खुशखबर! पुढच्या महिन्यात स्वस्त होऊ शकतं स्वयंपाक करणं आणि कार चालवणं

union budget 2019, Modi Government - मोदी सरकार 5 जुलैला सादर होणाऱ्या बजेटमध्ये सर्वसामान्यांना मोठा दिलासा देऊ शकतं

News18 Lokmat | Updated On: Jun 25, 2019 04:20 PM IST

खुशखबर! पुढच्या महिन्यात स्वस्त होऊ शकतं स्वयंपाक करणं आणि कार चालवणं

मुंबई, 25 जून : मोदी सरकार 5 जुलैला सादर होणाऱ्या बजेटमध्ये सर्वसामान्यांना मोठा दिलासा देऊ शकतं. CNBC आवाजला मिळालेल्या एक्स्लुझिव माहितीनुसार सरकार LNG आयात स्वस्त करण्यासाठी इम्पोर्ट ड्युटीमध्ये कपात करू शकते. यामुळे CNG PNG च्या किमती कमी होतील. सरकार याची घोषणा बजेटमध्ये करू शकते. ड्युटी कमी झाल्यानं पाॅवर आणि फर्टिलायझर क्षेत्राला फायदा होईल. LNG स्वस्त झाल्यानं CNG च्या किमती कमी होणार. कारच्या इंधनाचा खर्च कमी होणार. शिवाय पाइपमधून घरात पोचणारा PNGही स्वस्त होईल. त्यामुळे जेवण बनवणं स्वस्त होईल.

अर्थमंत्री निर्मला सीतारामण 5 जुलैला आपलं पहिलं बजेट सादर करतील. त्याआधी 4 जुलैला आर्थिक सर्वेक्षण सादर होईल. नव्या सरकारचं हे पहिलं बजेट आहे. याआधी फेब्रुवारीत सरकारनं अंतरिम बजेट सादर केलं होतं.

मोदी सरकारचा निर्णय, वाहतूक नियम मोडले तर पडेल मोठा दंड

पेट्रोलियम मंत्रालयानं LNG आयात शुल्क कमी करण्याची शिफारस केली आहे. आता LNG वर 2.5 टक्के बेसिक आयात शुल्क लागतं. आयात शुल्कावर गेल्या आठवड्यात पेट्रोलियम-अर्थ मंत्रालयामध्ये बैठक झाली.

देशात रोजगार वाढवण्यासंदर्भात 45 अर्थतज्ज्ञांनी सांगितले महत्त्वपूर्ण उपाय

Loading...

24 हजार मेगावॅटचा पाॅवर प्लँटमध्ये गॅसची कमतरता आहे. त्याला फायदा होईल. याशिवाय सिटी गॅस डिस्ट्रिब्युशन नेटवर्कला सरकार 400 शहरांमध्ये घेऊन जाणार आहे. सीएनजी-पीएनजीच्या किमती कमी होतील. सूत्रांच्या म्हणण्याप्रमाणे सरकार याबाबत गंभीर आहे. बजेटमध्ये याची घोषणा होऊ शकते.

बजेटमध्ये आता लोकही होऊ शकतात सहभागी, अर्थ मंत्रालयाचा नवा प्लॅन

अंतरिम बजेटमध्ये 5 लाखापर्यंत इन्कमवर पूर्ण रिबेट देऊन सरकारनं करदात्यांना मोठा दिलासा दिला होता. ब्लूमबर्ग अनुसार सरकार हा फायदा इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये बदल करून सर्व करदात्यांना देऊ शकतं. अशी आशा आहे की सरकार 3 लाख रुपयापर्यंत टॅक्सेबल इन्कमची मर्यादा वाढू शकते. 10 लाखावर 30 टक्के टॅक्स स्लॅब 2012च्या बजेटपासून बदललं नाही.

काय असतं पूर्ण बजेट?

नवं सरकार आल्यानंतर वर्षभराच्या खर्चाचा लेखाजोखा सादर केला जातो. यालाही पूर्ण बजेट म्हटलं जातं. यानुसार सरकारची मिळकत आणि खर्च सरकार जाहीर करतं. हे पूर्ण वर्षाकरता असतं. पूर्ण बजेटच्या आकड्यांवरून सरकार संसदेला येणाऱ्या आर्थिक वर्षात कशावर किती खर्च केला जाईल, ते सांगतं.

VIDEO: पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे वाचला महिलेचा जीव

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 25, 2019 04:12 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...