मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Cibil Score चांगला असेल तर त्वरित मिळेल कर्ज, फॉलो करा या 6 महत्त्वाच्या Tips

Cibil Score चांगला असेल तर त्वरित मिळेल कर्ज, फॉलो करा या 6 महत्त्वाच्या Tips

बँकेला कर्जदाराच्या कर्ज इतिहासाची माहिती यावरून कळते. त्याने आधी कर्ज घेतले आहे का? असल्यास त्याची परतफेड केली आहे का किंवा नियमित करत आहे का? याची खात्री या सिबिल स्कोअरद्वारे केली जाते.

बँकेला कर्जदाराच्या कर्ज इतिहासाची माहिती यावरून कळते. त्याने आधी कर्ज घेतले आहे का? असल्यास त्याची परतफेड केली आहे का किंवा नियमित करत आहे का? याची खात्री या सिबिल स्कोअरद्वारे केली जाते.

बँकेला कर्जदाराच्या कर्ज इतिहासाची माहिती यावरून कळते. त्याने आधी कर्ज घेतले आहे का? असल्यास त्याची परतफेड केली आहे का किंवा नियमित करत आहे का? याची खात्री या सिबिल स्कोअरद्वारे केली जाते.

मुंबई, 12 ऑक्टोबर: आजकाल घर (Home Loan), वाहन (Auto Loan) खरेदी यासह वैयक्तिक बाबींसाठीही बँकेकडून कर्ज (Bank Loan) मिळते. कर्ज घेताना बँक कर्जदाराची माहिती घेते. कागदपत्रे तपासते आणि मगच कर्ज देते. कर्ज बुडू नये यासाठी बँक सर्व बाबी तपासून मगच कर्जदाराला कर्ज मंजूर करते. मात्र त्यातूनही बँकेची फसवणूक होण्याची शक्यता असतेच. यावर एक उपाय आहे तो म्हणजे सिबिल स्कोअर (what is Cibil Score). बँकेला कर्जदाराच्या कर्ज इतिहासाची माहिती यावरून कळते. त्याने आधी कर्ज घेतले आहे का? असल्यास त्याची परतफेड केली आहे का किंवा नियमित करत आहे का? याची खात्री या सिबिल स्कोअरद्वारे केली जाते. त्यामुळे आजकाल कर्ज देताना बँका आधी सिबिल स्कोअर तपासतात. हा सिबिल स्कोअर चांगला असेल तरच कर्ज मिळू शकते. त्यामुळे कर्ज घ्यायचे असेल तर तुमचा सिबिल स्कोअर चांगला असणे अत्यावश्यक आहे. हा सिबिल स्कोअर चांगला ठेवण्यासाठी काही बाबींची काळजी घेणं आवश्यक आहे.

गृह कर्ज, वाहन कर्ज, वैयक्तिक कर्ज किंवा इतर कोणत्याही प्रकारचे कर्ज असो, बँका नेहमी एखाद्या व्यक्तीचा सिबिल स्कोअर तपासतात. याला क्रेडिट स्कोअर (Credit Score) असेही म्हणतात. तुमचा क्रेडिट स्कोअर 750 पेक्षा कमी असेल तर बँक तुम्हाला कर्ज नाकारते. हा स्कोअर चांगला ठेवण्यासाठी या टिप्स उपयोगी ठरतील.

परदेशात गेल्यावर राहणार नाही विदेशी चलनाचं टेन्शन, SBI देतंय ही खास सुविधा

कर्ज वेळेवर फेडा

तुमचे क्रेडिट कार्ड बिल असो किंवा कर्जाचा हप्ता (EMI) वेळेवर परत करणे महत्वाचे आहे. तुमच्या नावावर थकबाकी असेल तर क्रेडिट रेटिंगवर (Credit Rating) त्याचा परिणाम होतो. कर्जाचा ईएमआय वेळेत न भरल्यास दंड आकारला जातो आणि त्याचा तुमच्या क्रेडिट स्कोअरवर विपरित परिणाम होतो. त्यामुळे तुमच्या कर्जाच्या हप्त्याची तारीख चुकवू नका आणि तो वेळेवर भरा.

