मुंबई, 23 नोव्हेंबर : Paytm शेअरच्या लिस्टिंगपासून (Paytm listing) सुरु असलेली घसरगुंडी आज काहीशी थांबलेली दिसत आहे. आज पेटीएमच्या शेअरमध्ये चढता आलेख पाहायला मिळत आहे. पेटीएमचे शेअर आज जवळपास 9 टक्क्यांहून अधिक वधारले आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांना (Paytm Investors) काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
Paytm ची मूळ कंपनी One97 Communications चे शेअर्स BSE वर आज म्हणजेच 23 नोव्हेंबर रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास जवळपास 9.16 टक्क्यांनी रिकव्हरी होऊन 1,484.70 रुपयांवर पोहोचले.
22 नोव्हेंबर रोजी कंपनीचा शेअर 1,360.30 वर बंद झाला. जो त्याच्या 2,150 रुपयांच्या लिस्टिंग किमतीपेक्षा 35 टक्क्यांनी कमी होता. लिस्टिंगनंतर डिजिटल पेमेंट क्षेत्रातील दिग्गज कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली होती. स्टॉकमधील करेक्शन त्याच्या जादा वॅल्युएशनमुळे आणि त्याचे व्यवसाय मॉडेल आणि नफा याभोवती असलेल्या अनिश्चिततेमुळे होते.
Paytm चे संस्थापक विजय शेखर शर्मा यांनी इलॉन मस्कसोबत केली स्वत:ची तुलना, काय आहे कारण?
विश्लेषकांचा असा विश्वास आहे की स्टॉक खूप महाग आहे आणि Macquarie ने ट्रेडिंगवर कमी लक्ष केंद्रित केल्यामुळे शेअरचे टार्गेट 1,200 रुपयांवर ठेवले आहे. 21 नोव्हेंबर रोजी पॉझिटिव्ह बिजनेस अपडेट देत, कंपनीने सांगितले की, कंपनीने ऑक्टोबरपर्यंत वितरित केलेल्या कर्जाच्या मूल्यामध्ये 418 टक्के वार्षिक वाढ नोंदवली आहे. पेटीएमने सांगितले की, ऑक्टोबरमध्ये आमच्या विविध वित्तीय सेवा उत्पादनांच्या विक्रीत स्थिर वाढ दिसून आली. पोस्टपेड, ग्राहक कर्ज आणि व्यापारी कर्जांसह आमच्या सर्व कर्ज उत्पादनांच्या जलद वाढीमुळे आमच्या कर्ज व्यवसायात खूप मजबूत वाढ होत असताना.
One 97 Communications चे संचालक मंडळ 27 नोव्हेंबर रोजी कंपनीच्या तिमाही आर्थिक निकालांवर विचार करण्यासाठी आणि मंजूर करण्यासाठी बैठक घेणार आहे. यानंतर जुलै-सप्टेंबरमधील निकालाची आकडेवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. आज सकाळी 9:31 वाजता बीएसईवर शेअर 5.7 टक्क्यांनी वाढून 1,437 रुपयांवर व्यवहार करत होता. दरम्यान, बेंचमार्क निर्देशांक अस्थिर राहिले, निफ्टी आज उघडताना घसरला आणि नंतर त्याच्या सुरुवातीच्या पातळीपासून थोडीशी सुधारणा दर्शविली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Money, Paytm, Share market