची किंमत 73.50 रुपये वाढल्यानंतर 1761 रुपये आहे. >> मुंबई 19 किलोच्या कमर्शिअल गॅसची किंमत 72.50 रुपये वाढल्यानंतर 1579.50 रुपये आहे. हे वाचा-Aadhaar Alert! तुमच्या मुलाचं आधार कार्ड होऊ शकतं निष्क्रिय, त्वरित करा अपडेट 14 किलोच्या गॅस सिलेंडरचे दर (14 KG LPG Cylinder Price) >> दिल्लीमध्ये 834.50 रुपये प्रति सिलेंडर >> कोलकातामध्ये 861 रुपये प्रति सिलेंडर >> मुंबईमध्ये 834.50 रुपये प्रति सिलेंडर >> चेन्नईमध्ये 850.50 रुपये प्रति सिलेंडर अशाप्रकारे तपासा गॅस सिलेंडरचे दर सरकार तेल कंपन्यांच्या वेबसाइटवर जाऊन तुम्ही घरगुती आणि कमर्शिअर गॅसचे दर तपासू शकता. दर महिन्याच्या पहिल्या तारखेला सिलेंडरच्या किंमतीत बदल केला जातो. तुम्ही जर IOCL चे ग्राहक असाल तर https://iocl.com/Products/IndaneGas.aspx या लिंकवर क्लिक करुन किंमती तपासू शकता.
  Published by:Janhavi Bhatkar
  First published: