मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Price Hike : गृहिणींची बजेट आणखी कोलमडणार? साबण-शॅम्पू महागले

Price Hike : गृहिणींची बजेट आणखी कोलमडणार? साबण-शॅम्पू महागले

 पॅन्टीन आणि हेड अँड शोल्डर्स या पर्सनल केअ ब्रँडच्या किमती 10 टक्क्यांवरुन 11 वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. काही दिवसांपूर्वी मालवाहतूक आणि कच्च्या मालाच्या किमतीमुळे कंपनीने आपल्या सौंदर्य उत्पादनांच्या किमती वाढवल्या आहेत.

  • Published by:  Pravin Wakchoure

मुंबई, 27 ऑक्टोबर : तेल,  भाज्या, पेट्रोल-डिझेल, एलपीजी इत्यादींमुळे सामान्य माणूस आधीच हैराण असताना आणखी दणका बसणार आहे. घरात रोज वापरले जाणारे साबण, शॅम्पू महागणार असल्याने आता तुमच्या घराचे बजेट बिघडण्याची शक्यता आहे. कारण (FMCC- Fast Moving Consumer Goods) कंपनी प्रॉक्टर अँड गॅम्बलने (Procter and Gamble) Tide, Ariel, Head & Shoulders आणि Pantene सारख्या बहुतेक ब्रँडच्या किमती वाढवल्या आहेत. प्रॉक्टर अँड गॅम्बलने त्यांच्या बहुतांश उत्पादनांच्या किमती 4-11 टक्क्यांनी वाढवल्या आहेत.

वॉशिंग पावडर-शॅम्पू महाग

एका रिटेल इंटेलिजन्स प्लॅटफॉर्मच्या मते, कंपनीने जुलैपासून एरियल आणि टाईड या डिटर्जंट पावडर ब्रँडच्या मोठ्या पॅकच्या किमती 4-5 टक्क्यांनी वाढवल्या आहेत. तर पॅन्टीन आणि हेड अँड शोल्डर्स या पर्सनल केअर ब्रँडच्या किमती 10 टक्क्यांवरुन 11 वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. काही दिवसांपूर्वी मालवाहतूक आणि कच्च्या मालाच्या किमतीमुळे कंपनीने आपल्या सौंदर्य उत्पादनांच्या किमती वाढवल्या आहेत.

Gold Price: दिवाळीपर्यंत 50000 रुपयांवर पोहोचणार सोन्याचे दर, आता खरेदी कराल तर 8 दिवसांत किती मिळेल नफा?

अनेक FMCG कंपन्यांनी किमती वाढवल्या

काही दिवसांपूर्वी हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड (Hindustan Unilever Limited), गोदरेज कन्जुमर प्रोडक्ट (Godrej Consumer Products), मॅरिको (Marico) आणि डाबर इंडिया (Dabur India) यासारख्या अनेक FMCG कंपन्यांनीही त्यांच्या उत्पादनांच्या किमती वाढवल्या आहेत. वाढत्या खर्चामुळे मार्जिनवर होणारा परिणाम कमी करणे हा किमती वाढवण्याचा उद्देश आहे. कच्चा माल महाग होत असल्याचे कंपन्यांचे म्हणणे आहे. तर महाग डिझेलमुळे वाहतूक खर्चही वाढला आहे, त्यामुळे कंपन्यांना दरवाढ करावी लागली आहे.

Union Bank of India ची होम लोनवर धमाकेदार ऑफर, अतिशय कमी व्याजदरात मिळेल गृहकर्ज

घराला रंग देणेही महागणार

घराची रंगरंगोटीही महाग होणार आहे. रंग उत्पादक कंपन्यांनी रंगाच्या किमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. एशियन पेंट्स (Asian Paints) आणि बर्जर पेंट्सने (Berger Paints) दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे 12 नोव्हेंबरपासून पेंट्सच्या किमती 7 ते 10 टक्क्यांनी वाढणार आहेत.

First published:

Tags: Budget, Inflation, Money