लॉकडाऊननंतर विमान प्रवास करण्याच्या विचारात आहात? दाखवावं लागणार मेडिकल सर्टिफेकट

लॉकडाऊननंतर विमान प्रवास करण्याच्या विचारात आहात? दाखवावं लागणार मेडिकल सर्टिफेकट

विमान सेवा आणि रेल्वे पुन्हा सुरू करण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. जर लॉकडाऊन नंतर विमानसेवा सुरू झाली तरीही, प्रवाशांना प्रवास करण्यासाठी मेडिकल सर्टिफिकेट दाखवावे लागण्याची शक्यता आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 28 एप्रिल : देशभरामध्ये 3 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. कोरोना व्हायरसचे (Coronavirus) संक्रमण रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला होता. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, हॉटस्पॉट परिसर वगळता इतर भागांमध्ये लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने हटवण्यात येणार आहे. मात्र रेल्वे किंवा हवाई वाहतूक पुन्हा सुरू करण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय केंद्राकडून घेण्यात आलेला नाही आहे. दरम्यान जर लॉकडाऊन नंतर विमानसेवा सुरू झाली तरीही, प्रवाशांना प्रवास करण्यासाठी मेडिकल सर्टिफिकेट दाखवावे लागण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला विमान उड्डाण करतेवेळी ग्लोव्ह्ज, मास्क आणि डिस्पोजेबल कॅप्स सुद्धा खरेदी कराव्या लागतील.

(हे वाचा-68 हजार कोटींच्या कर्जावर बँकांनी सोडलं पाणी; मेहुल चोक्सीची कंपनीही या यादीत)

इकॉनॉमिक टाइम्सने दिलेल्या माहितीनुसार याबाबत डॉक्टर, प्रशासकीय अधिकारी, एअरपोर्ट आणि एअरलाइन्सचे अधिकारी चर्चा करत आहेत. या सर्वांची एक टेक्निकल कमिटी विमान प्रवासासाठी आखाव्या लागणाऱ्या नवीन नियमांबाबत चर्चा करत आहे. कोरोनाचे संक्रमण रोखणे हा याचा हेतू आहे. यासाठी या समितीकडून प्रवासी आणि एअरपोर्ट स्टाफसाठी मानक संचालन प्रक्रिया (SOP) तयार करण्यात येत आहे. अपेक्षा अशी आहे की, फ्लाइट्स 15 मे पासून सुरू होतील. देशातील लॉकडाऊन पूर्णपणे हटण्यास जून महिना उजाडण्याची शक्यता आहे.

(हे वाचा-लॉकडाऊन जरी संपला तरी मे महिन्यात 13 दिवस बँका बंद, त्यानुसार करा कामाचं नियोजन)

काही आंतरराष्ट्रीय विमान कंपन्या सोशल डिस्टंसिंगचे पालन करण्यासाठी मिडल सीट रिकामी ठेवण्याचा विचार करत आहेत. कोरियन एअरलाइन्सने दिलेल्या माहितीनुसार त्यांचे क्रू मेंबर्स टेक ऑफपासून लँडिंगपर्यंत चश्मा, फेस मास्क आणि गाऊन घालूनच राहतील. लॉकडाऊनच्या काळात एअरलाइन्सचे झालेले नुकसान अगणित आहे. ब्लूमबर्गने दिलेल्या माहितीनुसार काही एअरलाइन्स हे नुकसान भरून काढण्यासाठी विमान प्रवासभाडं वाढवण्याच्या विचारात आहेत. काही फ्लाइट्समध्ये मिडल सीट देखील दिली जाण्याची शक्यता आहे. लॉकडाऊननंतर हेल्थ चेकअप, तापाची तपासणी हा सुद्धा फ्लाइट्समधील प्रक्रियेचा भाग होणार आहे. त्यामुळे मेडिकल सर्टिफिकेट सुद्धा विमान प्रवासाआधी दाखवावं लागण्याची शक्यता आहे.

संपादन - जान्हवी भाटकर

First published: April 28, 2020, 12:12 PM IST

ताज्या बातम्या