मुंबई, 16 फेब्रुवारी : गुंतवणूकदार शेअर बाजारात 2022 चे मल्टीबॅगर स्टॉक (Multibagger Stocks) शोधण्यात गुंतले आहेत. या यादीत अनेक स्मॉलकॅप शेअर्सनी (Smallcap Shares) आधीच स्थान मिळवले आहे. त्यापैकी काही पेनी स्टॉक हे मल्टीबॅगर स्टॉक असल्याचेही सिद्ध झाले आहे. वरीमन ग्लोबल एंटरप्रायझेस स्टॉक (Variman Global Enterprises) हा असाच एक स्टॉक आहे. BSE वर लिस्टेड IT सोल्युशन्स कंपनीचा स्टॉक 2022 मध्ये 34.35 रुपयांवरून सध्या 141.90 रुपये प्रति शेअर झाला आहे. 2022 मध्ये आतापर्यंत या स्टॉकने 300 टक्के परतावा दिला आहे. या शेअरची प्राईज हिस्ट्री पाहिली तर गेल्या 1 आठवड्यात हा शेअर 124 रुपयांवरून 141.90 रुपयांपर्यंत वाढला आहे. आठवड्यात 14.50 टक्के परतावा दिला आहे. गेल्या आठवड्यातील 5 ट्रेडिंग दिवसांपैकी 3 दिवस असे गेले आहेत की जेव्हा या स्टॉकमध्ये अप्पर सर्किट दिसली. गेल्या 1 महिन्यात हा स्मॉलकॅप आयटी स्टॉक 52 रुपयांवरून 141.90 रुपयांपर्यंत वाढला आहे. या कालावधीत सुमारे 175 टक्के परतावा दिला आहे. Paytm, Zomato ची अवस्था पाहून अनेक कंपन्यांची घबराट, ‘या’ कंपन्यांनी IPO योजना पुढे ढकलली जर एखाद्या गुंतवणूकदाराने 1 आठवड्यापूर्वी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर त्याला आज 1.14 लाख रुपये मिळाले असते. त्याचप्रमाणे एखाद्या गुंतवणूकदाराने 1 महिन्यापूर्वी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर त्याला 2.75 लाख रुपये मिळाले असते. जर एखाद्या गुंतवणूकदाराने 31 डिसेंबर रोजी या शेअरमध्ये 34.50 रुपयांच्या भावाने 1 लाख रुपये गुंतवले असते, तर आज त्याला 4 लाख रुपये मिळाले असते. LIC IPO : तुम्हीही एलआयसी आयपीओची वाट पाहताय? काय असेल इश्यू प्राईज? वाचा डिटेल्स मंगळवारच्या ट्रेडिंग सत्रात, हा मल्टीबॅगर स्टॉक 143.55 रुपयांच्या त्याच्या ऑलटाईम हायवर गेला. शेअरची 52 आठवड्यांची नीचांकी किंमत 11.65 रुपये आहे. या स्मॉलकॅप शेअरचे मार्केट कॅप 237 कोटी आहे आणि त्याचे प्रति शेअर बूक वॅल्य 9.60 रुपये आहे. त्याचा सध्याचा ट्रेड वॉल्युम 88,457 आहे जो 20 दिवसांच्या सरासरी 62,432 वॉल्यूमपेक्षा खूप जास्त आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.