मोदी सरकारचा निर्णय, वाहतूक नियम मोडले तर पडेल मोठा दंड

मोदी सरकारचा निर्णय, वाहतूक नियम मोडले तर पडेल मोठा दंड

Vehicles Amendment Bill - केंद्रीय मंत्रिमंडळानं मोटार वाहन बिलात सुधारणा करण्याच्या विधेयकाला मंजुरी दिलीय. दंडात बदल केलेत. ते जाणून घ्या

  • Share this:

मुंबई, 25 जून : केंद्रीय मंत्रिमंडळानं मोटार वाहन बिलात सुधारणा करण्याच्या विधेयकाला मंजुरी दिलीय. आता रस्ता दुर्घटना आणि नियमांचं उल्लंघन करण्यावर जास्तीत जास्त दंड आकारला जाईल. याबरोबर DL (ड्रायव्हिंग लायसन्स )ला डिजिटल बनवण्याचीही सोय केली गेलीय. वाहन रजिस्ट्रेशनसाठी RTO आॅफिसमध्ये एजंटांची कमिशनखोरी बंद करण्याची योजनाही केली जाणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, सरकार मंत्रिमंडळानं मंजूर केलेल्या बिलाला बजेट सत्रात सादर करेल.

या विधेयकात अँब्युलन्स, फायर ब्रिगेड अशा इमर्जन्सी वाहनांना रस्ता दिला नाही तर 10 हजार रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. तसंच वाहन चालवण्यास अयोग्य घोषित केलं तर 10 हजार रुपये दंड पडेल.

IDBI बँकेत असिस्टंट मॅनेजर पदांची व्हेकन्सी, 'असा' करा अर्ज

DL नियमांमध्ये बदलाची तयारी आणि 1 लाख रुपये दंड

या विधेयकात रस्ता सुरक्षा क्षेत्रात कडक नियम केले जातील. किशोरवयीन ड्रायव्हिंग, बिना लायसन्स ड्रायव्हिंग, असुरक्षित ड्रायव्हिंग, दारू पिऊन ड्रायव्हिंग करणं यासाठी कडक दंड होऊ शकतो. ओला, उबरच्या ड्रायव्हिंग लायसन्सचं उल्लंघन केलं तर एक लाख रुपयापर्यंत दंड होऊ शकतो.

देशात रोजगार वाढवण्यासंदर्भात 45 अर्थतज्ज्ञांनी सांगितले महत्त्वपूर्ण उपाय

अल्पवयीन  ड्रायव्हरच्या चुकीसाठी वाहनाचं रजिस्ट्रेशन रद्द

अल्पवयीन ड्रायव्हरच्या हातून अपघात घडला, चूक घडली तर कारचा मालक दोषी मानला जाईल. त्या वाहनाचं रजिस्ट्रेशन रद्द केलं जाईल. शिवाय मालकाला 3 वर्षाची शिक्षा आणि 25 हजार रुपये दंड होईल.

आता दुकान आणि रेस्टाॅरंट उघडणं होईल सोपं, मोदी सरकार उचलणार ही पावलं

किती होऊ शकतो दंड?

विधेयकात अतिवेगाला 1000 ते 2000 रुपये दंड, विना पाॅलिसी वाहन चालवण्यावर 2000 रुपये दंड, हेल्मेट न घालता दोन चाकी चालवली तर 1000 रुपये दंड आणि 3 महिन्यांसाठी लायसन्स रद्द केलं जाईल.

धोकादायक पद्धतीनं वाहन चालवण्याचा दंड 1000 रुपयावरून 5000 रुपयांवर केला गेलाय. दारू पिऊन गाडी चालवली तर 10 हजार रुपये, ओव्हर लोडिंगसाठी 20 हजार आणि सीट बेल्ट लावला नाही तर 1000 रुपये दंड पडेल.

या विधेयकाअनुसार वाहतूक नियमांचं उल्लघंन केलं तर 100 रुपयाऐवजी आता 500 रुपये दंड द्यावा लागेल. अधिकाऱ्यांच्या आदेशाचं पालन केलं नाही तर आता 500 रुपयांच्या जागी 2 हजार रुपये दंड द्यावा लागेल. वाहनाचा अनधिकृत वापर केला तर 5 हजार रुपये दंड पडेल.

VIDEO: भरचौकात हल्लेखोरांकडून युवकाला बेदम मारहाण

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 25, 2019 01:58 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading