Home /News /money /

Idea Share : व्होडाफोन-आयडियाचा शेअर 52 आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवर, काय आहे कारण?

Idea Share : व्होडाफोन-आयडियाचा शेअर 52 आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवर, काय आहे कारण?

व्होडाफोन-आयडियाच्या शेअरने (VIL) राष्ट्रीय शेअर बाजारात 14.34 टक्क्यांची वाढ नोंदवली. सकाळी 10.15 च्या सुमारास 15.83 रुपयांच्या पातळीवर नफा मिळवण्यासाठी गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केली. त्यानंतरही यात वाढ होत गेली.

मुंबई, 9 नोव्हेंबर : शेअर्समधील चढ-उतार कंपन्यांच्या क्षेत्रासंबधीचे निर्णय, कंपनीच्या बाबतीतील घटना यावर मोठ्या प्रमाणात अवलंबून असतात. कंपनीच्या काही सकारात्मक पावलांमुळे गुंतवणूकदारांमध्ये विश्वास निर्माण होतो आणि त्या शेअरची मागणी वाढते परिणामी त्याच्या किमतीत चांगली वाढ झालेली दिसून येते. अनेकदा काही शेअर्स जबरदस्त वाढ नोंदवतात. अशीच वाढ आज व्होडाफोन-आयडिया (Vodafone- Idea) या शेअरने नोंदवली आहे. गुरुवारच्या सत्रात (NSE) या शेअरने तब्बल 15 टक्क्यांची वाढ (Growth) नोंदवली असून हा शेअर 16.40 रुपयांच्या 52 आठवड्यांच्या उच्चांकावर (52Weeks High) पोहोचला आहे. इकॉनॉमिक टाईम्सने याबाबतचं वृत्त दिलं आहे. व्होडाफोन-आयडियाच्या शेअरने (VIL) राष्ट्रीय शेअर बाजारात 14.34 टक्क्यांची वाढ नोंदवली. सकाळी 10.15 च्या सुमारास 15.83 रुपयांच्या पातळीवर नफा मिळवण्यासाठी गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केली. त्यानंतरही यात वाढ होत गेली आणि हा शेअर काही वेळातच 16.40 रुपयांच्या उच्चांकावर पोहोचला. बुधवारी हा शेअर 14.29 रुपयांवर स्थिरावला होता. Rakesh Jhunjhunwala यांची गुंतवणूक असलेल्या 'या' शेअरमध्ये ब्रेकआऊट, गुंतवणूकदारांना खरेदीची संधी व्होडाफोन-आयडियाचे शेअर्स गेल्या तीन आठवड्यांत 9.6 रुपयांच्या नीचांकावरून सुमारे 70 टक्क्यांनी वाढले आहेत. 5 ऑगस्ट 2021 रोजी या शेअरने 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळी गाठली होती. केवळ चार महिन्यांत यात 260 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. 23 नोव्हेंबर रोजी व्होडाफोन-आयडियाने आपल्या प्रीपेड टॅरिफ प्लॅनमध्ये (Prepaid Tariff Plan) 20-22 टक्के आणि व्हॉइस प्लॅनमध्ये 25 टक्के वाढ करण्याची घोषणा केली होती. या नवीन योजनेमुळे प्रति युनिट सरासरी महसूल (ARPU) वाढेल आणि कंपनीला भेडसावणाऱ्या आर्थिक समस्येचे निराकरण होण्यास फायदा होईल, असा विश्वास कंपनीने व्यक्त केला होता. तसेच कंपनीने कर्ज परतफेडीसाठी निधी उभारल्याचे वृत्त बँकर्सच्या हवाल्याने माध्यमात प्रसिद्ध झाले आहे. यामुळे व्होडाफोन-आयडियाच्या बाँडधारकांना (Bond) त्यांचे व्याज 13 डिसेंबरच्या देय तारखेला वेळेत मिळण्याची खात्री निर्माण झाली आहे. कंपनीने 7.77 टक्के नॉन-कन्व्हर्टेबल डिबेंचरच्या (Non-Convertible Debentures) पुढील टप्प्यासाठी 20 डिसेंबर रोजी रेकॉर्ड तारीख निश्चित केली होती, असंही या वृत्तात म्हटलं आहे. या बातमीने या शेअरमधील वाढीला चालना मिळाली. Credit Card च्या कर्जातून मुक्तता हवी? 'या' सोप्या स्टेप्स फॉलो करा टेन्शन दूर होईल या बातमीबरोबरच दुसऱ्या एका अहवालामुळे टेलिकॉम क्षेत्राबाबत (Telecom sector) सकारात्मक वातावरण निर्माण झालं त्याचाही फायदा या शेअरला मिळाला. भारती एअरटेल, रिलायन्स जिओ आणि व्होडाफोन-आयडिया या देशातील तीन खासगी दूरसंचार कंपन्यांनी सरकारला सर्व 5G बँड विक्रीसाठी ठेवण्यास, शुल्क कमी करण्यासाठी आणि नवीन एअरवेव्हसाठी देयकावर दीर्घ कालावधीसाठी स्थगिती देण्यास भाग पाडले आहे. अलीकडेच, दूरसंचार विभागाने (DoT) परवाना शुल्क आणि स्पेक्ट्रम वापर शुल्क जमा केलेल्या भारती एअरटेल आणि रिलायन्स जिओ आदी दूरसंचार कंपनीची बँक हमी जारी केली आहे. या सगळ्या सकारात्मक बातम्यांमुळे व्होडाफोन-आयडियाच्या (VIL) शेअरमध्ये आज जबरदस्त वाढ झाली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना चांगला फायदा मिळाला आहे.
First published:

Tags: Investment, Share market, Vodafone idea tariff plan

पुढील बातम्या