मराठी बातम्या /बातम्या /मनी /

BharatPe चे संस्थापक Paytm च्या विजय शेखर शर्मांवर संतापले; गुंतवणूकदारांच्या नुकसानीसाठी जबाबदार धरलं

BharatPe चे संस्थापक Paytm च्या विजय शेखर शर्मांवर संतापले; गुंतवणूकदारांच्या नुकसानीसाठी जबाबदार धरलं

Paytm ला नॅशनल स्टॉक एक्स्चेंजवर लिस्ट होऊन दोनच दिवस झाले आहेत, पण हा शेअर सातत्याने घसरत आहे. त्याची इश्यू किंमत 2150 रुपये होती, परंतु शेअर 1950 ला लिस्टिंग झाला. सोमवारी देखील बाजारातील मोठ्या घसरणीदरम्यान पेटीएमचा शेअर 1359 रुपयांपर्यंत घसरला.

पुढे वाचा ...
  • Published by:  Pravin Wakchoure

नवी दिल्ली, 17 नोव्हेंबर : Paytm च्या खराब लिस्टिंगनंतर दुसऱ्या दिवशीही शेअरमध्ये घसरगुंडी सुरुच आहे. लिस्टिंगनंतर शेअर जवळपास 39 टक्क्यांनी खाली आले आहेत. त्यामुळे पेटीएम शेअरमध्ये गुंतवणूक केलेले गुंतवणूकदार चिंतीत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर BharatPe चे संस्थापक अश्नीर ग्रोवर (Ashneer Grover) यांनी Paytm चे संस्थापक विजय शेखर शर्मा (Vijay Shekhar Sharma) यांना Paytm च्या IPO मधील गुंतवणूकदारांच्या झालेल्या नुकसानीसाठी जबाबदार धरले आहे.

अश्नीर ग्रोव्हर यांनी म्हटलं की, विजय शेखर शर्मा यांनी फिनटेक फर्मच्या IPO ची किंमत योग्यरित्या निश्चित केली नाही. या आयपीओच्या कामगिरीमुळे आगामी अनेक आयपीओच्या कामगिरीवरही परिणाम होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पेटीएमला नॅशनल स्टॉक एक्स्चेंजवर लिस्ट होऊन दोनच दिवस झाले आहेत, पण हा शेअर सातत्याने घसरत आहे. त्याची इश्यू किंमत 2150 रुपये होती, परंतु शेअर 1950 ला लिस्टिंग झाला. सोमवारी देखील बाजारातील मोठ्या घसरणीदरम्यान पेटीएमचा शेअर 1359 रुपयांपर्यंत घसरला. तर शेअरने 1271 रुपयांची नीचांकी पातळी गाठली.

चीनी गुंतवणूकदारांना पैसे परत करण्यासाठी केलं

मनीकंट्रोलशी बोलताना ग्रोव्हर म्हणाले की, सार्वजनिक पैशाचा वापर कंपनीने (PayTM) चीनी गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्यासाठी केला आहे. 'मी आधीच सांगत होतो की दोन प्रकारचे मार्केट असणार आहेत. एक पेटीएमच्या आयपीओपूर्वीचा बाजार आणि दुसरा पेटीएमच्या आयपीओच्या नंतरचा बाजार. पेटीएम नंतरचा बाजार बुडणार आहे आणि बाजार बुडत असल्याचे आपण पाहत आहोत. याचे कारण अगदी सोपे आहे की विजय शेखर शर्मा यांनी IPO ची किंमत चुकीची काढली. म्हणजेच त्याची किंमत योग्यरित्या निश्चित केली नाही.

Paytm Share आज पुन्हा 15 टक्क्यांपर्यंत गडगडले; विजय शर्मांच्या संपत्तीत 78.10 कोटी डॉलर्सची घट

LIC च्या IPO वर परिणाम

अश्नीर ग्रोव्हर पुढे म्हणाले की, 'तुम्ही 18300 कोटी रुपयांचा आयपीओ आणला, त्यापैकी 55 टक्के सेकंडरी होता. तुम्ही किंमत ऑप्टिमायझेशन केले. चिनी गुंतवणूकदारांनी त्यांचे सर्व शेअर्स आयपीओद्वारे विकले. भारतीय बाजार खराब करून, तुम्ही चिनी गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत दिले आहेत. यानंतर भारत पेचे संस्थापक म्हणाले की, यामुळे आगामी LIC आयपीओवरही खूप परिणाम होईल.

नोकरी बदलताना PF अकाऊंट ट्र्रान्सफर करण्याची गरज नाही, EPFO चा निर्णय

LIC पुढील दोन आठवड्यांत IPO साठी ड्राफ्ट प्रॉस्पेक्टस दाखल करणार आहे. हा IPO देशातील सर्वात मोठा IPO असेल असे सांगण्यात येत आहे. यावर ग्रोव्हर म्हणाले की सर्व आगामी IPO ला आता त्यांची इश्यू किंमत पुन्हा निश्चित करावी लागेल, अगदी LIC जो आतापर्यंतचा सर्वात मोठा IPO मानला जात होता. हा आयपीओ त्याच्या किमतीच्या खाली राहिला तर निर्गुंतवणुकीचे उद्दिष्ट साध्य होणार नसल्याने सरकार अडचणीत येईल.

First published:

Tags: Money, Paytm, Share market