कोरोना व्हायरसमुळे 3 मेपर्यंत देशव्यापी लॉकडाऊन आहे. कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता लॉकडाऊन 3 तारखेला संपेलच याची शाश्वती देता येत नाही. दरम्यान या काळात अनेकांचे आर्थिक व्यवहार खोळंबले आहेत.
त्यामुळे 4 तारखेपासून लॉकडाऊनचा कालावधी संपला तर अनेकांना बँकेत जाण्याची आवश्यकता भासणार आहे. जर तुम्ही बँकेत जाण्याचा प्लॅन करत आहात तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. (प्रतिकात्मक फोटो)
दरम्यान आरबीआयच्या सुट्ट्यांच्या यादीनुसार मे महिन्यात 13 दिवस बँका बंद राहणार आहेत. यामध्ये ईद, बौद्ध पौर्णिमा आणि कामगार दिवस या महत्त्वाच्या सुट्ट्यांचा समावेश आहे. (प्रतिकात्मक फोटो)
या 13 सुट्ट्यांमध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये असणाऱ्या सुट्ट्यांचाही समावेश आहे. परिणामी खातेधारकांना काहीशा आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागेल. त्यामुळे लॉकडाऊन जरी संपला तरी या तारखा लक्षात ठेवूनच सर्व कामांचे नियोजन करावे लागेल
1 मे रोजी सर्व राज्यांमध्ये कामगार दिवसाची सुट्टी असते. तर 3 तारखेला रविवार असून 7 मे रोजी बेलापूर, मुंबई, नागपूर, पणजी, पटना, तिरुवनंतपूरम, कोलकाता, कोची, इंफाळ, हैदराबाद, गुवाहाटी, चेन्नई, बेंगळुरुमध्ये बौद्ध पौर्णिमेची सुट्टी आहे.
8 मे रोजी कोलकात्यामध्ये रवींद्रनाथ टागोर जयंती आहे. 9 मे रोजी दुसरा शनिवार आणि 10 तारखेला रविवार असल्यामुळे बँका बंद राहतील. (प्रतिकात्मक फोटो)
17 मे रोजी रविवार, 21 मे रोजी जम्मू आणि श्रीनगरमध्ये शब-ए-कादरची सुट्टी आहे. 22 मे रोजी जम्मू आणि श्रीनगरमध्ये जुम्मत-उल-विदाची सुट्टी आहे. 23 मे रोजी चौथा शनिवार आणि 24 तारखेला रविवार आहे. (प्रतिकात्मक फोटो)
25 मे रोजी सर्व राज्यांमध्ये रमजान ईदची सुट्टी असून 31 तारखेला रविवार असल्यामुळे बँका बंद राहतील. (प्रतिकात्मक फोटो)