मराठी बातम्या /बातम्या /मनी /Paytm Share आज पुन्हा 15 टक्क्यांपर्यंत गडगडले; विजय शर्मांच्या संपत्तीत 78.10 कोटी डॉलर्सची घट

Paytm Share आज पुन्हा 15 टक्क्यांपर्यंत गडगडले; विजय शर्मांच्या संपत्तीत 78.10 कोटी डॉलर्सची घट

Paytm Share सलग दोन ट्रेडिंग सत्रांमध्ये घसरले. या घसरणीत कंपनीचे बॉस विजय शेखर शर्मा यांच्या संपत्तीत 78.10 कोटी डॉलरची घट झाली आहे. या घसरणीनंतर पेटीएमचे मार्केट कॅप 1 लाख कोटी रुपयांच्या खाली आले आहे

मुंबई, 22 नोव्हेंबर : मोठ्या आशेने पेटीएमच्या आयपीओमध्ये (Paytm IPO) गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांनी मोठी निराशा झाली. आता तर हे गुंतवणूकदार अडचणीत सापडले आहेत. पेटीएमची मूळ कंपनी One97 Commuinications च्या शेअर्सचा लिस्टिंगनंतरचा दुसरा दिवसही कठीण गेला आहे. सोमवारी कंपनीचे शेअर पुन्हा 13 टक्क्यापर्यंत (Paytm share drop) गडगडले. दुपारी दीड वाजेच्या सुमारास पेटीएमचे शेअर्स 13.36 टक्के घसरून 1351.90 रुपयांवर ट्रेड करत आहेत.

गुरुवारी पेटीएमच्या शेअर्सची कमकुवत लिस्टिंग झाली होती. One97 कम्युनिकेशनचे शेअर्स इश्यू किमतीपेक्षा 27 टक्के खाली बंद झाले. पेटीएमचा इश्यू 1.9 पट सबस्क्राइब झाला. कंपनीने 18,300 कोटी रुपयांचा इश्यू जारी केला होता, जो आतापर्यंतचा देशातील सर्वात मोठा IPO होता. तथापि, अलीकडील IPO च्या तुलनेत त्याची लिस्टिंग सर्वात कमकुवत होती. गुरुवारी लिस्टिंग झाल्यानंतर, पेटीएमचे संस्थापक विजय शेखर शर्मा (Vijay Shekhar Sharma) म्हणाले होते की, लिस्टिंग प्राईजवरुन कंपनीच्या संधी आणि व्यवसाय मोजता येत नाही.

Paytm ची निराशाजनक एन्ट्री, गुंतवणूकदार चिंतेत; वॉरेन बफे यांना मात्र कोट्यवधींचा फायदा

विजय शेखर यांचं दोन दिवसांत 78.10 कोटी डॉलरचे नुकसान

पेटीएमचे शेअर्स सलग दोन ट्रेडिंग सत्रांमध्ये घसरले. या घसरणीत कंपनीचे बॉस विजय शेखर शर्मा यांच्या संपत्तीत 78.10 कोटी डॉलरची घट झाली आहे. या घसरणीनंतर पेटीएमचे मार्केट कॅप 1 लाख कोटी रुपयांच्या खाली आले आहे.

PPF vs VPF : कोणती योजना गुंतवणुकीसाठी फायदेशीर? वाचा सर्वकाही

पेटीएमचा आयपीओ उघडण्यापूर्वी कंपनीचे मूल्य 2.3 अब्ज डॉलर प्रति शेअर 2150 रुपये होते. विजय शेखर शर्मा यांनी 2000 मध्ये कंपनी सुरू केली. यामध्ये विजय शेखर शर्मा यांची हिस्सेदारी 9.1 टक्के म्हणजेच सुमारे 6 कोटी इक्विटी शेअर्स आहे. याशिवाय कंपनीमध्ये 2.1 कोटी ऑप्शन्सही आहेत. सोमवारी दुपारी 11.49 वाजता पेटीएमचे शेअर 15 टक्क्यांनी घसरून 1321 रुपयांवर आले होते.

First published:

Tags: Money, Paytm, Share market