Home /News /money /

Tarsons Products IPO: पुढील आठवड्यात आहे कमाईची संधी, जाणून घ्या किती रुपयांत करता येईल गुंतवणूक

Tarsons Products IPO: पुढील आठवड्यात आहे कमाईची संधी, जाणून घ्या किती रुपयांत करता येईल गुंतवणूक

15 नोव्हेंबर रोजी आरोग्य संशोधनाशी संबंधित टारसन्स प्रोडक्ट्सचा (Tarsons Products IPO) आयपीओ देखील बाजारात येत आहे. या आयपीओच्या माध्यमातून 1024 कोटींचा फंड उभा करण्याचा कंपनीचा मानस आहे.

    मुंबई, 11 नोव्हेंबर: गेल्या काही दिवसांपासून आयपीओ मार्केटमध्ये (New IPO in Market) विशेष तेजी पाहायला मिळते आहे. नवनवीन आयपीओ बाजारात दाखल होत असल्याने गुंतवणूकदारांसाठी कमाईच्या संधी (Earning Money Idea) देखील वाढत आहेत. अनेक दिग्गज कंपन्यांच्या आयपीओमध्ये पैसे गुंतवून गुंतवणूकदार मालामाल (Upcoming IPO List) झाले आहेत. दरम्यान 15 नोव्हेंबर रोजी आरोग्य संशोधनाशी संबंधित टारसन्स प्रोडक्ट्सचा (Tarsons Products IPO) आयपीओ देखील बाजारात येत आहे. या आयपीओच्या माध्यमातून 1024 कोटींचा फंड उभा करण्याचा कंपनीचा मानस आहे. बाजार नियामकाकडून मिळालेल्या मंजूरीनुसार कंपनी या आयपीओअंतर्गत तीन दिवस शेअर्सची विक्री करणार आहे. हा इश्यू 17 नोव्हेंबर रोजी बंद होणार आहे. काय निश्चित करण्यात आला आहे प्राइस बँड? या आयपीओदरम्यान विक्रीसाठी 150 कोटी रुपयांचे नवीन इक्विटी शेअर्स सादर केले जाणार आहेत. याशिवाय प्रमोटर्स आणि गुंतवणूकदारांकडे असणारे 1.32 कोटी इक्लिटी शेअर्स देखील सादर केले जाणार आहेत. प्रमोटर संजीव सहगल त्यांचे 3.9 लाख शेअर्स आणि रोहन सहगल 3.1 लाख शेअर्सची विक्री करतील. तर गुंतवणूक फर्म क्लिअर व्हिजन इनव्हेस्टमेंट होल्डिंग्ज 1.25 शेअर्सची विक्री करतील. कंपनीने या आयपीओसाठी 635-662 रुपयांचा प्राइस बँड निश्चित केला आहे. हे वाचा-डिसेंबर ते फेब्रुवारी 2022 पर्यंत महाराष्ट्रासह या राज्यांतील अनेक ट्रेन्स रद्द आयपीओच्या प्राइस बँडमधील सर्वोच्च किंमतीच्या आधारे कंपनी या IPO च्या माध्यमातून 1024 कोटींचा फंड उभा करण्याच्या योजनेवर काम करत आहे. आयसीआयसीआय सिक्योरिटीज, एडलवाइज फायनान्शियल सर्व्हिसेज आणि एसबीआय कॅपिटल मार्केट्स इश्यूसाठी बुक रनिंग लीड मॅनेजर आहेत. हा आयपीओ बीएसई आणि एनएसई दोन्हींवर लिस्ट करण्यात आला आहे. कोणसाठी किती हिस्सा आहे रिझर्व्ह? टारसन प्रोडक्ट्स आयपीओमध्ये 60,000 इक्विटी शेअर कंपनी कर्मचाऱ्यांसाठी आरक्षित आहेत. तर इश्यूचा जवळपास अर्धा हिस्सा क्वालिफाइड इंस्टीट्यूशनल इनव्हेस्टर्ससाठी (QIBs) आहे. याशिवाय 15 टक्के हिस्सा नॉन इंस्टीट्यूशनल इनव्हेस्टर्ससाठी (NIIs) आरक्षित आहे. किरकोळ गुंतवणूकदारांसाठी 35 टक्के हिस्सा रिझर्व्ह करण्यात आला आहे. हे वाचा-खूशखबर! RBI देत आहे 40 लाख रुपये जिंकण्याची संधी, वाचा काय करावं लागेल काम किती शेअरचा असणार एक लॉट? या आयपीओसाठी कमीतकमी 22 शेअर्सच्या लॉटच्या हिशेबाने गुंतवणूक करावी लागेल.  या IPO मधून मिळणारी रक्कम कर्ज फेडण्यासाठी त्याचप्रमाणे पश्चिम बंगालमधील पंचला याठिकाणी नवीन उत्पादन युनिट स्थापन करण्यासाठी वापरली जाईल. ही कंपनी प्रयोगशाळेतील उपकरणांची निर्मिती करते. ज्याद्वारे प्रगत वैज्ञानिक संशोधन आणि आरोग्य सेवा सुधारण्यास मदत केली जात आहे. सध्या या कंपनीचे पश्चिम बंगालमध्ये पाच प्लांट आहेत. कंपनीकडे मार्च 2021 पर्यंत जवळपास 300 प्रोडक्ट्सचा डायव्हर्सिफाय पोर्टफोलिओ होता.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Investment, Money, Savings and investments

    पुढील बातम्या