मुंबई : तुमच्याकडे कुणी फाटलेल्या नोटा दिल्या किंवा चुकून आल्या, तुमच्याकडे फाटलेल्या नोटा असतील तर तुम्ही बँकेत गेलात आणि तिथे तुम्हाला बदलून देण्यात नकार दिला तर? तुम्हाला हे नियम माहिती असायला हवेत. प्रत्येकच बँक सगळ्या नोटा बदलून देत नाही. बँकेलाही नोटा बदलून देण्यासंदर्भात काही नियमांचं पालन करावं लागतं.
कधी कधी एखादा दुकानदार आपल्याला अशा नोटा देतो. सामान्यत: लोक नोटा बदलणाऱ्या दुकानदारांकडे जाऊन त्यांना काही कमिशन देतात आणि फाटलेल्या नोटा बदलून घेतात. तुम्ही बँकेत जाऊन फाटलेल्या नोटांऐवजी नवीन नोटा (मुटिलेटेड नोट एक्सचेंज) घेऊ शकता. जर ग्राहकाने दिलेली कापलेली किंवा फाटलेली नोट रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या मार्गदर्शक तत्त्वांची पूर्तता करत असेल, तर कोणतीही बँक ती बदलण्यास नकार देऊ शकत नाही.
आरबीआयने एकाच वेळी नोटा बदलण्याची मर्यादाही निश्चित केली आहे. तुम्ही कोणत्याही सहकारी बँक, प्रादेशिक बँक आणि ग्रामीण बँकेत नोटा बदलून घेऊ शकत नाही. खासगी बँकांसह राष्ट्रीयीकृत बँकांमध्येही नोटा बदलून घेता येतात. ज्या शाखेत तुम्ही नोटा बदलून घेणार आहात त्या बँकेत ग्राहकाचं खातं असायलाच हवं असंही नाही.
नोटीवरील लिहिलेल्या 'या' गोष्टींचा अर्थ तुम्हाला माहितीय का?
एकावेळी किती नोट बदलता येतात?
1 व्यक्ती एकावेळी 20 पेक्षा जास्त नोटा बदलून घेऊ शकते. या वीस नोटांचे मूल्य 5000 रुपयांपेक्षा जास्त नसावे. 20 च्या नोटा आणि मूल्य 5 हजार रुपयांपेक्षा कमी असल्यास बँक लगेच नोट बदलून देईल. यापेक्षा जास्त रकमेच्या नोटा बदलल्यास बँका त्या नोटा आपल्याकडे ठेवते आणि ते त्या मूल्याची रक्कम खात्यावर ट्रान्सफर करते. यासाठी काही कालावधी जावा लागेल ते बँकेच्या नियमांवर अवलंबून आहे.
किती मिळणार पैसे?
नोट खूप जास्त फाटली असेल किंवा कापली गेली असेल तर ग्राहकाला पूर्ण पैसे मिळत नाहीत. जर 2000 रुपयांच्या नोटेची 88 चौरस सेंटीमीटर असेल तर तुम्हाला संपूर्ण किंमत मिळेल. त्याच वेळी, जर 44 चौरस सेंटीमीटरचा हिस्सा असेल तर तुम्हाला अर्धे पैसे मिळतील.
पैशांच्या नोटेवर काही लिहिलं असेल तर ती नोट वैध राहाते का? काय आहे सत्य?
200 रुपयांच्या फाटलेल्या नोटेचे 78 चौरस सेंटीमीटर सुरक्षित असल्यास पूर्ण पैसे मिळतात आणि 39 चौरस सेंटीमीटर असल्यास अर्धे पैसे मिळतात. 10, 20, 50 च्या फाटलेल्या नोटा, ज्याचा किमान पन्नास टक्के भाग सुरक्षित असेल, तर त्या बदल्यात तुम्हाला त्याच रुपयांची दुसरी नोट बदलून मिळेलं.
तुम्हाला हे माहिती आहे का?
बँका फक्त अशाच नोटा बदलते ज्यावर सीरियल नंबर, गांधीजींचा वॉटरमार्क, गव्हर्नरची सही या गोष्टी दिसत असतील. अन्यथा बँकही अशा नोटा बदलण्यासाठी सहमती दर्शवत नाही. तुम्हाला RBI कडे जावं लागतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Money, Rbi, Rbi latest news