मराठी बातम्या /बातम्या /मनी /IPO Pre Apply: PolicyBazar आणि Paytm च्या येणाऱ्या आयपीओसाठी कशाप्रकारे कराल प्री-अप्लाय, वाचा सविस्तर

IPO Pre Apply: PolicyBazar आणि Paytm च्या येणाऱ्या आयपीओसाठी कशाप्रकारे कराल प्री-अप्लाय, वाचा सविस्तर

गेल्या काही काळापासून बाजारात आलेल्या आयपीओंनी अनेकांना (Investing in IPO) मालामाल केले आहे. तुम्ही देखील येणाऱ्या काळात आयपीओमध्ये (Upcoming IPO) गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.

गेल्या काही काळापासून बाजारात आलेल्या आयपीओंनी अनेकांना (Investing in IPO) मालामाल केले आहे. तुम्ही देखील येणाऱ्या काळात आयपीओमध्ये (Upcoming IPO) गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.

गेल्या काही काळापासून बाजारात आलेल्या आयपीओंनी अनेकांना (Investing in IPO) मालामाल केले आहे. तुम्ही देखील येणाऱ्या काळात आयपीओमध्ये (Upcoming IPO) गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.

मुंबई, 28 ऑक्टोबर: गेल्या काही काळापासून बाजारात आलेल्या आयपीओंनी अनेकांना (Investing in IPO) मालामाल केले आहे. तुम्ही देखील येणाऱ्या काळात आयपीओमध्ये (Upcoming IPO) गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. मात्र या येणाऱ्या आयपीओंच्या तारखा (Upcoming IPO Dates) तुम्हाला लक्षात राहत नसतील आणि त्या निश्चित दिवशीची रोमांचक बिड तुम्हाला चुकवायची नसेल तर काही इनव्हेस्टमेंट प्लॅटफॉर्म 'प्री-अप्लाय' करण्याचा पर्याय देत आहेत. यामध्ये Paytm, Groww, Upstox, Angel One आणि ICICI direct हे पर्याय आहेत, जे आयपीओसाठी आगाऊ अप्लाय करण्याचा पर्याय देत आहेत.

IPO साठी प्री अॅप्लिकेशन हा IPO लाइव्ह होण्यापूर्वी अर्ज करण्याचा एक मार्ग आहे आणि तो तीन दिवसांसाठी सब्सक्राइबसाठी खुला आहे. यात सिस्टम प्री-आयपीओ बिड स्टोअर करते आणि  जेव्हा आयपीओ इश्यू होतो तेव्हा थेट अर्ज सबमिट केला जातो. अशा प्रकारे तुम्हाला IPO च्या तारखा लक्षात ठेवण्याची आणि त्यासाठी आधीपासून बोली लावण्याची गरज नाही. हे फीचर तुम्ही आगामी IPO म्हणजे Nykaa, PolicyBazaar, Fino Payments Bank आणि Paytm साठी वापरता येईल.

हे वाचा-दिवाळीआधी येणार महागाई भत्त्याचा एरिअर, जाणून घ्या किती येणार वाढीव पगार?

PolicyBazaar चा आयपीओ 1 नोव्हेंबर ते 3 नोव्हेंबरमध्ये सब्सक्राइब करता येणार आहे. याकरता तुम्ही प्री-अप्लाय करू शकता. सध्या गुंतवणूकदार तीन दिवसांच्या कालावधीसाठी  IPO खुला असतानाच अर्ज करू शकतात. बरेच गुंतवणूकदार, विशेषत: जे सक्रियपणे व्यापार करत नाहीत, ते वेळ, नेटवर्क समस्या आणि सर्व्हरमधील त्रुटींमुळे IPO मध्ये गुंतवणूक करण्याची संधी गमावतात. एकदा प्री-ऑर्डर दिल्यानंतर गुंतवणूकदारांना IPO अर्ज प्रक्रियेदरम्याव प्रत्येक टप्प्यावर सूचना दिली जाईल. जसे की युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) मँडेट, IPO अर्जाची रक्कम ब्लॉक करण्याची विनंती आणि यशस्वीरित्या त्यांची बोली लावणे याबाबत सूचित केले जाईल.

अपस्टॉक्सवर (Upstox) IPO साठी प्री-अप्लाय कसे कराल? (सर्व गुंतवणूक अॅप्सवर याच पद्धतीने प्री-अप्लाय केले जाईल)

>> तुमचा 6 अंकी पिन किंवा बायोमेट्रिक्स वापरून Upstox मध्ये लॉग इन करा आणि "Discover" टॅबमधील IPO पेजवर जा.

>> पेजवरील प्री-अप्लाय पर्यायावर क्लिक करा.

>> IPO चे सर्व तपशील तपासा.

>> आवश्यक तपशील भरा आणि Continue वर क्लिक करा.

>> IPO साठी प्री-अप्लाय अर्ज तयार केला जाईल आणि तुम्हाला तुमची बोली रक्कम ब्लॉक करण्यासाठी UPI मँडेट नोटिफिकेशन मिळण्याची तारीख सांगणारा UPI मँडेट मेसेज दिसेल

>> "My IPO Section" अंतर्गत तुमचे प्री-अप्लाय आयपीओ अॅप्लिकेशन पाहा

हे वाचा-Price Hike : गृहिणींची बजेट आणखी कोलमडणार? साबण-शॅम्पू महागले

>> तुम्हाला तुमचा IPO साठीचे प्री-अप्लाय आयपीओ अॅप्लिकेशन हटवायचे असल्यास, My IPO अंतर्गत See More वर क्लिक करा जिथे तुम्हाला Application Delete पर्याय दिसेल. IPO बंद होण्यापूर्वी तुम्ही तुमचा प्री-IPO अर्ज कधीही हटवू शकता.

Groww वर IPO साठी पूर्व-अर्ज कसा करावा

>> तुमचा ग्राहक आयडी आणि पासवर्ड वापरून तुमच्या नेट बँकिंग खात्यात लॉग इन करा.

>> स्क्रीनच्या डाव्या बाजूला Request टॅबवर जा.

>> खाली स्क्रोल करा आणि IPO/Rights Issue पर्यायावर जा

>> पुढील स्क्रीनवर, तुम्हाला IPO आणि राइट्स इश्यूची लिस्ट लाइव्ह दिसेल. तुम्ही ज्या IPO साठी अर्ज करू इच्छिता त्यासाठी Apply वर क्लिक करा.

>> पुढील स्क्रीनमध्ये तुम्हाला किती शेअर्सची बोली लावायची आहे, तुमची बोलीची रक्कम, जन्मतारीख विचारले जाईल.

>> त्यानंतर तुम्हाला तुमच्या खात्यातून ब्लॉक केल्या जाणार्‍या रकमेची पुष्टी करण्यास सांगितले जाईल, आवश्यक अटी व शर्तींशी सहमत होण्यास सांगितल्यानंतर तुम्हाला IPO अर्ज सबमिट करा.

First published:

Tags: Investment, Money