मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Share Market Update : अस्थिरतेदरम्यान शेअर बाजार हिरव्या रंगात बंद; Sensex मध्ये 187 तर Nifty मध्ये 53 अंकांची वाढ

Share Market Update : अस्थिरतेदरम्यान शेअर बाजार हिरव्या रंगात बंद; Sensex मध्ये 187 तर Nifty मध्ये 53 अंकांची वाढ

सेन्सेक्स 57808.58 अंकांवर बंद झाला. यात 187.39 अंकांची किंवा 0.33 टक्क्यांची वाढ झाली. तर निफ्टी 17266.80 वर बंद झाला. यात 53.20 अंकांची किंवा 0.31 टक्क्यांची वाढ झाली.

  • Published by:  Pravin Wakchoure
मुंबई, 8 फेब्रुवारी : कालच्या मोठ्या घसरणीनंतर शेअर बाजार आज हिरव्या निशाण्यावर बंद झाला. सकाळपासूनच्या मोठ्या अस्थिरतेनंतर आज शेअर बाजार किंचिंत वाढीसह बंद झाला. सेन्सेक्स 57808.58 अंकांवर बंद झाला. यात 187.39 अंकांची किंवा 0.33 टक्क्यांची वाढ झाली. तर निफ्टी 17266.80 वर बंद झाला. यात 53.20 अंकांची किंवा 0.31 टक्क्यांची वाढ झाली. मंगळवारी भारतीय शेअर बाजारात प्रचंड अस्थिरता होती. सेन्सेक्स 57,799 वर उघडला आणि तो बंद होईपर्यंत 800 हून अधिक अंकांनी सावरला. निफ्टी 50 मध्येही असेच काहीसे दिसून आले. सकाळी जेवढी घसरण झाली, तेवढी बाजार बंद होईपर्यंत रिकव्हर झाली. Multibagger Share : 'या' टेक्सटाईल शेअरमुळे गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट, ब्रोकरेज फर्मची BUY रेटिंग विविध क्षेत्रांबद्दल बोलायचे झाल्यास, मेटल आणि PSU बँकांमध्ये अनुक्रमे 0.80 टक्के आणि 0.82 टक्क्यांची वाढ झाली आहे. एनर्जी, रिअॅल्टी आणि आयटी क्षेत्र लाल रंगात बंद झाले. यामध्ये अनुक्रमे 1.31 टक्के, 0.84 टक्के ​​आणि 0.29 टक्क्यांची घट नोंदवली गेली. Adani Wilmar चे शेअर साधारण लिस्टिंगनंतर मजबूत स्थितीत, गुंतवणूकदारांना आता काय करावं? टॉप गेनर शेअर >> टाटा स्टील (Tata Steel)- 1,219.60 रुपये (3.09 टक्के) >> डिवाईस लॅब्स (Divis Labs) - 4,277.55 रुपये (1.81 टक्के) >> बजाज फायनान्स (Bajaj Finance) - 7,055.00 रुपये (1.79 टक्के) >> बजाज फिनसर्व्ह (Bajaj Finserv) - 15,989.15 रुपये (1.77 टक्के) >> रिलायन्स (Reliance) - 2,356.05 रुपये (1.68 टक्के) टॉप लूजर शेअर्स >> ओनएनजीसी (ONGC)- 166.95 रुपये (2.99 टक्के) >> पावर ग्रीड (Power Grid Corp) - 210.05 रुपये (1.68 टक्के) >> इंडियन ऑईल कॉर्पोरेशन (IOC) - 121.35 रुपये (1.26 टक्के) >> एसबीआय लाईफ (SBI Life Insura)- 1,131.15 रुपये (1.12 टक्के) >> टाटा कन्झुमर प्रोडक्ट्स (TATA Cons. Prod) - 697.10 रुपये (1.09 टक्के)
First published:

Tags: Money, Share market

पुढील बातम्या