मुंबई : आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील आर्थिक संकेत अत्यंत वाईट आहेत. महागाई कमी होण्याचं नाव घेत नाही. दुसरीकडे दिवसेंदिवस व्याजदर वाढत असल्याने लोन, कर्ज आणि EMI महाग होत आहे. सर्वसामान्य लोकांचा खिसा आणखी रिकामा होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आर्थिक मंदीचं सावट असल्याचं दिसत आहे. अशा सगळ्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा US फेड रिझर्व्ह बँकेनं व्याजदरात वाढ केली आहे.
केंद्रीय बँकेनं पुन्हा एकदा 0.25 टक्क्यांनी आपल्या व्याजदरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. महागाईवर नियंत्रण मिळवण्याचा हा निर्णय घेतला असून भविष्यातही पुन्हा व्याजदर वाढणार असल्याचे संकेतही दिले आहेत. याचा फटका इतर बँकांनाही बसणार आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर बँकांनी व्याजदरात वाढ केल्याने EMI, कर्ज महाग झाले आहेत.
RBI कडून या बँकेवर मोठी कारवाई, 2.27 कोटींचा ठोठावला दंड
मनी कंट्रोलने दिलेल्या वृत्तानुसार फेडरल रिझर्व्हने बँकिंग संकटाकडे सावध दृष्टीकोन घेतला आणि व्याजदर वाढ त्यांच्या शिखरावर असल्याचे संकेत दिले. त्यामुळे पुन्हा एकदा व्याजदर वाढू शकतात असंही म्हटलं आहे.
अलीकडील घटनांमुळे व्यक्ती आणि कंपन्यांना कर्ज मिळवणे अधिक कठीण होऊ शकते. भारतात मोठ्या प्रमाणात वस्तू आयात केल्या जातात. त्यासाठी जास्त पैसे मोजावे लागण्याची शक्यता आहे. याशिवाय RBI पुन्हा एकदा रेपो रेट वाढवण्याची शक्यता आहे.
प्रत्येक बँक बदलून देत नाही फाटलेली नोट, तुम्हाला नियम माहिती आहे का?
अमेरिकेतील 186 बँका सध्या संकटात आहेत. अमेरिकन बड्या बँका सिलिकॉन व्हॅली आणि सिग्नेचर या बँका डबघाईला आल्या, त्याच संकटाला या बँकाही तोंड देत आहेत. कोरोना काळात यूएस फेडरलने व्याजदर शून्यावर आणले होते. जेव्हा परिस्थिती सुधारली तेव्हा व्याज सतत वाढू लागले. मार्च 2022 पासून, यूएस फेडरलने व्याजदर 4.5 टक्क्यांनी वाढवले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: America, Money, Rbi, Rbi latest news, United States Of America (Country)