Home /News /money /

डोनाल्ड ट्रम्प यांची चीनला धमकी, कोरोना पसरवण्यात हात असेल तर...

डोनाल्ड ट्रम्प यांची चीनला धमकी, कोरोना पसरवण्यात हात असेल तर...

कोरोना व्हायरसचा जगभरात प्रसरण करण्यात चीन दोषी आढळला तर याचे परिणाम चीनला भोगावे लागतील अशी धमकी डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे.

    नवी दिल्ली, 22 एप्रिल : चीनच्या वुहान शहरापासून सुरू झालेल्या कोरोना व्हायरसने (Coronavirus) जगभरात थैमान घातले आहे. अमेरिका, इटली, स्पेन, ब्रिटन, भारत असे सर्वचजण कोरोनाशी झुंज देत आहेत. दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांंनी चीनबरोबर सर्व ट्रेड डील संपवून टाकण्याची धमकी दिली आहे. जर कोरोना व्हायरसचा जगभरात प्रसरण करण्यात चीन दोषी आढळला तर याचे परिणाम चीनला भोगावे लागतील अशी धमकी डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे. कोरोना व्हायरस संक्रमित झालेल्यांचा चीनमधील आकडा 82 हजार 788 आहे तर मृतांची संख्या 4,632 इतकी आहे. मात्र अमेरिकेमध्ये ही संख्या कित्येक पटींनी अधिक आहे. अमेरिकेमध्ये कोरोनाबाधित झालेल्यांची एकूण संख्या 8,24,600 एवढी आहे. तर आतापर्यंत 45,290 जणांचा मृत्यू झाला आहे. COVID-19 मुळे मृत्यू झालेल्यांची संख्या अमेरिकेमध्ये सर्वाधिक आहे. (हे वाचा-'जर हे खरं असेल तर...', किम यांच्या प्रकृतीबाबत ट्रम्प यांनी दिली प्रतिक्रीया) डोनाल्ड ट्रम्प यांनी साल 2018 मध्ये चीनबरोबर ट्रेडवॉर सुरू केले होते. त्यानंतर अमेरिका आणि चीनमध्ये ट्रे़डवॉर वाढलं. अमेरिकेने चिनी वस्तूंवरील टेरिफ शूल्क वाढवले, त्याला उत्तर म्हणून चीनने देखील टेरिफ शूल्क वाढवले होते. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये व्यापारामध्ये कटूता निर्माण झाली होती. दोन्ही देश माघार घेण्यासाठी तयार नव्हते. शेवटी जानेवारीमध्ये दोन्ही देशांनी व्यापारात निर्माण झालेली कटूता विसरत पहिल्या टप्प्यातील ट्रेड डीलवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. ज्यामुळे अर्थव्यवस्था रुळावर आणण्यास मदत झाली आहे. (हे वाचा-Jio मध्ये Facebook सर्वात मोठा भागीदार, वाचा या करारातील 8 महत्त्वाच्या गोष्टी) कोरोना विषाणूमुळे अमेरिकेत सर्वाधिक विनाश झाला आहे. अशा परिस्थितीत अमेरिका चीनबाबत भूमिका घेण्यास तयार आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हटले की चीन बर्‍याच वर्षांपासून अमेरिकेला फसवत आहे. ट्रम्प म्हणाले की, जगभरात कोरोना विषाणूचा प्रसार होण्यापूर्वी त्यांचे चीनशी चांगले संबंध होते. ते म्हणाले की, संबंध चांगले होते पण नंतर अचानक याबद्दल ऐकले. त्यातून मोठा फरक झाला आहे. संपादन - जान्हवी भाटकर
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    पुढील बातम्या