नवी दिल्ली, 28 ऑक्टोबर: तुम्ही जर केंद्र सरकारचे कर्मचारी (Govt Employees News Update)असाल तर ही तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. केंद्र सरकारमधील कर्मचाऱ्यांना ऑक्टोबर महिन्याच्या पगारात डीए एरिअर (DA Arrear in october 2021 Salary) मिळेल. अलीकडेच मोदी सरकारने महागाई भत्ता (Dearness Allowance Hike) 3 टक्क्यांनी वाढवून 31 टक्के केला आहे, 1 जुलै 2021 पासून हा वाढीव डीए लागू होणार आहे. अर्थात 4 महिन्यांचा डीए एरिअर कर्मचाऱ्यांना मिळेल. यामुळे या कर्मचाऱ्यांना वाढलेली सॅलरी मिळेल.
काय आहे DA कॅलक्यूलेशन?
सातव्या वेतन आयोगाच्या (7th Pay commission) अंतर्गत महागाई भत्त्यातील वाढ बेसिक सॅलरीवर (Basic Salary) निश्चित केली जाते. केंद्रातील 47.14 लाख कर्मचारी आणि 68.62 लाख पेन्शनधारकांना सरकारच्या या निर्णयाचा फायदा होणार आहे. महागाई भत्त्याचा नवीन दर जुलै 2021 पासून लागू होईल. सरकारने अशी माहिती दिली आहे की, महागाई भत्ता आणि महागाई सवलतीमुळे सरकारी तिजोरीवर 9,488.70 कोटी रुपये प्रति वर्षाचा खर्च वाढेल. जाणून घ्या दोन वेगवेगळ्या सॅलरीच्या आधारे डीएमध्ये होणारी वाढ...
हे वाचा-एका वर्षात 'या' शेअरमध्ये 120 टक्क्यांहून अधिक रिटर्न, अजून 35% वाढ अपेक्षित
बेसिक सॅलरी 56,900 रुपये असताना डीए
>> जर एखाद्या कर्मचाऱ्याची बेसिक सॅलरी 56,900 रुपये असेल तर नवीन 31 टक्के दराने 17,639 रुपये दरमहा महागाई भत्ता मिळेल. जर डीए 28 टक्के असता तर दरमहा 15,932 रुपये डीए मिळेल. अर्थात तुमच्या डीएमध्ये 1,707 रुपये वाढ होईल.
>> ही वाढ वार्षिक मोजली असता 20484 रुपये असेल. ऑक्टोबर महिन्यात तीन महिन्याचा डीए एरिअर मिळाला तर 52,917 रुपये येतील. तर ऑक्टोबर महिन्याच्या एरिअरसह चार महिन्याचे 70,556 रुपये येतील
हे वाचा-Paytm IPO : पेटीएम 8 ते 10 नोव्हेंबरदरम्यान 18300 कोटींचा आयपीओ
बेसिक सॅलरी 18,000 रुपये असताना डीए
>> जर तुमची बेसिक सॅलरी 18,000 रुपये असेल तर 28 टक्के दराने तुम्हाला 5,030 रुपये महागाई भत्ता मिळाली असते. यामध्ये 3 टक्के वाढ झाली आहे, आता 31 टक्के दराने महागाई भत्त्ता मिळेल.
>> 31 टक्के दराने डीए मिळणार असल्याने डीए दरमहा 5,580 रुपये मिळतील. अर्थात 18000 रुपयांचा बेसिक पगार असल्यास 540 रुपये अधिक डीए मिळेल. आता तीन महिन्याच्या डीएच्या स्वरुपात एरिअर म्हणून 1,620 रुपये अतिरिक्त मिळतील.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Investment, Money, Savings and investments