मुंबई, 19 फेब्रुवारी: 8 फेब्रुवारी रोजी रिझर्व्ह बँकेने रेपो रेट्समध्ये 0.25 टक्क्यांनी वाढ करण्याची घोषणा केली. रेपो रेट्समध्ये वाढ केल्यानंतर कर्जावरील व्याजदरात वाढ करण्याबरोबरच बँक ठेवींवरील व्याजदरही वाढू लागले आहेत. दरम्यान, खासगी क्षेत्रातील आयडीएफसी फर्स्ट बँक, इंडसइंड बँक आणि युनिटी स्मॉल फायनान्स बँकेने फिक्स डिपॉझिट म्हणजेच एफडीवरील व्याजदरात वाढ केली आहे. IDFC फर्स्ट बँकेच्या सेविंग्स अकाउंटमध्ये आता जास्तीत जास्त 6.75 टक्के व्याज मिळेल. ही वाढ 15 फेब्रुवारी 2023 पासून लागू झाली आहे. आयडीएफसी फर्स्ट बँक आता बचत खात्यातील 10 लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींवर 4% व्याज देतेय. जर तुमच्या खात्यात 10 लाख ते 1 कोटी रुपये असतील तर तुम्हाला 6.25 टक्के दराने व्याज मिळेल. याशिवाय इंडसइंड बँकेचे FD ठेवीदार आता 2 कोटी रुपयांपेक्षा कमी ठेवींवर 7.5% पर्यंत व्याज मिळवू शकतात.
LIC किंवा पोस्ट ऑफिसची पॉलिसी घेण्याचा विचार करताय? कोणती आहे बेस्ट?इंडसइंड बँकेत FD वर 8.25% पर्यंत परतावा मिळणार आहे
इंडसइंड बँकेने 2 कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीसाठी व्याजदरांमध्ये वाढ केलीये. हे नवीन रेट्स 16 फेब्रुवारी 2023 पासून लागू झाले आहेत. आता बँक सर्वसामान्य ग्राहकांना FD वर जास्तीत जास्त 7.50 टक्के तर ज्येष्ठ नागरिकांना FD वर जास्तीत जास्त 8.25 टक्के व्याज देईल. इंडसइंड बँक सामान्य ग्राहकांच्या तुलनेत ज्येष्ठ नागरिकांना FD वर 0.50% अतिरिक्त व्याज देतेय.
विविध बँकांमध्ये अकाउंट असतील तर व्हा सावधान! होऊ शकते नुकसानयुनिटी स्मॉल फायनान्स बँकेचे नवीन एफडी रेट्स
युनिटी स्मॉल फायनान्स बँकेने एफडीवरील व्याजदरात वाढ करण्याची घोषणा केली आहे. बँक आता ज्येष्ठ नागरिकांना एफडीवर 9.5 टक्के व्याज देणार आहे. ज्येष्ठ नागरिकांना आता बँकेत 1,001 दिवसांचा कालावधी असलेल्या एफडीवर 9.5 टक्के दराने व्याज मिळणार आहे. तर सामान्य लोकांना आता त्याच कालावधीसाठी 9 टक्के दराने व्याज मिळू शकते. 181 ते 201 दिवस आणि 501 दिवसांच्या मुदतीच्या ठेवींसाठी, बँक नियमित खातेदारांना 8.75 टक्के दराने व्याज देईल. बचत खातेधारकांसाठी, युनिटी बँक 1 लाख रुपयांपेक्षा जास्त ठेवींवर सात टक्के व्याज दर देत आहे. ही दरवाढ 15 फेब्रुवारीपासून लागू झाली आहे.
रेपो रेटमध्ये सलग सहाव्यांदा वाढ
8 फेब्रुवारी रोजी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी सलग सहाव्यांदा रेपो रेटमध्ये वाढ केली. पतधोरण बैठकीनंतर ते म्हणाले की, जगातील वाढत्या महागाईचा दबाव भारतावरही आहे आणि त्यावर पूर्णपणे मात करण्यासाठी पुन्हा एकदा कर्जाच्या व्याजदरात वाढ करणे आवश्यक झाले आहे. मात्र, यावेळी रेपो रेटमध्ये केवळ 0.25 टक्के वाढ करण्यात आली आहे.