मुंबई, 23 नोव्हेंबर : स्वस्त घर खरेदी करण्याचा तुम्ही विचार करत असाल, तर बँक ऑफ इंडिया (Bank Of India Auction) तुमच्यासाठी खास ऑफर घेऊन आली आहे, ज्यामध्ये तुम्हाला स्वस्तात निवासी मालमत्ता खरेदी करण्याची संधी मिळत आहे. बँक ऑफ इंडिया या मालमत्तेचा लिलाव करणार आहे. 25 नोव्हेंबरपासून हा लिलाव सुरू होत आहे. डीफॉल्ट लिस्टमध्ये आलेल्या मालमत्तांचा लिलाव केला जाणार आहे.
याबाबतची माहिती IBAPI (Indian Banks Auctions Morgaged Properties Information) ने दिली आहे. बँक ऑफ इंडिया ज्या मालमत्तांचा लिलाव करणार त्यामध्ये निवासी, व्यावसायिक, औद्योगिक, कृषी मालमत्तांचा समावेश आहे.
Mega E-Auction! Amazing properties at affordable prices! For property details, please visit : https://t.co/SYyMojqcx4 and https://t.co/48YSxYXcFo pic.twitter.com/i2bFlkHvaK
— Bank of India (@BankofIndia_IN) November 20, 2021
लिलाव कधी होणार?
बँक ऑफ इंडियाने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर ट्वीट करून याबाबत माहिती दिली आहे. बँकेने ट्वीटमध्ये लिहिले की मेगा ई-लिलाव 25 नोव्हेंबर 2021 रोजी केला जाईल. यामध्ये निवासी आणि व्यावसायिक मालमत्तांचा ई-लिलाव केला जाणार आहे. तुम्ही येथे वाजवी किमतीत मालमत्ता खरेदी करू शकता.
Airtel नंतर VIचा प्रीपेड युजर्सना झटका! टॅरिफ प्लॅनमध्ये 20 ते 25 टक्क्यांनी वाढ
नोंदणी कुठे करायची?
इच्छुक बोलीदारांना बँक ऑफ इंडिया मेगा ई-लिलावासाठी ई-बक्रे पोर्टल https://ibapi.in/ वर नोंदणी करावी लागेल. या पोर्टलवर 'बिडर्स रजिस्ट्रेशन' वर क्लिक केल्यानंतर मोबाईल नंबर आणि ईमेल आयडीद्वारे नोंदणी करावी लागेल.
KYC डॉक्युमेंट्स आवश्यक
बोलीदाराला आवश्यक KYC कागदपत्रे अपलोड करावी लागतील. केवायसी कागदपत्रांची ई-लिलाव सेवा प्रदात्याद्वारे पडताळणी केली जाईल. यास 2 दिवस (2 Working Days) लागू शकतात.
Paytm ची घसरण थांबली, शेअरमध्ये 9 टक्क्यांची उसळी; काय आहे आज शेअरची किंमत?
अधिक माहितीसाठी या लिंकवर क्लिक करा
मालमत्तेच्या लिलावाबद्दल अधिक माहितीसाठी तुम्ही https://ibapi.in/Sale_Info_Home.aspx किंवा https://www.bankofindia.co.in/Dynamic/Tender?Type=3 ला भेट देऊ शकता.
बँका वेळोवेळी लिलाव करतात
मालमत्तेच्या मालकांनी त्यांच्या कर्जाची परतफेड केलेली नाही किंवा काही वेगळ्या कारणाने देऊ शकलो नाही त्या सर्व लोकांच्या मालमत्ता बँका ताब्यात घेतात. अशा मालमत्तांचा बँकांकडून वेळोवेळी लिलाव केला जातो. या लिलावात बँक मालमत्ता विकून आपली थकबाकी वसूल करते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Home Loan, State bank of india