मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Upcoming IPOs: गुंतवणुकीसाठी पैसे ठेवा तयार! बाजारात दाखल होणार 6 दिग्गज कंपन्यांचे आयपीओ

Upcoming IPOs: गुंतवणुकीसाठी पैसे ठेवा तयार! बाजारात दाखल होणार 6 दिग्गज कंपन्यांचे आयपीओ

Upcoming IPO List:  पेटीएमच्या खराब लिस्टिंगनंतरही गुंतवणूकदारांना आयपीओ मार्केटमध्ये चांगले दिवस येतील अशी अपेक्षा आहे. पुढील काही दिवसात जवळपास अर्धा डझन कंपन्यांचे आयपीओ मार्केटमध्ये दाखल होणार आहेत.

  • Published by:  Janhavi Bhatkar

नवी दिल्ली, 23 नोव्हेंबर: गेल्या काही महिन्यापासून अनपेक्षितपणे अनेक आयपीओंनी गुंतवणूकदारांना कमाई करून दिली आहे. तुम्ही देखील आयपीओमध्ये गुंतवणूक करणार (Earn money from ipo) असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.  पेटीएमच्या खराब लिस्टिंगनंतरही गुंतवणूकदारांना आयपीओ मार्केटमध्ये चांगले दिवस येतील अशी अपेक्षा आहे. पुढील काही दिवसात जवळपास अर्धा डझन कंपन्यांचे आयपीओ मार्केटमध्ये दाखल होणार आहेत. मीडिया अहवालांच्या मते, मार्केट रेग्युलेटर सेबीने (SEBI) 6 कंपन्यांच्या आयपीओंनी जमा केलेल्या ड्राफ्टला मंजुरी दिली आहे.

या कंपन्यांमध्ये मेडप्लस हेल्थ सर्व्हिसेज (Medplus Health Services), रेटगेन ट्रॅव्हल टेक्नोलॉजीज (RateGain Travel Technologies), पूर्णिक बिल्डर्स (Purnik Builders), फ्यूजन मायक्रो फायनान्स (Fusion Micro Finance), ट्रॅक्सन टेक्नोलॉजीज (Tracxn Technologies)आणि प्रूडेंट कॉरपोरेट अॅडव्हायजरी सर्व्हिसेज (Prudent Corporate Advisory Services) इ. कंपन्यांचा समावेश आहे.

हे वाचा-स्वस्त घर खरेदी करण्याची सुवर्णसंधी! बँक ऑफ इंडियाकडून लिलाव; नोंदणी कुठे करायची

जाणून घ्या या कंपन्यांविषयी

>> हैदराबाद-मुख्यालय असलेली MedPlus हेल्थ सर्व्हिसेस ही कंपनी IPO द्वारे 1638.71 कोटी रुपये उभारण्याची योजना करत आहे. यापैकी 600 कोटी रुपयांचे नवीन शेअर्स जारी केले जातील, तर 1038.71 कोटी रुपयांचे शेअर्स ऑफर-फॉर-सेल (OFS) अंतर्गत प्रमोटर्स आणि भागधारकांद्वारे विक्रीसाठी दिले जातील.

>> रिअल इस्टेट डेव्हलपर पुर्णिक बिल्डर्सच्या IPO मध्ये, प्रमोटर्सकडून 510 कोटी रुपयांचा नवीन इश्यू आणि सुमारे 9.45 लाख शेअर्स विक्रीसाठी ऑफर केले जातील. उभारलेली रक्कम कंपनी त्यांच्या डोक्यावरील कर्ज कमी करण्यासाठी वापरणार आहे.

>> ट्रॅव्हल आणि हॉस्पिटॅलिटी सेवा देणारी कंपनी रेटगेन ट्रॅव्हल टेक्नॉलॉजीज IPO च्या माध्यमातून 400 कोटीं रुपयांचे नवीन इश्यू आणि प्रमोटर्सकडून रु. 2.26 कोटी पर्यंत ऑफर फॉर सेलचा समावेश असेल.

हे वाचा-Paytm ची घसरण थांबली, शेअरमध्ये 9 टक्क्यांची उसळी; काय आहे आज शेअरची किंमत?

>> Tracxn Technologies चा IPO पूर्णपणे ऑफर फॉर सेल असेल, ज्या अंतर्गत प्रमोटर्स 3.86 कोटी रुपयांचे शेअर्स विक्रीसाठी ठेवतील.

>> प्रुडंट कॉर्पोरेट अॅडव्हायझरी सर्व्हिसेसचा आयपीओ देखील संपूर्णपणे ऑफर फॉर सेल असणार आहे, ज्या अंतर्गत प्रमोटर्स सुमारे 86 लाख शेअर्सची विक्री करतील.

First published:

Tags: Investment, Money