मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Credit Card च्या कर्जातून मुक्तता हवी? 'या' सोप्या स्टेप्स फॉलो करा टेन्शन दूर होईल

Credit Card च्या कर्जातून मुक्तता हवी? 'या' सोप्या स्टेप्स फॉलो करा टेन्शन दूर होईल

Credit Card चा बेजबाबदार वापर जसे की बेपर्वाईने खर्च करणे, कार्डची बिले न भरणे किंवा फक्त किमान रक्कम भरणे हे तुम्हाला कर्जाच्या सापळ्यात अडकवू शकते.

Credit Card चा बेजबाबदार वापर जसे की बेपर्वाईने खर्च करणे, कार्डची बिले न भरणे किंवा फक्त किमान रक्कम भरणे हे तुम्हाला कर्जाच्या सापळ्यात अडकवू शकते.

Credit Card चा बेजबाबदार वापर जसे की बेपर्वाईने खर्च करणे, कार्डची बिले न भरणे किंवा फक्त किमान रक्कम भरणे हे तुम्हाला कर्जाच्या सापळ्यात अडकवू शकते.

  • Published by:  Pravin Wakchoure

मुंबई, 9 डिसेंबर : भारतात डिजिटल पेमेंटचा (Digital Payment) वापर वाढला आहे. देशातील मोठ्या शहरांबरोबरच छोट्या शहरांमध्येही क्रेडिट कार्डचा (Credit card) कल वाढला आहे. क्रेडिट कार्ड अतिशय सोयीस्कर तसेच हानिकारक आहेत. त्याचा उपयोग हुशारीने केल्यास फायदा होतो. क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांना रिवॉर्ड पॉइंट्स (Rewards Point), डिस्काउंट (Discount), कॅशबॅक (Cashback) इत्यादी अनेक फायदे मिळतात. तथापि, क्रेडिट कार्डचा बेजबाबदार वापर जसे की बेपर्वाईने खर्च करणे, कार्डची बिले न भरणे किंवा फक्त किमान रक्कम भरणे हे तुम्हाला कर्जाच्या सापळ्यात अडकवू शकते.

जर तुम्ही क्रेडिट कार्डची थकबाकी भरली नाही, तर सुमारे 40 टक्के दराने वार्षिक शुल्क भरावे लागेल. तुम्ही पूर्ण रक्कम भरेपर्यंत हे चक्र सुरू राहील. याशिवाय तुमच्या क्रेडिट स्कोअरवरही परिणाम होतो. जर तुम्ही अशा परिस्थितीत अडकले असाल, तर येथे तीन उपाय आहेत जे तुम्हाला क्रेडिट कार्डवरील कर्जाचे ओझे कमी करण्यास मदत करू शकतात.

Rakesh Jhunjhunwala यांची गुंतवणूक असलेल्या 'या' शेअरमध्ये ब्रेकआऊट, गुंतवणूकदारांना खरेदीची संधी

EMI मध्ये रूपांतरित करा

अनेक वेळा तुम्ही क्रेडिट कार्डचे बिल वेळेवर भरले नाही, तर तुम्हाला मोठा दंड आणि व्याज भरावे लागते. अशा परिस्थितीत क्रेडिट कार्ड कंपन्या तुम्हाला EMI चा पर्याय देतात, ज्याद्वारे तुम्ही तुमचं ट्रान्जॅक्शन EMI मध्ये बदलू शकता. यामुळे तुमच्यावरील कर्जाचा बोजा कमी होऊ शकतो.

Balence Transfer

बॅलन्स ट्रान्सफर सुविधेमुळे तुमची सध्याची क्रेडिट कार्डची थकबाकी इतर कोणत्याही क्रेडिट कार्डवर ट्रान्सफर करता येते. तुमच्या सध्याच्या क्रेडिट कार्डवर जास्त कर्ज असल्यास आणि तुम्ही या क्रेडिट कार्डवरील थकबाकीची रक्कम इतर कोणत्याही बँकेच्या क्रेडिट कार्डमध्ये ट्रान्सफर करू शकता. मात्र शिल्लक ट्रान्सफर करण्यापूर्वी, नवीन क्रेडिट कार्ड कंपनी किंवा बँकेचे शुल्क माहित असणे आवश्यक आहे.

आता Internet शिवाय UPI Payments करता येणार! रिझर्व्ह बँकेकडून धोरण जाहीर

पर्सनल लोन घेऊ शकता

तुमच्या सध्याच्या क्रेडिट कार्डवर जास्त कर्ज असल्यास आणि EMI आणि बॅलन्स ट्रान्सफर व्यतिरिक्त, तुमच्यासाठी पर्सनल लोन हा एक पर्याय असू शकतो. पर्सनल लोनचे व्याजदर सामान्यतः तुमच्या क्रेडिट कार्ड कर्जापेक्षा खूपच कमी असतात. ज्यांच्याकडे क्रेडिट कार्डचे मोठे कर्ज आहे त्यांच्यासाठी हा पर्याय विशेषतः उपयुक्त ठरू शकतो.

First published:

Tags: Credit card, Loan