तुम्हीही उन्हाळ्यात काश्मीरला जाण्याचा विचार करत असाल, तर भारतीय रेल्वेने तुमच्यासाठी एक अप्रतिम टूर पॅकेज आणले आहे. याद्वारे तुम्ही काश्मीरला परवडणाऱ्या किमतीत प्रवास करू शकता.
या टूर पॅकेजची सुरुवात मुंबईपासून होणार आहे. हे एक फ्लाइट पॅकेज आहे ज्यामध्ये तुम्ही मुंबई ते श्रीनगर जाल. या पॅकेजमध्ये तुम्हाला गुलमर्ग, सोनमर्ग, पहलगाम येथे जाण्याची संधी मिळेल.
या पॅकेजद्वारे तुम्ही एप्रिल आणि मे महिन्यात काश्मीरला जाऊ शकता. हे पॅकेज 6 दिवस आणि 5 रात्रीसाठी आहे.
या पॅकेजमध्ये तुम्हाला ब्रेकफास्ट आणि डिनरची सुविधा मिळेल. या पॅकेजमध्ये तुम्हाला रात्रीच्या मुक्कामासाठी डिलक्स हॉटेलची सुविधा मिळेल.
या पॅकेजमध्ये तुम्हाला नॉन एसी वाहनाने काश्मीरमधील विविध ठिकाणांना भेट देण्याची संधी मिळेल. या टूर पॅकेजमध्ये, तुम्हाला एकट्याने प्रवास करण्यासाठी 59,800 रुपये, दोन लोकांसाठी 43,300 रुपये आणि प्रवास करणाऱ्या तीन लोकांसाठी 42,000 रुपये प्रति व्यक्ती पैसे भरावे लागतील.
पॅकेजसंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही IRCTC या वेबसाइटवर क्लिक करुन जाणून घेऊ शकता. https://irctctourism.com/pacakage_description?packageCode=EHA062