एकाचवेळी मोठी कर्जं घेऊ नका

एकावेळी मोठी कर्जं घेऊ नका. दुसरे कर्ज घेण्यापूर्वी तुम्ही तुमचे पहिले कर्ज फेडले आहे याची खात्री करा. यामुळे तुमचा क्रेडिट स्कोअर कमी होत नाही. तुम्ही एकावेळी मोठी कर्जं घेतली असतील तर बँकेला तुम्ही त्याची वेळेत परतफेड कराल याबद्दल शंका वाटू शकते.

6 कोटी PF खातेधारकांच्या खात्यात येणार व्याजाचे पैसे, अशाप्रकारे तपासा स्टेटस

सुरक्षित आणि असुरक्षित कर्ज एकावेळी घ्या

अनेक लोकांना वेगवेगळ्या कारणांसाठी वेगवेगळी कर्जं घ्यावी लागतात. अशावेळी कर्ज घेताना त्यात सुरक्षित (Secured) आणि असुरक्षित (Unsecured) कर्जाचा समावेश आहे याची खात्री करा. गृह कर्ज आणि वाहन कर्ज हे सुरक्षित कर्जाखाली येतात. तर, क्रेडिट कार्ड कर्ज किंवा वैयक्तिक कर्ज असुरक्षित कर्जे आहेत. त्यामुळे यात संतुलन राखणे महत्वाचे आहे.

क्रेडिट कार्ड मर्यादा संपवू नका

तुम्हाला तुमचा सिबिल स्कोअर चांगला ठेवायचा असेल तर तुमच्या क्रेडिट कार्डची (know your Credit Card limit) मर्यादा संपूर्णपणे संपवू नका. एका महिन्यात तुमच्या कार्डावर क्रेडिट मर्यादेच्या फक्त 30 टक्के खर्च करा. उदाहरणार्थ, तुमची क्रेडिट मर्यादा दरमहा 2 लाख रुपये असेल तर तुमचा खर्च फक्त 60,000 रुपयांपर्यंत ठेवण्याचा प्रयत्न करा.

क्रेडिट कार्ड मर्यादा वाढवा

तुमची क्रेडिट कार्डवरील रकमेची परतफेड चांगली असेल तर तुमची बँक तुम्हाला तुमच्या क्रेडिट कार्डवरील क्रेडिट मर्यादा (Credit Limit) वाढवण्यास सांगू शकते. ही वाढलेली क्रेडिट मर्यादा खर्च करताना वापरली नाही तर त्याचा उपयोग तुमचा सिबिल स्कोअर चांगला राहण्यासाठी होईल. क्रेडिट मर्यादा वाढवली म्हणून तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डवरील खर्च वाढवला पाहिजे असे नाही. क्रेडिट मर्यादा जास्त ठेवा, परंतु खर्च मर्यादित करा, ज्यामुळे तुमचा सिबिल स्कोअर सुधारेल.

Jhunjhunwala यांनी या शेअर्समधून कमावले 310 कोटी रुपये,तुम्ही गुंतवणूक केली आहे?

आपल्या कर्ज अहवालात कोणतीही त्रुटी नाही याची खात्री करा

तुमच्या कर्ज अहवालात म्हणजेच क्रेडिट रिपोर्टमध्ये (Credit Report) काहीही त्रुटी नाही याची खात्री करा. उदाहरणार्थ, तुम्ही तुमच्या वैयक्तिक कर्जाची पूर्ण परतफेड केली आहे; पण अहवालात तशी नोंद झालेली नसेल तर त्याचा परिणाम तुमच्या सिबिल स्कोअरवर होईल. त्यामुळे आपला क्रेडिट स्कोअर तपासा आणि त्यात काही चूक, त्रुटी राहिलेली नाही याची खात्री करून घ्या.

या काही बाबींची काळजी घेतली तर तुमचा सिबिल स्कोअर चांगला राहण्यास मदत होईल, आणि तुम्हाला कर्ज मिळण्यास कोणतीही अडचण येणार नाही.

First published:

Tags: Home Loan, Instant loans, Loan, Pay the loan