जाहिरात
मराठी बातम्या / मनी / कर्जबुडव्या मेहुल चोक्सीसह 50 कंपन्यांना दिलेल्या कर्जावर बँकांनी सोडलं पाणी, 68 हजार कोटींची रक्कम बुडाली

कर्जबुडव्या मेहुल चोक्सीसह 50 कंपन्यांना दिलेल्या कर्जावर बँकांनी सोडलं पाणी, 68 हजार कोटींची रक्कम बुडाली

कर्जबुडव्या मेहुल चोक्सीसह 50 कंपन्यांना दिलेल्या कर्जावर बँकांनी सोडलं पाणी, 68 हजार कोटींची रक्कम बुडाली

भारतीय बँकांनी काही व्यक्तींना किंवा कंपन्यांना देण्यात आलेल्या कोट्यवधींच्या कर्जावर पाणी सोडलं आहे, अशी कबूली आरबीआयकडूनच देण्यात आली आहे. यामध्ये कर्जबुडव्या मेहुल चोक्सीच्या कंपनीचा देखील समावेश आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 28 एप्रिल : भारतीय बँकांनी काही व्यक्तींना किंवा कंपन्यांना देण्यात आलेल्या कोट्यवधींच्या कर्जावर पाणी सोडलं आहे, अशी कबूली आरबीआयकडूनच देण्यात आली आहे. आरबीआयकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार 50 मोठ्या कर्जबुडव्यांचे (Wilful defaulters) एकूण 68 हजार 607 कोटींचे कर्ज राइट ऑफ खात्यात टाकण्यात आले आहेत. यामध्ये  पीएनबी प्रकरणी फरार असणाऱ्या मेहुल चोक्सीचा देखील समावेश आहे. माहिती अधिकाराअंतर्गत आरबीआयला विचारण्यात आलेल्या प्रश्नांतून ही कबूली देण्यात आली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते साकेत गोखले यांनी ही माहिती दिली आहे. गोखले यांनी या देण्यात आलेल्या कर्जाबाबत माहिती मागवली होती. (हे वाचा- लॉकडाऊन जरी संपला तरी मे महिन्यात 13 दिवस बँका बंद, त्यानुसार करा कामाचं नियोजन ) 50 मोठे कर्जबुडवे ज्यामध्ये मेहुल चोक्सीचा देखील समावेश आहे ते आणि या सर्वांनी 16 फोब्रुवारीपर्यंत घेतलेल्या कर्जाच्या स्थितीसंदर्भात गोखले यांनी विचारणा केली होती. गोखले यांनी आयएएनएसशी बोलताना अशी मागिती दिली की, राहुल गांधी यांनी देखील लोकसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकुर यांना याबाबत विचारले होते. मात्र त्याबाबत कोणतेही ठोस उत्तर न मिळाल्यामुळे मी याबाबत अर्ज केला असल्याचे गोखले म्हणाले. (हे वाचा- संकटकाळात भारतीय डिजिटल उद्योगात झालेली FACEBOOK- JIO गुंतवणूक मोठी ) साकेत यांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्राकडून त्यांना याबाबत उत्तर मिळाले नसून आरबीआयचे केंद्रीय सार्वजनिक माहिती अधिकारी अभय कुमार यांनी त्यांच्या अर्जाला उत्तर दिले. आरबीआयने दिलेल्या या माहितीनुसार या रकमेमध्ये 68 हजार 607 कोटींची एकूण थकबाकी आणि तांत्रिकदृष्ट्या बुडवलेली रक्कम आहे. 30 सप्टेंबर 2019 पर्यंत अशी राइट ऑफ करण्यात आलेली कर्ज माफ करण्यात आली आहेत. मात्र सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा हवाला देत परदेशात गेलेल्या व्यक्तींबाबत आरबीआयने माहिती देण्यास स्पष्ट नकार दिला आहे.

जाहिरात

सर्वात जास्त कर्ज माफ झालेल्या कंपन्यांच्या यादीमध्ये चोक्सीची गितांजली जेम्स लिमिटेड पहिल्या स्थानावर आहे. त्याचप्रमाणे या कंपनीची सहकारी कंपनी जिली इंडिया लिमिटेड आणि नक्षत्र ब्रँड्स लिमिटेड या कंपन्यांचा देखील समावेश आहे. या कंपन्यांचे मिळून 8 हजार 100 कोटींचे कर्ज आहे. या 50 कंपन्यांच्या यादीमध्ये संदीप झुनझुनवाला आणि संजय झुनझुनवाला यांच्या आइआय अॅग्रो या कंपनीचं देखील नाव आहे, ज्यांच्या डोक्यावर 4,314 कोटींचं कर्ज आहे. त्याचप्रमाणे या यादीमध्ये जितेन मेहता यांची विन्सम डायमंड्स अ‍ॅण्ड ज्वेलरी ही कंपनी देखील आहे, ज्यांच्या नावावर  4 हजार 76 कोटींचं कर्ज आहे. विविध बँकांची फसवणूक केल्याप्रकरणी त्यांची सीबीआयकडून चौकशी देखील सुरू आहे. रोटोमॅक ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड (2,850 कोटी रुपये), पंजाबमधील कुडोस केमी (2,326 कोटी रुपये), बाबा रामदेव आणि बाळकृष्ण यांच्या मालकीची असणारी इंदौरमधील रुचि सोया इंडस्ट्रीज (2,212 कोटी रुपये), ग्वालियारमधील झूम डेलव्हलपर्सं प्रायव्हेट लिमिटेड (2,012 कोटी रुपये) या तीन हजार कोटींपेक्षा कमी कर्ज असणाऱ्या कंपन्याचा देखील समावेश आहे. 2000 कोटींपेक्षा कमी कर्ज असणाऱ्या एकूण 18 कंपन्या राइट ऑफ खात्यात टाकण्यात आल्या आहेत. संपादन- जान्हवी भाटकर

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात